वाहतूक समस्या

Submitted by Anvita on 14 January, 2014 - 22:50

पुण्यातली वाहतूक व्यवस्था अपुरे रस्ते आणि वाढत्या गाड्या यामुळे फारच विस्कळीत झाली आहे. त्यात परत वाहतूक नियम न पाळणार्यांची संख्या पण खूपच आहे. अगदी तरुण मुले , मुली, काका, काकू ते पार वयस्कर लोन्कांपर्यंत सर्व वयोगटातील माणसे सिग्नल तोडत असतात . समजा आपण सिग्नल हिरवा व्हायची वाट बघतोय व सिग्नल बदलायला १० सेकंद उरली असली तरी लोकं मागून होर्न वाजवतात जणू काही आपण सिग्नल ची वाट पाहणे हा गुन्हा आहे. मधूनच भसकन indicator न दाखवता वळणे अगदी इतक्या जवळून जाणे कि गाडी घासली जाते कि काय असे वाटते.
हि समस्या पुण्यातच असेल असे नाही आणि सगळेच पुणेकर वाहतूक नियम तोडत असतात असेहि नव्हे पण आजकाल ' काय वाईट ट्राफिक आहे' हे बर्याच वेळा एकू येते . बरेच वर्षे अमेरिकेत राहिल्यामुळे असेल पण ह्या गोष्टींचा त्रास होतो . आता सवय झाली आहे. पण अशी सवय आपण करून घेतो . आपण वाहतुकीचे नियम पाळणे एवढेच आपल्या हातात असते .
आपले ह्याबाबत अनुभव काय आहेत? किंवा यावर उपाय काय?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्पाईक लावा.......वर त्याची काळाजी घ्यायला सीसीटिव्ही देखील लावा ? Uhoh

ओ होईल का हे ? त्यापेक्षा लोकांना सुधारायला लावा

नियम पाळायला लावले पाहीजेत वाहतुकीचे << अहो आम्ही (पुणेकर (पेठेमधले)) गाड्या शिस्तीतच चालवतो, किंवा तसे चालवण्याचा खुप प्रयत्न करतो पण वहातुकीला अडथळे फार इथल्या रस्त्यांवर, हातगाडी वाले, फेरीवाले रस्त्यातच गाड्या लावतात , रस्त्यात साठणारा राडारोडा तसेच लहान मोठे खड्डे पालीका बुजवत नाहीत, वहातुकीची अपुरी साधने, पुटपाथवरील झोपड्यांमुळे रस्त्यावरून चालणारे पादचारी, आणि त्यात हे सिग्नल्चे अड्थळे कोण पाळणार

१००

उदयन , अहो जर समस्या असेल तर मार्ग काढायला हवा ना. cctv चा वापर फक्त spikes वर लक्ष ठेवण्याकारातच होईल असे नव्हे तर सुरक्षितता या दृष्टीने पण होऊच शकतो .
स्वयंशिस्त असेल तर हे सगळे करण्याची गरज नाही . एकदा का नियम कडक केले कि आपोआपच शिस्त लागेल .
स- सा , तुम्ही म्हणता त्या कारणामुळे पण चिडचिड होतेच पण रस्त्यातील अडथळे आणि नको असलेले भरमसाठ सिग्नल्स या कारणास्तव जर नियम पाळलेच नाहीत तर अजूनच प्रोब्लेम्स होतील/ होतात . रस्त्यांचे योग्य नियोजन करणे हे पण तितकेच महत्वाचे आहे .

तुम्हाला असं वाटतं का की शालेय अभ्यासक्रमात अगदी लहान वयात वाहतुकीचे नियम हा अभ्यासक्रम असायला हवा.अगदी मुख्य विषय...लहान वयात यासाठी की हे लहान वयातले संस्कार/विषय शक्यतो पक्के बसतात डोक्यात.. स्पाईक वगैरे ऑप्शन खरेच चांगले आहे पण टू-व्हिलर त्यातून सहज निघून जाईल...

शाळॅत ठिक आहे पण पालकांनी घरी पण मुलांना शिकवले तरी चालु शकतेच.. दर वेळेला सगळे सरकारनेच शिकवायची अपेक्षा का ? आता काय मोदींनी चौकात उभे राहुन ट्राफिक सांभाळायचे काय ?
प्रत्येक गोष्ट शिकवायची गरजच काय ? शिकवायला प्राण्याला लागते त्यांना अक्कल नसते ... आता माणसांना देखील नाही का ?

उदयन पण प्रत्येक पालक एवढा दक्ष असतोच असं नाही... व्यापक पद्धतीने जायचं तर हा एक उपाय किंवा मग एखादं सचित्र पुस्तक तयार करुन वाचायला देणं... तशाही भारतात अनेक पद्धती अजून मागासलेल्या युगातल्याच आहेत... अगदी स्कूलबसपासून ते रेल्वेपर्यंत... आणि बरच काही...हे केव्हाच व्हायला हवं होतं...

प्रत्येक गोष्ट शिकवायची गरज पडू नये मान्य आहे उदयनजी. पण आजची परिस्थिती पाहता वाहतुकीचे नियम शाळेपासूनच शिकवण्याची गरज निर्माण झालेली आहे. दुर्दैवाने.

पण आजची परिस्थिती पाहता वाहतुकीचे नियम शाळेपासूनच शिकवण्याची गरज निर्माण झालेली आहे.<<< मला आठवते त्या नुसार आम्हाला हे शाळेत शिकवले होते. कितवी मधे ते आता लक्षात नाही, एकदा वहातूक शाखेने रस्त्यावरील अपघात / लोकांचा निष्काळजीपणा यावर एक व्हिडीओ दाखवला होता, पण पहाताना त्याचा परीणाम उलटाच झाला. मुलं लोकांचा वेंधळेपणा पाहुन खो खो हसत होती तर आर टी ओ चे अधीकारी आणि शिक्षक वर्ग माना खाली घालून उभा होता

व्हिडीओ चूकीचा दाखवला असणार... करमणूक होईल नाहीतर काय? एखादं उदाहरणच असतं असं... त्यावरुन जजमेंट्स नको करुयात.
आम्हाला तीन वर्ष आर.एस.पी. होतं...निदान मला तरी चैन नाही पडत वाहतूक नियम पाळल्या आणि पाळायला लावल्याशिवाय .. अगदी लहान वयात व्यवस्थित विषय अभ्यासक्रमात आणायला हवा.

आपण सगळ्यांनी राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहायचं का. शिवाय केन्द्रिय मंत्री नितीन गडकरी यांनाही पत्र लिहू.

विचारवंत त्यासाठी पिटीशन फाईल करावि लागेल नुसत्या पत्राचा विचार कितपत होईल कोणाला माहीत... माबोकरांना जमवता येईल का हे... जर खरच करायचं असेल तर सगळ्यांचं एकमत हवं...

आधी पत्र पाठवून पाहू. काही नाही झाले तर पिटीशन. रविवारी बसून जरा माझ्या पत्राचा मसूदा पक्का करुन इथे टाकतो. बाकीच्यांनीही करायला हरकत नाही. सगळ्यांतले सर्वोत्तम मुद्दे घेऊन एक पत्र पाठवूया.

इथे स्पाईक चा विषय आला होता तसे 'Tyre Killer' पुण्यातील 'अॅमनोरा पार्क' ने बसवले होते, 'No Entry' मधून कोणी उलटे येऊ नये म्हणून. पण आता हडपसर वाहतूक पोलिसांनीच अॅमनोरा पार्कला नोटीस पाठवली आहे की, परवानगी न घेता बसवलेले 'Tyre Killer' काढा अन्यथा कारवाई करू!

आता बोला!!!

Pages