हास्यपंचमी: ३ जुलै, 2009 रात्री सुयोगचा कार्यक्रम.

Submitted by अजय on 7 July, 2009 - 23:46

३ जुलै, 2009 रात्री मराठी रंगभूमीवरचे २१ आघाडीचे कलाकार घेऊन सुयोग ने सादर केलेला कार्यक्रम : हास्यपंचमी त्याबद्दलच्या प्रतिक्रीया.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसा झाला हा कार्यक्रम? सगळी एक से एक नावं होती, त्यामुळे उत्सुकता..:)

हास्यपंचमी ठीक झाला. त्यांनी विनोदी नाटकांच्या प्रवासाचा आढावा घेतला होता. सगळ्या प्रसिद्ध नाटकातील १-१ दृश्य दाखवुन. असा मी असा मी मधले पण दृश्य होते. पळा पळा कोण पुढे जातो ते ह्या नाटकातला भाग इतका बोर होता की अर्ध्याहुन अधिक लोक वैतागुन टाळ्या शिट्ट्या वाजवत होते, काही जण निघुन गेले. नानानेपण मुलाखतीत एका ठिकाणी पळा पळाला टोला मारला. Proud
नंतर मात्र प्रशांत दामले आल्यावर त्याने सही उचलुन धरले त्यामुळे आणि यदा कदाचित च्या टीम मुळे शेवटचा एक तास खूप मस्त झाले.

अजून एक म्हणजे 'सौजन्याची ऐशी तैशी' मधला शेजार्‍यांचा सीन होता.. तो ही अत्यंत पकाऊ होता...

रात्री दहा वाजून गेल्यामुळे बरेच लोक या 'पकाव' प्रकारामुळे उठून गेले. आणि त्याना पुढचे प्रवेश चुकले..

लग्नाची बेडी आणि असामी असामी सोडले तर पहिले सगळे सीन्स अतिशय रटाळ होते. पळा पळा नंतर सहनशक्तीची परिसीमा झाल्यावर बरेचसे लोक उठून गेले. प्रशांत दामलेसाठी थांबायची खूप इच्छा होती पण तो कधी येईल हे माहित नसल्याने आणि समोरच्या स्टेजवरचे डोळ्यावर आणि कानांवर होणारे अत्याचार फारच तीव्र होऊ लागल्याने आम्हाला पण जावं लागलं.

बर्‍याच लोकांनी सांगितले की ते रात्री दहानंतर उठून आले. तो पर्यंत तर पळा पळा चा भाग संपला होता. गंमत म्हणजे त्यातल्या एक दोघांना विचारले ते 'पळा पळा' काय होते हो, तर म्हणे आठवत नाही!

उगाच त्या प्रयोगाला का नावे ठेवा? आम्ही विचार केला, त्यानिमित्ताने, दिवसभराच्या कार्यक्रमांनी थकलेले आम्ही, उगाच जाग्रण करण्यापेक्षा, लवकर उठून येण्याची संधि मिळाली, नि रात्री छान झोपलो, म्हणजे दुसर्‍या दिवशी पुनः ताजेतवाने.

Happy Light 1

हा कार्यक्रमचा व्हिडीओ असेल का कुठे?
महिन्याभरात झगमग वर येईलच पण ते खुप संक्षिप्त असेल.

मला सुयोग या संस्थेबद्दल नितांत आदर आहे आणि यापूर्वीच्या अधिवेशनात झालेले सुयोगच्या नाटकांचे प्रयोग तो दर्जा टिकवणारे झाले होते. पण हास्यपंचमीच्या अधिवेशनातल्या प्रयोगाबद्दल तसे म्हणता येणार नाही.

कार्यक्रम सुरुवातीला चांगला चालला. पण नंतर खूप लोक उठून गेले. त्याना नीट ऐकू येत नव्हते, उशीर झाला म्हणून निघाले अशी बरीच कारणे सांगितली जातात.

१. ऐकू येत नव्हते म्हणावे तर काही "थोर" कलाकार चक्क मधे विसरत होते आणि त्यांना चालू असलेले प्रॉम्प्टींग व्यवस्थीत ऐकू येत होते.
२. उशीर झाला म्हणावे तर उठून गेलेले लोक सभागृहाबाहेर घोळका करून गप्पा मारत होते.

मी काही मंडळीना विचारून त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. अनेक कारणांचे एकत्रीकरण झाले आणि लोकांचा राग वाढला.

१. भारतातून आलेल्या आणि व्यावसायिक रंगभूमीवर काम करणार्‍या कलाकारांकडून तशाच दर्जाची अपेक्षा रसिकांची असते. या कार्यक्रमात काही कलाकार चक्क कागद घेऊन वाचून दाखवत होते, काही डायलॉग विसरत होते. काहिंना चाललेले प्रॉम्प्टींग ऐकू येत होते. एका प्रवेशात प्रायोगीक रंगभूमीप्रमाणे खोटी खोटी बाटली आणि खोटा खोटा ग्लास घेऊन पिणे दाखवले. म्हणजे वेषभूषा Realistic, सेट, इतर प्रॉप्स realistic पण ग्लास हवेतला.

२. काही कलाकाराना फक्त २-४ वाक्ये होती. (आणि संपूर्ण अधिवेशनात त्यांचे तेवढेच काम होते). मग भारतातून इतक्या मोठ्या कलाकाराना इतक्या छोट्या कामासाठी आणायचे कशाला असा प्रश्न विचारला गेला.

३. स्थानिक कलाकाराना या अधिवेशनात कमी संधी मिळाली अशी दुखरी नस कुठे तरी डोकावून गेली. व्यावसायिक कलाकाराना इतका खर्च करून बोलवायचे पण ते जर त्यांचे १००% कष्ट देणार नसतील तर आम्ही त्यांच्याबद्दल सहानुभुती का दाखवावी असाही प्रश्न विचारला गेला.

४. जेंव्हा एकाच वेळेस एकापेक्षा जास्त कार्यक्रम असतात तेंव्हा कार्यक्रम आवडला नाही याचा त्रास होतोच पण त्यावेळेस दुसरा चांगला कार्यक्रम मुकला की काय यामुळेही जास्त त्रास होतो.

मी कार्यक्रम शेवटपर्यंत पाहिला नाही. पण ज्यानी शेवटपर्यंत पाहिला त्यानी नंतर तो पुन्हा खूप चांगला झाला (विशेषतः यदाकदाचित मधला भाग्) असे आवर्जून सांगितले.

सुरुवातीला गच्च भरलेले सभागृह

IMG_0035.jpg

प्रेक्षक उठून जाताना सुरुवात झाली
IMG_0038.jpgIMG_0040.jpgIMG_0042.jpg

आणि मग प्रेक्षक जातच राहिले
IMG_0043.jpgIMG_0044.jpgIMG_0045.jpg

मी बाहेर पडलो तेंव्हा सभागृह बरेचसे रिकामे झाले होते.

IMG_0046.jpg

हा कार्यक्रम आम्ही येत्या शनवारी परत ठेवणार होतो. सुधीर भटांसोबत तसे बोलनेही चालू होते. न ठेवायचा निर्णय घेतला. बरे झाले नायतर लोकांनी शिव्या दिल्या असत्या.

अजयराव तुम्ही तर पुरावेही सादर केले. Happy

ह्या कार्यक्रमाची तुलना बहुदा सिअ‍ॅटल मध्ये झालेल्या सुरेश वाडकरांच्या कार्यक्रमाशी करता येईल का? ते ही गाणेच विसरत होते. पब्लीक उठून निघून गेले.

याबद्दल असे ऐकले की या कार्यक्रमाचे संयोजन आधी केलेच नव्हते. अगदी आयत्या वेळी जसे सुचले तसे दाखवले. एका कार्यक्रमानंतर दुसरा कुठला घ्यायचा हे सगळे आयत्या वेळी ठरत होते. पळा पळा नंतर काय असावे याचा विचार नक्की करून, त्याची तयारी करेस्तवर वेळ मिळावा म्हणून तो कार्यक्रम चालूच राहिला.
Happy Light 1

>>याबद्दल असे ऐकले की या कार्यक्रमाचे संयोजन आधी केलेच नव्हते
झक्की, हो. मलाही असेच कळले. आदल्या दिवशी हॉटेलमध्ये तालिम सुरु होती.. इ.

>> नानानेपण मुलाखतीत एका ठिकाणी पळा पळाला टोला मारला. >>
ओह असा रेफरन्स होता का? नानाची मुलाखत पाहताना लक्षात आले की तो आधीच्या दिवशीच्या कोणत्या तरी कार्यक्रमाबद्दल बोलत होता. पण काय ते कळने नव्हते.

>>> या कार्यक्रमाचे संयोजन आधी केलेच नव्हते

???????
हे अक्षम्य आहे!!!

-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

असे आपले तुम्हाला वाटते. मी भारतात असताना मला असे सांगण्यात आले की, अमेरिकेतल्या लोकांना संगिताचे, नाटकांचे तसे ज्ञान कमीच. एकूणच, अमेरिकेतल्या लोकांना काय कळते?

म्हणून इथल्या संगिताच्या मैफलीत प्रसिद्ध लोक हातचे राखून गातात, नाटक कंपन्या प्रयोग करण्यात तितकेसे लक्ष घालत नाहीत. अर्थात तरी आपण त्यांना बोलवतोच.

एकदा त्यांना बोलावणे बंद केले नि आपल्याच लोकांनी उत्कृष्ट कार्यक्रम करायला सुरुवात केली की मग असे होणार नाही. आपल्याला प्रामाणिकपणे, जास्तीत जास्त मन लावून केलेले कार्यक्रम पहायला मिळतील. आशा भोसल्यांची तीस चाळीस वर्षांपूर्वींची गाणी अगदी सीडी वर ऐकलीत तरी आवाजातला फरक जाणवेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपले क्रिकेटर अटीतटीने खेळतात, पण तेच बांगला देश किंवा हॉलंड, आयर्लंडविरुद्ध हसत खेळत निष्काळजीपणे खेळतात.

Happy Light 1

तुम्ही सर्वांनी हे स्वीकारू नका. आपण पैसे भरतो तर त्या करमणुकीच्या दर्ज्यावर आपला हक्क असतो. भारतात पण असे चाल्वून घेतले जाणार नाही. प्रोफेशनल अमेरिकन कलाकार असे करतील का? नाही. आम्ही इथे friends चे रीरन सुद्धा प्रेमाने बघतो कारण कामाचा दर्जा उच्च आहे.

तिकडून येणार्‍या कलाकारांचा एक समज असतो की आपण या अमेरिकेतल्या लोकांवर उपकार करतो आहोत! शिवाय यांना काही कळत नाही, उगीच आपले संस्कृति जपतो हे दाखवायला काही तरी करायचे! त्यांना काहीहि दाखवले,' महाराष्ट्रातून आलेले' तरी ते मुकाट बघतील, ऐकतील.

दहा वर्षांपूर्वी आशा भोसले यांच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्या कार्यक्रमाची टेप ऐकली. त्यात जी गाणी होती तीच परत या वर्षी. त्या टेपवर सुद्धा ती जास्त छान वाटत होती. तीच 'आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला.' ही नक्कल. कोण तो अमिरखान, नि नूरजहाँ बिचारे शांतपणे थडग्यात पडले होते त्यांना उठवून उठवून त्यांची नक्कल!!

इतर हज्जारो चांगली गाणी आहेत त्यांची, झाले युवति मना इ. ती का नाही गात?
पुढच्या वेळेला त्यांना बोलवण्या आधी (नि नक्की बोलवतीलच! दुसरे कोणि माहीतच नाहीत इथल्या लोकांना.) त्यांना गाणी लिहून द्या, की ही म्हणायची. नि सुयोगवाल्यांना सुद्धा सांगा, हास्यपंचमी म्हणजे शिमगा नव्हे! जर काही चांगले आधी तयारी केलेले असेल तरच आणा. (त्यांना पण पुनः बोलवतीलच, कारण दुसरे कुणि....)

Happy Light 1