मायबोलीवरून केलेल्या खरेदीसंबंधी : फॉलो अप, चौकशी, इ.

Submitted by गजानन on 2 July, 2014 - 03:13

नमस्कार,

मी २१-जूनला मायबोली खरेदी विभागातून पाच पुस्तके मागवली होती. २६-जूनला मला त्याचे शिपींग झाले आहे, अशी मेल आली होती आणि नंतर २-३ दिवसांत पुस्तके मिळाली. पण पाचपैकी चारच पुस्तके मिळाली. पुस्तके घरी आली तेंव्हा वडील घरी होते, त्यांनी माझे पार्सल आहे हे बघून घेतले आणि ठेवून दिले. (किती पुस्तके मागवली होती (की आणखी काय मागवले आहे कुणास ठाऊक!!!) याची कल्पना नसल्याने त्यांनी ते पार्सल उघडून पाहिले नाही).

यासंबंधी मी मला जी शिपींग झाल्याचे कळवणारी मेल आली होती त्या मेलला ३०-जूनला उत्तर पाठवून असे झाल्याचे कळवले होते. पण अजून बहुधा त्यांनी ती बघितली नसावी. त्यांना ती मेल मिळाली तरी आहे का, याबद्दलही मला शंका वाटते. नेमके काय झाले आहे, याबाबत मी संभ्रमात आहे. म्हणून हा धागा काढत आहे. अ‍ॅडमिन किंवा खरेदी विभागातील नेमस्तकांनी कृपया खुलासा करावा. धन्यवाद.

मायबोलीवरून केलेल्या खरेदीसंबंधीच्या इतर चौकश्या, प्रश्नही इथे लिहिता येतील.
असा धागा आधीच असेल तर तिथेच ही पोस्ट हलवली अथवा हाच धागा यापेक्षा योग्य विभागात हलवला तरी चालेल.
धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

गजाभाऊ, तुमचा स्पॅम फोल्डर चेक करा एकदा, मला आलेली मेल एकदा गेली होती तिथे.
माझा मायबोली खरेदीचा अनुभव चांगला आहे, सहसा सगळ्या मेल्स/प्रश्नांची त्वरित दखल घेतात.

स्वाती +१.

इनव्हॉइसवर पाचव्या पुस्तकाविषयी काही नोट आहे का बघा. खरेदी विभागात पुस्तक जिथे लिस्ट केलं आहे तिथे सुद्धा नोट आहे का बघा. उदा: पुस्तक २ दिवस उशीरा शिप होइल इ.

स्वाती, तृप्ती, हो माझाही मायबोली खरेदीचा (अर्थात मायबोलीवरून केलेल्या खरेदीचा Happy ) अनुभव चांगलाच आहे.

तुम्ही सुचवलेल्या गोष्टी मी चेक केल्या. दोन्ही मेल्समध्ये ( एक इन्व्हॉईस आणि दुसरे Your order #xxxx has been processed.) दोन्हींमध्ये पाचही पुस्तके लिस्टेड आहेत. खरेदी विभागातही पाचच आहेत. शिपींगसंबंधी तशी नोट दिसली नाही. स्पॅम फोल्डरमध्येही पाहिले.

गजानन
तुमच्या मागणीतील (क्रमांक ४६६८ ) निसर्गरंग हे पुस्तक आम्हाला उपलब्ध होऊ शकले नाही. त्याबद्दलचा
एक डॉलर चौसष्ठ सेंट्चा ($१.६४) परतावा (पुस्तकाच्या पूर्ण किंमतीचा) तुमच्या क्रेडीट कार्डावर दिला आहे.

आपण सरसकट लगेच परतावा देत नाही नाही कारण काहीवेळेस पुस्तकाची किंमत आणि परताव्याची रक्कम वेगळी असू शकते (कमी किंवा जास्त दोन्ही असू शकते). याची अनेक कारणे असू शकतात. अगदी शेजार्‍यांनी पुस्तके घेऊन ठेवली आणि सांगायला विसरले असेही झाले आहे. त्यामुळे सगळी खातरजमा झाल्यावर परतावा दिला जातो. पण तुमच्या संदेशानंतर शक्य तितक्या लवकर परतावा दिला आहे.

पाठवायच्या वेळेस पुस्तक उपलब्ध नसेल तर सहसा तशी नोंद सोबतच्या पावतीवर असते. तुमच्या मागणीबरोबर ती राहून गेली म्हणून दिलगीर आहोत.

मायबोली खरेदी विभागात एखादे पुस्तक कार्टमध्ये टाकले की लगेच सेशन लॉग आउट होते आहे. पुन्हा लॉगिन केल्यावर पुस्तक कार्टमध्ये दिसते पण प्रत्येकवेळी पुस्तक कार्टमध्ये टाकले की लॉगआउट/इनची कसरत करावी लागते आहे.