बेफ़िकीर फॅन क्लब

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 12 October, 2010 - 03:39

मित्रहो,

मी जानेवारी २०१० पासून भूषण कटककर उर्फ बेफिकीर या वल्लीच्या संपर्कात आंतरजालाच्या माध्यमातून आलो. मायबोली खेरिज इतरही अनेक संकेतस्थळांवर त्यांचे लेखन्,विशेषतः गझला वाचल्या,चर्चिल्या.

मायबोली वर त्यांच्या कादंब र्‍या वाचल्या... आजही अक्षरशः नंबर लावून वाचतोय.... व मी पहिला,मी दुसरा... असा नंबर मिळवून आनंदित होतोय.

त्यांच्या सगळ्याच कथांनी वाचकांच्या मनात अक्षरशः घर केलेलं आहे.... अनेक गझलांतील शेर अंतर्मुख करतात....मी अनेकदा सुन्न झालेलो आहे.

त्यांच्या कथा,कादंबरी,गझलांची चातकासारखी वाट पहाणारे असंख्य वाचक आहेत.त्या सर्वांनी एकत्र येवून फॅन क्लब स्थापावा असे त्यांच्या च कादंबरीवरील एका भागाच्या चर्चेत सुचवले गेले ( नितिन बोरगे यांनी ) ... आणि मी त्यांचा सर्वोच्च चाहता आहे असे मला वाटते Happy आणि त्यामुळे मी त्याचं अध्यक्ष स्थान घेतलंय.....

आपण क्लब स्थापून काय करायचं? हे नंतर ठरवू... सध्या सर्व चाहत्यांनी यात सामील व्हावे ही नम्र विनंती.

बेफिकीर यांस नजरेसमोर ठेवून केलेली गझल आपणांसमोर ठेवत आहे.

कधी न करितो उशीर ,तू वक्तशीर मित्रा
कसे म्हणावे अम्ही तुला ''बेफिकीर'' मित्रा?

तुझ्या कथांनीच रंगले आसमंत आता
कशास उधळू गुलाल्,बुक्का,अबीर मित्रा?

सतेज सूर्यासमोर तुलना तुझी करावी
स्वतःस जाळून दूर करितो तिमीर मित्रा

तुफान काबूत ठेवले भावभावनांचे
जणू गृहस्थाश्रमातला तू फकीर मित्रा

तुझे नि माझे न काही नाते रुधीर पंथी
सदैव ''कैलास''ला असे तव फिकीर मित्रा.

--डॉ.कैलास गायकवाड

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

मी पण.

मी पण

मी पण. खरेतर त्यांच्या कथा , कदंबर्या वाचुन माबो सदस्य झाली

मी पण. खरेतर त्यांच्या कथा , कदंबर्या वाचुन माबो सदस्य झाली>>>+++१११

ते नवीन कादंबरी कधी लिहणार याच्या प्रतिक्षेत

असा फॅन क्लब पण आहे माहीत नव्हतं.. मला पण ऍड करा. मी पण माबो चे सदस्यत्व बेफि यांच्या बोका सिरीज मुळे घेतले होते.. कव्वा दाद देईल .. हा हा..

मी पण फॅन ऑफ बेफिकीर... बेफिकीर फॅन्सचे हे प्रतिसाद वाचत असाल तर प्लीज नव्याने लिहायला चालू करा आणि अपूर्ण लिखान पण पूर्ण करा.

मि swapnat sudha befin che katha vichar karte

tya divshi navryala itka bhar bharun sangat hote to full sadmya madhe

मी पण बेफिकीर फॅन... त्यांच्या कथा तर भन्नाट च असतात ... मायबोली सदस्यत्व घेण्यामागे असलेल्या 4 कारणांपैकी एक बेफिकीर..

मी पण.
बेफींची एखाद कँरेक्टर उभ करण्याची पध्दत अवर्णनीय आहे.

त्याच्या प्रोफाईल वर जावुन लेखण ह्या शब्दावर टिचकी मारा त्यांनी आतापर्यंत मायबोली केलेल सगळ्या कथा कादंबरी वाचता येतील.

मी पण बेफ़िकीर यांचा फॅन आहे.....त्यांची ओल्ड मंक लार्ज अॉ न द रॉक्स हि कथा वाचून मी मायबोली मध्ये प्रवेश केला.... लिखाणाची शैली तर आपण सर्वांना माहीत आहेच...... कैलास सर तुम्ही बेफिकीर यांना भेटत असाल तर त्यांना तेवढा अन्या पुर्ण करण्यासाठी विनंती करावी,अशी विनंती मी तुम्हाला करतो..... धन्यवाद