हे केस शुभ्र झाले, साठी समोर आली!

Submitted by profspd on 6 June, 2014 - 06:18

हे केस शुभ्र झाले, साठी समोर आली!
तेव्हा कुठे जगाच्या कळतात हालचाली!!

तिरपे, सरळ बघितले, तिरफाकडे बघितले....
बुद्धीबळातल्या मज कळतात सर्व चाली!

ओझे तुझ्या मनाचे तर तूच वाहतो ना....
देईल कोण त्याची तुजला अरे हमाली?

उच्छाद आणला या सा-या पिलावळींनी.....
कुठली अरे, कळेना मांजर असेल व्याली!

तैशी कमीच झाली पत्रे अता मुलांची....
पत्रामधून सुद्धा नाही पुसत खुशाली!

मीही बघून त्यांना तलवार म्यान करतो.....
बघ, एकजात त्यांच्या हल्ली भितात ढाली!

झाली युगे, तुझी मी बघतोच वाट आहे.....
माझी स्मशानयात्रा आता कुठे निघाली!

मी भाव शेअराचा अस्थिर घडीघडीला.....
वरवर क्षणात जातो, येतो क्षणात खाली!

ही ऊब काळजाची गझलांमधे उतरली.....
गझला नव्हेत माझ्या या रेशमी दुशाली!

तू शीक राजकारण, होशील मग शहाणा.....
मग काय चालले ते समजेल भोवताली!

हे कालचे दरिद्री श्रीमंत आज झाले.....
गरिबांस मात्र उरला नाही कुणीच वाली!

जमणार ना कधीही येथे तुझे कुणाशी....
सारे उडाणटप्पू, अन् गुंड, अन् मवाली!

मी का न विरघळावे, पाहून साजणीला?
लावण्य जीवघेणे, वरती खळ्याच गाली!

वाटे फिकाफिकासा हा लालिमा नभाचा.....
अधरांवरी प्रियेच्या स्वर्गीय एक लाली!

सांभाळ तू स्वत:ला, बघ लोक कोण जमले.....
ह्य फक्त वळचणीच्या आहेत सर्व पाली!

मी सर्व अग्निदिव्ये करणार पार आहे....
तू काय काय आहे लिहिलेस सांग भाली?

आला वळीव आला, तैनात लोकहो व्हा.....
वेळेत घ्या भरोनी आपापल्या पखाली!

मज बायकोहुनी रे, जास्तीच धाक त्यांचा.....
माझ्याहुनी वयाने मोठी हरेक साली!

वय हे उतार माझे, जाऊ नकोस त्यावर......
होतो तरूण तेव्हा केल्या किती धमाली!

मज जिंदगी अता तू हासून अल्विदा कर.....
माझी निघावयाची आताच वेळ झाली!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"अलीबाबा आणि चाळिस चोर" च्या धर्तीवर "देवसर आणि ६० काफिये" अशी कथा आली तर काय धम्माल येइल नै ?
(६० जमीनी असे असेल तर मग कै विचारूच नका !!)

बाय दि वे ही जमीन देखिल ढापलेलीच आहे

उरली विरंगुळ्याला ही सांजवेळ माझी
उरल्या तुझ्या जराश्या प्राणात हालचाली

~सुरेश भट

वैवकु.

डेव सर एकटे ४० लोकान्च्या जमिनी चोरत बसले आहेत.

त्यामुळे एक चोर आनी चाळीस अलिबाबा असे म्हनावॅ का?

एक चोर आनी चाळीस अलिबाबा<<<< हाहाहाहाहाहाहाहाहाहाहा......

अगदी पर्फेक्ट बघा !! लक्षुम्बाई होवुन जवुद्या एक कथा तुमची ह्या वरून !!!

तिरपे, सरळ बघितले, तिरफाकडे बघितले.........?????

उच्छाद आणला या सा-या पिलावळींनी.....
कुठली अरे, कळेना मांजर असेल व्याली!

तैशी कमीच झाली पत्रे अता मुलांची....
पत्रामधून सुद्धा नाही पुसत खुशाली! (:(:-

पाल, मान्जर, वाली, शेअर बाजार, पत्र, पखाल, लाली, वळीव , बायको, गुन्ड , स्मशान , बुद्धीबळ ...... साक्षात व्यासान्ची प्रतिभा मिळालेली आहे.

हे केस शुभ्र झाले, साठी समोर आली!
तेव्हा कुठे जगाच्या कळतात हालचाली!!

तिरपे, सरळ बघितले, तिरफाकडे बघितले....
बुद्धीबळातल्या मज कळतात सर्व चाली!

ओझे तुझ्या मनाचे तर तूच वाहतो ना....
देईल कोण त्याची तुजला अरे हमाली?

उच्छाद आणला या सा-या पिलावळींनी.....
कुठली अरे, कळेना मांजर असेल व्याली!

तैशी कमीच झाली पत्रे अता मुलांची....
पत्रामधून सुद्धा नाही पुसत खुशाली!

मीही बघून त्यांना तलवार म्यान करतो.....
बघ, एकजात त्यांच्या हल्ली भितात ढाली!

हे शेर आवडले. पहिला सर्वात आवडला. त्यातली पहिली ओळ आणि ते शीर्षक म्हणून वापरल्याने पहिल्यांदाच नीटनेटके शीर्षक असलेली गझल वाटली.

स्मशानयात्रा, सरण रचणे, स्वतःचे मरण बघणे हे गझलकारांचे स्वानुभव की अभ्यासक्रमातला परीक्षेत येणारा अनिवार्य प्रश्न म्हणायचा ? बाकी गझल स्वानुभवावर लिहावी हे कुठेसं वाचलं ते वाचून असा (काही) नियम (असलाच) तर दुर्दैव वाटू लागलं. कल्पनाभरारीला वावच नसेल तर आपल्या जिलेब्या ब-या !

अंधूक नेत्र झाले, चमडी मलूल झाली
ना संथ मात्र झाल्या रंगीत हालचाली!

याच जमीनीवर मतला तयार झाला. एक हझल तयार होऊ शकेल.

बाकी गझल स्वानुभवावर लिहावी हे कुठेसं .........

अनुभव दोन प्रकारचे असतात बी.ए. (ब्र.आ.) एक देहाने घेतलेले अनुभव आणि एक मनाने घेतलेले

ह्या मनाने घेण्याच्या अनुभवाचा एक फार सुंदर शेर आहे त्यावरून तुम्हाला जास्त छान समजेल बहुधा
शेर समीर चव्हाणांचा आहे

करू दे काम बघण्याचे मनाला
तुझा शृंगार जोवर होत आहे

धन्यवाद

Happy

वैवकु,
प्रतिसाद छान आहे. आवडला. सहज समजेल असाच.
कृपया माझ्याबाबतीत गझलेतलं कळते असा समज काढून टाकावा. हळूहळू अज्ञान पण लक्षात येईलच. आपण मला गझलगंवार किंवा प्रतिसादावरून गझलझक्की देखील म्हणू शकता.

कडक कायदे वाचले की कापरं भरतं त्यातून मग अज्ञान प्रकट करावेसे वाटते. कधी कधी वाटतं नवे गझलधटिंगण निवडून आले तर गझलेची राज्यघटना बदलली जाईल कि काय ! (हा माझा आगामी बोका आहे).

वैवकु,
प्रतिसाद छान आहे. आवडला. सहज समजेल असाच.
कृपया माझ्याबाबतीत गझलेतलं कळते असा समज काढून टाकावा. हळूहळू अज्ञान पण लक्षात येईलच. आपण मला गझलगंवार किंवा प्रतिसादावरून गझलझक्की देखील म्हणू शकता.

कडक कायदे वाचले की कापरं भरतं त्यातून मग अज्ञान प्रकट करावेसे वाटते. कधी कधी वाटतं नवे गझलधटिंगण निवडून आले तर गझलेची राज्यघटना बदलली जाईल कि काय ! (हा माझा आगामी बोका आहे).

मायबोलीत गझला लिवताना एफ एस आय किती द्यायचा यावर नियम ठरायला हवा. लोक एवढ्यास्या जमिनिवर उन्च टॉवर बान्धत आहेत.

लक्ष्मी गोडबोले | 8 June, 2014 - 09:25 नवीन

मायबोलीत गझला लिवताना एफ एस आय किती द्यायचा यावर नियम ठरायला हवा. लोक एवढ्यास्या जमिनिवर उन्च टॉवर बान्धत आहेत.
<<<

हा एकच प्रश्न नाही आहे. लोक लाटलेल्या जमीनीवरही बारीकसारीक बांधकामे करून तगलेले आहेत. गझलगुंठामंत्री असे एक पद निर्माण झालेले आहे.