पुनश्च उद्योग ....

Submitted by विनार्च on 19 June, 2014 - 08:18

आजवर इतके उद्योग माझ्या लेकीने केले आहेत की ही खरं तर उसका "उद्योगपती ऑफ द डिकेड " अ‍ॅवॉर्ड तो बनता है ... Wink (नुकतीच दहा पुर्ण केलीत ना आम्ही Proud )
तर अशाह्या उद्योगांसाठी दरवेळी नविन धागे माबोवर काढून भरपूर सर्व्हर स्पेस अडवण्यापेक्षा आम्ही सुट्टीतील उद्योगांचा एकच धागा काढत आहोत....
ही उन्हाळी सुट्टी आम्ही भरपूर उनाडक्या करण्यात घालवली पण दुपारच्या वेळात घराबाहेर पडण्यास बंदी असल्याने तो वे़ळ असा सत्कारणी लावला.....

सुरुवात करुया चित्रकलेपासून....
वारली पेंटिंग

20140615_193328.jpg20140615_193518.jpg20140615_193450.jpg

ह्या लोकांच्या बाबतीत आमच म्हणण अस आहे की "व्हेरी स्वीट पीपल.... कुण्णाच काहीही चालेलं असुदे सारखे नाचत असतात" Happy

हा आम्ही बर्‍याच दिवसांनी वॉटर कलरवर हात आजमावला....भरुन आलेलं आभाळ

20140615_192820.jpg

हे आमच आवडत कार्टुन कॅरेक्टर .. " चिप "

20140615_192701.jpg

(चिपेनडेल हे जोडनाव नसून दोन वेगवेगळ्या खारींची ही नाव आहेत अशी बहूमोल माहीती मला हे चित्र पाहूनच कळली. आता ही गोष्ट वेगळी आहे की सोबत एक तुक ही मिळाला Wink पण महत्वाच काय तर....ह्या दोन खारींमध्ये ज्याचे दात चिकटलेले अन नाक डार्क चॉकलेटी तो चिप आणि नाक रेड दातात फट तो डेल....संपल बाबा एकदाच, केवढ ते ज्ञान... आम्ही मेलं नुसत कार्टुन पहायचो Proud )

ह्याच दरम्यान आमच्याकडे माझी भाची रहायला आली. ती ह्यावर्षी चित्रकलेची दुसरी परीक्षा देतेय...तिच्या सोबत आमच्या मॅडमपण बसल्या चित्र काढायला...(हि सगळी चित्र तिने पहिल्यांदाच काढली आहेत फक्त पुस्तक वाचून)

स्मरणचित्र
20140615_192937.jpg20140615_193006.jpg

रंगवायचा आम्हाला भारी कंटाळा आला.... Happy

निसर्गचित्र
20140615_193159.jpg2013-09-17 17.46.41.jpg

संकल्पचित्र
20140615_192602.jpg20140615_193228.jpg

मुक्तहस्त चित्र
20140615_192912.jpg

ह्यात हात इतका बांधावा लागतो तरी ह्याला मुक्तहस्तचित्र का म्हणतात ,आई ?? ह्या प्रश्नाचे उत्तर मला अजूनही देता आलेले नाही Uhoh

अक्षर लेखनाचा कन्सेप्ट भाचीला समजावे पर्यंत आमची चित्र तयार ही झाली.... Happy
20140615_193041.jpg20140615_193108_0.jpg

हे आमचं ठसेकाम... खर तर हे भेंडीच्या ठश्यांच चित्र असणार होत पण भेंडी रंगवताना रंगलेले आमचे हात मस्त आयडिया देऊन गेले ...यातल आकाश नी जमीनच ब्रशने रंगवलीय.

20140615_193135.jpg

आता आमची दुसरी आवड ... माती काम (चिकन माती ) Happy
कॅट
IMG-20140611-WA0060.jpg

डॉग
IMG-20140611-WA0055.jpg

राक्षस
IMG-20140611-WA0069.jpg

हत्ती
IMG-20140611-WA0075.jpgIMG-20140611-WA0082.jpg

बॅलेरीना (काय बाई नाव तरी..... )
IMG-20140604-WA0026.jpg

बॅलेरीना पासून गणपती न पणती (रुपांतरण Wink )
IMG-20140604-WA0032.jpg

टॉकन पक्षी (उच्चार तपासून घ्यावा )
20140611_154029.jpg
रिफर करायला हा फोटो

20140612_104905.jpg

ट्वीटी
20140611_145811.jpg

शेपूट पहा आमच
20140611_145853.jpg

इस्टर बनी
20140602_180151-002.jpg

स्नो मॅन... (पांढरा रंग संपल्याने व सप्लायरने हात वर केल्याने कलरफुल वेशात Proud )
20140613_230040.jpg

मॅलीफिसन्ट - स्लिपींग ब्युटीची व्हीलन
20140614_170109.jpg

इतक करुनही एक दुपार फारच डोक्यात गेली...तेंव्हा केलेला उपाय ... Rofl )
20140609_184242.jpg

या नंतर आम्ही भिंती रंगवण्याच काम काढल....खर तर हॉलची भिंत रंगवायची होती पण खूप बार्गेन करुन गॅलरीवर मांडवली झाली.....
20140610_183032.jpg

पर्सनल हाईट चार्ट...
20140613_194448.jpg

(काढायच्या आधी माहित नव्हत की इतक चांगल काढेल म्हणून वॉटर कलर वापरू दिले..आता हे चित्र प्रिझव्ह कसं कराव? असा प्रश्न पडलाय ...)

तर हे व असे बरेच उद्योग करुन ही सुट्टी आम्ही संपवली.... पण सुट्टी संपली म्हणजे उद्योग संपले असं नाही....
वी विल बी बॅक सुन Wink Proud

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुपर डुपर आहेत सगळ्याच कलाकृती... Happy

मोठ्ठी शाबासकी अनन्या.... वेल डन Happy आणि असेच अजुन भरपूर उद्योग करत रहा आणि आम्हाला दाखवत रहा. तुला ऑल द बेस्ट! Happy

वरच्या सगळ्या पोस्ट्स ना +१ Happy

अतिशय सुंदर काढलीत सगळी चित्रे. हाईट चार्ट म्हणजे हाईट आहे एकदम. वॉलपेपर वाटतोय. खुप शाबासकी गं तुझ्या लेकीला.

अनन्या............................................ tusi great ho.gif

तुस्सी ग्रेट हो डिअर!!

हा फार जिव्हाळ्याचा विषय आणि लहानपणी आरंभशूर या पदवीमुळे व पसारा कोण आटपणार या मुळे अस्मादिकांच्या उत्साहावर पाणी घालायचे काम इमानेइतबारे केले... Sad त्यामानाने तुझे मात्र खूप कौतुक हो विनार्च..
चिप न डेल ची बरीच अमूल्य माहीती मिळाली Happy आम्ही सुद्धा डोनाल्ड ला सतावणार्‍या वात्रट खारुटल्या (असलं या बायोने वाचलं तर कितीक तुक मिळतील देजा :अओ:) म्हणूनच पाहायचो ही कार्टून सिरीज.

अगं स्मरण चित्र आणि जास्वंद काय उच्च काढलीयेत तिने... गाबतीणीचे (कोळणीचे) स्मचि तर ___/\___ आमचे व्यक्तीचित्रांमधले हात पाय तर धनुर्वातासारखे बेंड व्हायचे.... आणि काय बिशाद त्या दोन डोळ्यांची सारखे दिसण्याची?? Proud

सगळं चिकणमातीकाम क्युटेस्ट. मॅलीफिसन्ट (माहीतीत आणखी भर!!), इस्टर बनी, ट्विटी आणि टॉकन चा डोळा तर महान!!! आणि डोक्यात गेलेली दुपारही मस्तच!! Happy

हाईट्चार्ट तर हाईट ऑफ आर्ट.... खूप शाब्बासकी....
प्रोटेक्टर स्प्रे मिळतो गं तो करून घे त्या वॉटर कलर पेंटींग वर... एकंदरीत सुट्टी खूप दमदार गेलेय!!!

.

अर्चना अनयाला खुप मोठ्ठी शाब्बासकी दे.

फारच कलावंत आहे मुलगी. तिच्या कलेला तू अजुन प्रोत्साहन देशील यात शंकाच नाही.

अनन्याला शाब्बासकी. अगदी मुरलेल्या कलाकाराचे कृत्य आहे असे वाटते.

जास्वंदीचे फूल आणि हाइट चार्ट तर जबरदस्त सुरेख !!

चिकणमातीकामही मस्तच

तुमचंही कौतुक विनार्च

अर्चू, अनन्या इतकंच तुझंही कौतुक Happy

तुला हे सगळं करताना पाहिलं की मला माझी आई आठवते Happy

अशीच सोबत रहा कायम!
तूही इतकी गोड आहेस ना की तुझ्याच चांगुलपणाचं फळ असं परत दिलंय बघ देवाने तुला Happy

खरंतर काही तरी दुसरं सांगायला मी हा बीबी उघडला पण परत वाचलं सगळं, सगळे प्रतिसाद आणि जे लिहायचं ते विसरून गेले Uhoh

पुन्हा आठवलं की सांगेन Happy

बाप्रे!!! __________/\__________ येवढच करु शकते मी! इथे लिहायचीही भिती वाटतेय आता मला Happy अनन्याला खुप खुप गोड पप्पीज.... आणि मोठ्ठी शाब्बासकी!!! Happy

ग्रेट काम करतेय तुझी लेक Happy तिच्या हातात सफाई आहे शिवाय प्रचंड समज आहे तिला त्या प्रत्येक कामाची.. म्हणूनच पहिल्यांदा करत असलेल्या गोष्टींतही सराईतपणा आहे.. माध्यम कोणतंही असलं तरी तिला कुठेही जरासुद्धा फरक पडलेला दिसत नाहिये बघ!

चांगलं खतपाणी घालते आहेस गं तू तिला.. बहरू देत तिची कला अशीच दिवसेंदिवस Happy
खरंच थँक्स फॉर शेअरिंग..

विनार्च,
अग तु अनन्याला एलिमेंट्री च्या परीक्षेला आत्ताच बसवुन टाक ..... काही ही तयारी न करता ती आरामात पास होइल.स्मरण चित्रे, संकल्प चित्रे, नेचर, फ्री हँड, लेटरींग हे सगळे नी त्याचे रंगकाम मस्तच केलय. त्या परीक्षेचा सगळा अभ्यास तयार च आहे तिचा.

बाकी मातीकाम तर खुप सुन्दर.. तो जांभळा टॉकन पक्षी खूऊऊउप आवडला. तिला काय करायचे आहे याची कल्पना तिच्या डोक्यात एक्दम फिट असते बघ. एखाद्या कसलेल्या कलाकारासारखे काम केलय. डोक्यातला तीर तर केवळ अप्रतिम.

भिंतीवरचे काम तर व्वा...
आणि तुला पण कुर्निसात...

५-६ वर्षापुर्वी हसबंड (:)) ला म्हणाले.. एका भिंतीवरचा रंग खराब झालाय.. मी तिथे मोट्ठे कार्टुन काढते..... पण मला परमिशन मिळाली नव्हती. ..... म्हणुन अनन्या ला भिंत रंगवायची परमिशन देणारया तुझे खुप कौतुक.

अनन्याला खुप खुप शाबासकी ग.

दीपे Lol

आता दाखव त्यांना ही चित्र आणि सांग बघा याला म्हणतात पाठिंबा Proud
माझ्यातला कलाकार तुम्ही जागा झाल्या झाल्या असा मारलात? शोनाहो अगदीच Proud

अरे बापरे ....किती कौतुक केलं आहे तुम्ही सगळ्यांनी....भरुन आलं अगदी ___/\___ Happy
भित्तीचित्र टिकवण्याच्या स्प्रेची शोधा शोध सुरु आहे....
दिनेशदा इतक्या मोठ्या कलाकाराला त्रास देणे बरोबर वाटत नाही म्हणून त्यांच्याशी संपर्क नाही केला पण त्यांची लेखमाला वाचून दाखवते लेकीला.
कौतुक करणार्‍या सगळ्या काका मामा आणि मावश्यांसाठी अनन्या कडून बिग थॅन्क यू Happy
आणि ही एरियल...
20140620_152726-001.jpg

अप्रतीम ....लेक..आईवर गेल्याय...

अमेझिंग सफाईदार काम आहे सगळच. सॉल्लिड आहे तुमची अनन्या. >>++११

Pages