वाहतूक समस्या

Submitted by Anvita on 14 January, 2014 - 22:50

पुण्यातली वाहतूक व्यवस्था अपुरे रस्ते आणि वाढत्या गाड्या यामुळे फारच विस्कळीत झाली आहे. त्यात परत वाहतूक नियम न पाळणार्यांची संख्या पण खूपच आहे. अगदी तरुण मुले , मुली, काका, काकू ते पार वयस्कर लोन्कांपर्यंत सर्व वयोगटातील माणसे सिग्नल तोडत असतात . समजा आपण सिग्नल हिरवा व्हायची वाट बघतोय व सिग्नल बदलायला १० सेकंद उरली असली तरी लोकं मागून होर्न वाजवतात जणू काही आपण सिग्नल ची वाट पाहणे हा गुन्हा आहे. मधूनच भसकन indicator न दाखवता वळणे अगदी इतक्या जवळून जाणे कि गाडी घासली जाते कि काय असे वाटते.
हि समस्या पुण्यातच असेल असे नाही आणि सगळेच पुणेकर वाहतूक नियम तोडत असतात असेहि नव्हे पण आजकाल ' काय वाईट ट्राफिक आहे' हे बर्याच वेळा एकू येते . बरेच वर्षे अमेरिकेत राहिल्यामुळे असेल पण ह्या गोष्टींचा त्रास होतो . आता सवय झाली आहे. पण अशी सवय आपण करून घेतो . आपण वाहतुकीचे नियम पाळणे एवढेच आपल्या हातात असते .
आपले ह्याबाबत अनुभव काय आहेत? किंवा यावर उपाय काय?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असे बोलणे बरे नाही पण युपी बिहारच्या मंडळींनीही वाहतुक शिस्तीचा तितकाच सत्यानाश केलाय. बहुतेक रिक्षाचालक तिकडचे आहेत, त्यांच्याकडे परवानाही नसतो आणि रिक्षा कुठुनही कशीही काढायची हेच त्यांचे एकमेव ब्रीद. त्यांच्याकडे कसलीही शिस्त नाहीय आणि इथे येताना तेच संस्कार सोबत आणलेत Angry

ट्रॅफिकच्या नियमांबाबत चंदिगढ सगळ्यात जास्त स्ट्रीक्ट आहे असा अनुभव आहे.>>>
चंदिगढपेक्षाही माझा शिलाँगचा अनुभव एकदम चांगला आहे ट्रॅफिकबाबत.
आम्ही अगदी दुर्गापूजेच्या काळात होतो शिलाँगमध्ये.पण चाललेल्या मिरवणूकांमुळे कुठेही ट्रॅफिक जाम नाही की हॉर्न्स आणि गाड्यांचा गोंधळ नाही. चौकाचौकात तीन तीन ट्रॅफिक पोलिस उभे होते आणि वाहतूक कंट्रोल करत होते. सगळ्या गाड्या एका रांगेत चालल्या होत्या. कुणीही गाडी मध्ये घुसवत नव्हते.
एरवीही इतक्याच शिस्तीने वाहतूक चालू असते असे कळले. Happy ट्रॅफिक पोलिस एकदम सतर्क आणि स्ट्रिक्ट आहेत तिकडचे. Happy

ट्रॅफिकच्या नियमांचे पालन करण्याबाबत हैद्राबाद सर्वात महान आहे.

इथे उलट्या बाजूने सर्रास गाडी चालवली जाते मग ती बाईक असो वा कार! मिलिटरी कँपाला पाणी पुरवणारे टँकरही याला अपवाद नाहीत.

हैद्राबादमधे अनेक ठिकाणी फ्री लेफ्ट्साठी बॅरिकॅड लावून वेगळी लेनच तयार केलेली आहे, तरीही ज्यांना लेफ्ट घ्यायचे नाही ते बिन्धास्त त्या लेनमध्ये जाऊन समोरचा सिग्नल हिरवा व्हायची वाट बघत बसतात. पाठीमागे लेफ्टला जाणारे खोळंबून बसतात.

रात्री १० नंतर जेव्हा रस्ते मोकळे असतात, तेव्हा त्या मोकळया रस्त्यांचा बाईकच्या रेसिंगसाठी वापर केला जातो. आता रेस लावतात ते लावतात, पण मध्येच बाईकच्या स्टँडला पाडून ठिणग्या पाडत जातात. लोकांना वाटावे की एखादे रॉकेटच रस्त्यावरुन धावत जातेय की काय!

चुकीच्या बाजूने ओवरटेक करण्यात तर यांचा नंबर पहिलाच असणार! अगदी स्टॉपवर उभ्या राहू पाहणार्‍या बसलाही हे लोक सोडत नाहीत. कालचाच अनुभव! बसमधुन उतरणार तोच समोरुन झूम्म्म करुन एक बाईक गेली. थोडक्यात बचावलो.

इथे रस्ता ओलांडणारा जगातला कुठलाही रस्ता ओलांडू शकेल असे वाटते. जीव मुठीत घेऊन रस्त्यातली एक एक लेन ओलांडत, हात दाखवत हळू हळू पुढे जावे लागते.

त्यात सगळ्याच गाड्यांनी फुल्ल बीम सोडलेला असतो. तिकडे बघत बघत रस्ता ओलांडताना डोळेच दिपतात. रस्ता ओलांडून झाला की डोळ्यांवर अंधारीच येते. सुरुवातीला जेव्हा हैद्राबादमध्ये नवीन होतो, तेव्हा वाटायचे की आपलेच डोळे खराब आहेत की काय?

पुण्याचा काही अनुभव नाही पण मुंबईत असले प्रकार कमीच आहेत.

हैद्राबादला ट्रॅफिक पोलीसांना कोणी भीकच घालत नाहीत. पॅरेडाईज चौकात ३-४ पोलीस उभे असतात. पण त्यांच्या नाकावर टिच्चून लोक सिग्नल तोडून पळतात. हे बिचारे चार पावले त्यांच्या मागे धावतात, मग हताश होऊन मागे आपल्या जागेवर येऊन उभे राहतात आणि परत वाहत्या ट्रॅफिकला शिस्त लावायचा प्रयत्न करतात.

हे अनेकदा बघितलेय, खरंच कीव येते ट्रॅफिक पोलीसांची. Sad

हैद्राबादेतील एक किस्सा: पब्लिक सिग्नलला उभी होती. एक डॉक्टर स्कूटरवर होते. लाइन सोडून अंमळ पुढे गेले तर पोलिसाकडे जो माइक होता त्यावर तो लग्गेच म्हणे: आप अ‍ॅनिमल डॉक्टर हैं क्या अलग से सम्झा ना पडेगा? सारी पब्लिक तोबा हसली. मी पण मसब ट्यांक ते बारा नंबर रोड बंही. परेन्त हसत हसतच आले स्कूटरीवरून.

मला पण ही फ्री लेफ्ट ची सवय फार नडली मुंबईत चालवताना. पण येथील महिला ट्रॉपिक पोलिस छान स्मार्ट वाटतात. गोरेगाव मुलुंड रोज करणार्‍या लोकांबद्दल मला फार आदर वाटतो.

अदृश्य होउन चौकात उभे राहावे व बेदरकारपणे व बिनदिक्कत वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांना मशीनगनने टिपावे. तेवढीच खायला काळ व भुईला भार झालेली लोकसंख्या कमी होईल. असा हिंसक विचार मनात येतो.जोपर्यंत फुग्याला टाचणी लावणार्‍यांचा बंदोबस्त होत नाही तोवर प्रबोधनाचा फुगा फुगवण्यात काही अर्थ नाही.

>>अदृश्य होउन चौकात उभे राहावे व बेदरकारपणे व बिनदिक्कत वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांना मशीनगनने टिपावे. तेवढीच खायला काळ व भुईला भार झालेली लोकसंख्या कमी होईल. असा हिंसक विचार मनात येतो

अगदी अगदी मला पण अनेकदा असे वाटते. निदान गाड्यांच्या टायरवर तरी गोळ्या घालाव्यात असे वाटते. Angry

प्रकाश जी,

"हेच बेशिस्त लोक परदेशात गेले कि अगदी व्यवस्थित वागतात व इथे आले की परत ये रे माझ्या मागल्या...." अस का हो लिहीलत? आपल्या एकुण लोकसन्खेच्या फक्त २% लोक परदेशान्मधे राहतात. अस वाटतय कि ईथली ही परिस्थीती जणु त्या बाहेरुन येणार्‍या लोकान्मुळेच असावि.

मला तर ऊलट वाटत, ईथे काहिसे बेशिस्त असलेले लोक पण एकदा परदेशाची हवा खाऊन आले कि मायदेशी पण व्यवस्थितच वागतात.

अर्थात बाहेर जाणारे मुळात सगळेच ईथे बेदरकार पणे वागत होते अस नाहीये. ईथे राहताना पण आम्ही कधी थुन्कत नव्हतो रस्त्यान्वर की कचराही टाकत नव्हतो.

अवान्तरः मला तुमच लेखन खूप आवडत आणि मि तुमचे सगळे लेख वाचुन काढले आहेत (ऊपक्रमा वरचे पण, मिपा वरचे पण). फक्त हे वाक्य आणि ते ही तुमच्याकडुन आल्यामुळे थोडस खटकल.. क्षमस्व!

युपीतील २ वर्ष कशी काढली त्याचं आता आश्चर्य वाटतं. तिथल्या सायकल रिक्षा आणि ऑटो-रिक्षा प्रचंड बेभरवश्याच्या. अन त्यात खास बोलण्याचा टोन.
एकदा आम्ही बेगमपुल (हो, हे एका चौकाचं नाव आहे) कडुन लाल-कुर्तीला जात होतो. {याला मिनी-तुळशीबाग म्हणता येईल}, तर रिक्षावाल्याने चक्क बाजारात रिक्षा घुसवली. कहर म्हणजे थोड्याच वेळात एक ट्रकवालाही मागेमागे आला. आणि कर्कश्य हॉर्न वाजवुन थकला, आणि खाली उतरला. त्याने रिक्षावाल्याला झापले, तर रिक्षावाला म्हणतो, "अब क्या उडाके लेके जायेगा? अगर हिंमत है तो रिक्षा के उपर से जाकर दिखा..."
मी म्हटल," भाईसाब, नुकसान आपका नही, हमारा होगा. हम यही उतरते है"
त्यावर तो चिडला आणि म्हणाला, " आप जैसे लोगो की वजह से ही ये ट्रकवाले हमारे उपर चढते है..."
आता बोला. एक तर स्वतः नियम तोडतोय, अन वर ट्रकवाल्याला झापतोय.... Sad

तिथे पोलिसांनाही भीक घालत नाही लोकं. मुलायमचा महिमा. पण मायवती असतांना, अगदी कमिशनरही तिला वचकुन असायचे आणि पोलिसही बरेच चांगले वागायचे, असे ऐकले होते. एकुण काय, यथा राजा तथा प्रजा.

बॅटरीवाल्या इ-रिक्शांचा प्रश्न खूप मोठा आहे. इ रिक्शा तर खूप्च रिस्की आहेत >> असं असेल तर 'आप' सरकारनं नवीन ३०००+ रिक्षा परवाने का दिलेत याबद्दल काही माहिती आहे का अल्पना? का त्यांनी फक्त मतांवर डोळा ठेवून आश्वासनपूर्ती केली आहे?

मनीष, माझ्या माहितीप्रमाणे या बॅटरीवाल्या रिक्शांना परवान्याची गरज नाहीये. बेसिकली तोच प्रॉब्लेम आहे. या रिक्शा २५० W पेक्शा कमी पॉवरच्या आहेत असं भासवलं जातं /सांगितलं जातं (इथल्या मोटर अ‍ॅक्टप्रमाणे २५० W पेक्षा कमी पॉवरच्या वाहनाला परवान्याची गरज नाहीये) . आणि त्यामूळे त्यांना परवान्याची गरज नसते. पण प्रत्यक्षात एकावेळी या रिक्शामध्ये किमान ४ ते कमाल ६-७ पॅसेंजर्स बसतात. त्यामूळे रिक्शाची मोटर पॉवर वाढवली जाते. (बहूतांशी रिक्शांमध्ये १२ V च्या चार बॅटरीज असतात. मोटर पॉवर - अंदाजे ६५०-८०० W).
त्याचप्रमाणे या रिक्षा फक्त आतल्या छोट्या रस्त्यांवर चालायला हव्यात, पण हल्ली पॅसेंजर्सना घेवून या रिक्षा मेन रोडवर पण फिरताना दिसतात.

सुरक्षेच्या दृष्टीने मला या रिक्षात बसायची भिती वाटते. सायकल रिक्षापेक्षा फास्ट जातात, दोन्ही बाजूंनी उघड्या आहेत. अपघातामध्ये काय होईल याचा विचार करून बघा. सध्या या रिक्षा कोणत्याच वाहतूक कायद्यामध्ये बसत नाहीत.
यांना सामावून घेण्यासाठी केंद्र सरकार वेगळी पॉलिसी /गाइडलाइन्स बनवणार होते. तोपर्यंत या रिक्षा बनवण्यावर दिल्लीत बंदी होती. सध्याच्या घडीला या रिक्षा गाझियाबादला बनवल्या जातात आणि तिथूनच दिल्लीत येत आहेत.

(आम्ही मध्यंतरी कॉलेजासाठी (अ‍ॅकॅडमिक परपज) या रिक्षा विकत घेण्यासाठी चौकशी केली होती म्हणून मला ही सगळी माहिती मिळालीये)

खरंतर सगळ्याच रिक्षा सुरक्षेच्या दृष्टीनं बेकार आहेत. पण जोपर्यंत सर्वांना चांगल्या सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होत नाही तोवर रिक्षांना पर्याय नाही असं दिसतंय.

>>ईथे काहिसे बेशिस्त असलेले लोक पण एकदा परदेशाची हवा खाऊन आले कि मायदेशी पण व्यवस्थितच वागतात.<<
तिकडे शिस्तबद्ध वाहतुक असते. नियम मोडले तर कडक कारवाई होते.त्या कारवाईला घाबरुन व्यवस्थित वागतात. ती काही त्यांची स्वयंस्फूर्त शिस्त नसते. तसेच नियम पाळण्यासाठी देखील पोषक वातावरण तिकडे असते. त्यामुळे ते तिकडे व्यवस्थित वागतात. इथे आले कि इथल्याप्रमाणे वागायला सुरवात करतात. देश तसा वेश.

>>खरंतर सगळ्याच रिक्षा सुरक्षेच्या दृष्टीनं बेकार आहेत. पण जोपर्यंत सर्वांना चांगल्या सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होत नाही तोवर रिक्षांना पर्याय नाही असं दिसतंय.

नॅनो हा पर्याय चांगला वाटतो रिक्षाला.

आज सकाळी माझ्या नणंदेचा accident झाला . एका नो एन्ट्री मधून येणाऱ्या माणसाने धडक दिली . तिला बराच मुका मार लागला आणि टू व्हीलर चे बरेच नुकसान झाले . ह्या incident मुळे मी आणि माझा नवरा ह्या बद्दल चर्चा करत होतो त्यावेळेस नवऱ्याला एक चांगली कल्पना/ ह्या समस्येवर तोडगा सुचला तो म्हणजे अमेरिकेत वापरतात ( नॉर्मली कार रेंटल च्या इथे ) तसे spikes बसवणे जेणे करून नो एन्ट्री तून कोणी यायचं पर्यंत केला तर गाडीचे टायर फुटेल आणि अशा प्रकारचे अपघात टळतील. कारण स्वत: च्या गाडीचेच नुकसान होते आहे म्हटल्यावर आपोआपच लोक अशा नो एन्ट्रीतून जाणार नाहीत .
हे spikes असे दिसतात .

image_9.jpg
आंतरजालावरून साभार .

अहो इथे लोक सोईकरीता स्पीडबेकर रात्रीत तोडतात.........तिथे हे स्पाईक किती दिवस राहतील ?

मी पुण्यात गेली १० वर्षे गाडी चालवतोय, इथे अजिबात शिस्त नाही असे नक्कीच नाही.

बहुतेक कार चालविणारे किंवा बाईकवाले शिस्तीतच चालवितात, त्याला अपवाद असणारच ते कुठे नसतात.
ट्राफीकचे प्रॉब्लेम बेशिस्त चालविण्याने होत नाहीत ते प्रामुख्याने रस्त्याच्या आणि सिग्नलच्या चूकीच्या नियोजनामुळे होत असतात. म्हणजे एखाद्या रत्यावर अनावश्यक सिग्नल असणे, रस्ता खोदताना आवश्यक पर्यायी रस्ता न पुरविणे किंवा मार्गदर्शक बोर्ड न बसविणे इ.

काही प्रश्न :
हे स्पाईक्स वन-वे वर दर १०० मी वर लावायचे का? आणि फुटपाथ वर पण लावायचे?
इमर्जन्सी गाड्या कशा जाणार? का काही स्वीच ठेवायचा उघड-झाप करायला? तो कुठे आणि कोण ओपरेट करणार?
वन-वे वर साईडला parallel पार्किंग करताना/ रिवर्स घेताना काय काळजी घायची? एकूणच रस्त्यावर रिवर्स घ्यायाचंच नाही का? वर उदयन म्हणतायत त्याला काय उपाय?
हा पर्याय फक्त रेंटल कारवाले का वापरत असावेत?

पुणे बरं म्हणा.कोल्हापूरात कुठलीही गाडी चालवून दाखवा... रस्त्यची खिल्ली उडवल्यासारखे चालवतात...
आमच्याकडे परवा रबरी स्पीडब्रेकर लावले..खिळे ठोकून...आठवड्याभरात उचकटून काढले. Proud
पुण्यातले नियम तसे कडक आहेत.

अमितव,
हे spikes नो एन्ट्री रस्त्याच्या एन्ट्री आणि exit लाच लावायचे throughout नाही .
रेंटल कार च्या इथे लावलेले असतात कारण गाडीच्या किल्ल्या गाडीतच असतात आणि त्या गाड्या कोणी चोरून नेऊ नये म्हणून हि सोय असते .
बाकी उदयन ह्यांनी लिहिलेल्या समस्येवर उपाय म्हणजे हे spikes लोखंडी असल्याने सहजा सहजी कापले जाणार नाहीत आणि तिथे cctv लावल्यास त्यावर लक्ष ठेवता येईल .

मी पुण्यात गेली १० वर्षे गाडी चालवतोय, इथे अजिबात शिस्त नाही असे नक्कीच नाही <<< +++१

spikes हे पुण्यातील रस्त्यांवर फारसे उपयोगी ठरणार नाहीत, कारण पुण्यातील वहातुकीमधे मोठ्या प्रमाणावर दुचाकी आहेत आणि जोडीला अत्यंत छोट्या जागेत घुसु शकणार्‍या रिक्षा.

पुण्यात अजिबात शिस्त नाही असे नव्हे पण वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या लोकांचे प्रमाण मात्र अलीकडे खूप वाढलेले दिसते त्यामुळे अपघात पण जास्त होतात .
spikes टू व्हीलर आणि रिक्षांकारता पण उपयुक्त आहेत चित्रात ते कदाचित मोठे दिसत आहेत.

हे असे spikes लावण्याची कल्पना माझ्या डोक्यात कित्येक वर्षांपासून आहे! कुठे तर सिग्नलला. जोवर सिग्नल हिरवा होत नाही तोवर संपूर्ण रस्त्यावर असे spikes येतील आणि हिरवा झाला की आत जातील किंवा रेल्वे फाटकावर जसे गेट असते तसे काहीतरी असेल अश्या अनेक कल्पना मनात आणून स्वप्नरंजन करणे हा माझा आवडता विरंगुळा होता! येनकेनप्रकारेण सिग्नल तोडण्याला आळा बसावा हा मुख्य हेतू. पण हे स्वप्नरंजन करणे शेखचिल्लीच्या स्वप्नासारखे आहे असे आता वाटते!

एका सुमो वाल्याला हटकलं की डावीकडे वळायचं तर इंडीकेटर का नाही दाखवला तर म्हणे इंडिकेटर कशाला दाखवायचा? अजून पुण्यात लोक खेड्यातच असल्यागत वावरतात.

जिज्ञासा , सिग्नल ला पण हवेतच असे spikes पण ते दर वेळेस उघडझाप करणे हे कदाचित त्रासाचे होईल म्हणून मी नो एन्ट्री ला म्हटले पण जर शक्य असेल तर सिग्नला ला बसवणे चांगलेच कारण सिग्नल तोडणाऱ्याची संख्या खूपच आहे .

Pages