मी कधीचे हाय, थडगे खोदतो आहे!

Submitted by profspd on 29 June, 2014 - 05:30

मी कधीचे हाय, थडगे खोदतो आहे!
जन्मभर मी आपल्याला शोधतो आहे!!

ही मुकी, बहिरीच वस्ती, मी कुठे बघतो?
आपल्या धुंदीत मी झंकारतो आहे!

तू दिलेले घाव हे अनमोल माझ्यास्तव.....
दागिन्यांसम ते उरी सांभाळतो आहे!

जाहला माझा घरोबा या फुलांसगे.....
राहुनी काट्यात सुद्धा हासतो आहे!

लाभला नाही निवारा, राहण्याजोगा.....
जन्मभर वा-याप्रमाणे भटकतो आहे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय बोलावे? कुणाला काय सांगावे?
आपल्या नादात जो तो झिंगतो आहे!

............प्रा.सतीश देवपूरकर

काय बोलावे? कुणाला काय सांगावे?
आपल्या नादात जो तो झिंगतो आहे!<<< छान!

अपनी अपनी फिकरोंमे जो भी है वो उल्झा है - या ओळी आठवल्या 'चढता सूरज'मधील.