योगानंदातील दिवस
'योगानंदातील दिवस ' हया विषयी काहीतरी लिहावं असं खूप दिवस मनात होतं. आत्ताही लिहायचंय पण काय ते ठरलं नाही. बघुया काय जमतंय ते.
योगानंद सहनिवास, अकरा इमारतींची सोसायटी . त्यातही प्रत्येकीच्या विंग्ज आहेत. दोन मोठी मैदाने आणि एक देऊळही आहे.लग्न होऊन जेव्हा इथे आले तेव्हा मला हे कोकणातील गावंच वाटलं होतं कारण बहुतेक सर्व चित्तपावन. मी गावातील असूनही अनुभवली नाहीत इतकी व्रतवैकल्य मी इथे पाहिली. त्यात मी थोडी पुरोगामी विचारांत वाढल्यामुळे,काही वर्ष पुण्यात एकटी राहिल्याने हे सर्व मला बुचकळ्यात टाकणारं होतं. पुण्यात म्हणजे अगदी पेठांतही मला पुरोगामी कुटुंबच मिळाली. म्हणजे भटकाकांचा पर्वतीकट्टा , वझेकाकूंच बॅडमिंटन कोर्ट असलेलं महिलामंडळ आणि एकूणच त्या हवेतच असलेलं शहराचं व्यक्तिमत्व याचा माझ्यावर परिणाम झाला होताच.त्यामुळे योगानंदमधे अगदी श्रावणापासून सुरू होणारी व्रतवैकल्य आणि ते पाळणारी लोकं पाहिल्यावर मी चाट पडले होते. सध्या आठ वर्षांनी मी योगानंदात काही दिवसांसाठी रहायला आले आहे.तेच,तसंच वातावरण आहे.मलाही माहेरी आल्यासारखेच वाटले आल्या आल्या. जुनी जागा असूनही काहीच गैरसोय वाटली नाही घरात. भिंतीतली जुनी लाकडी मांडणी, ओट्यावरची मांडणी,भिंतीवर बसवून घेतलेलं लाकडी कपाट, फ्रिजची जागा, भांड्याच्या साबणाची जागा, जुनं ताटाळं ह्या सा-या जुन्या जागा मला सराईतपणे मिळाल्या. ट्राॅली आणि कैबिनेट्समधे रमलेली मी ह्यंच्यातही सहज रमले. उलट लहानशा जागेत शक्य तितका कोपरा, भिंतींचा वापर करून बनवलेल्या सोयी हे इथल्या धोरणी, मध्यमवर्गीय आणि काटकसरी जीवनाचं प्रतीक आहे हे पुन्हा पटले.
सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे इथे मला एक दिवस सकाळी वासुदेव भेटला. किती दिवसांनी पाहिला असेल मी ! नकळत माझा हात पर्सकडे गेला. एक दिवस......रविवार असणार कारण तेव्हाच ह्या लोकांना सोसायटीत परवानगी मिळते.....नंदीबैल आला होता.मस्त झूल वैगरे घालून. कल्हईवाले,धारवाले, अवस मागणारी बाई,हे सर्व खूप दिवसांनी अनुभवले. काल-परवाच खाली उतरले तर समोरच्या घराबाहेर बोहारीण बसलेली पाहिली.ही सर्व मंडळी इतिहासजमा झाली असं वाटंत असताना योगानंदाने मला पुन्हा भेटवली.
इथे लोकांच्या जीवनशैलीत आणि शिस्तीतही विशेष फरक पडलेला नाही. तबल्याच्या तालातील लयीत पडणारया-या मात्रांप्रमाणे दिनक्रम असणारी कुटुंब अजूनही इथे आहेत. दिवसाची लवकर सुरवात,९व्या कालाच्या मात्रेला म्हणजे बारा वाजता जेवण व समेवर म्हणजे रात्री आठ वाजता जेवण ही शिस्त इथे अजूनही आहे.सकाळी सहा वाजल्यापासून फिरायला व फूलांना बाहेर पडलेले पेन्शनर दिसतात.सोसायटीत झाडेही बक्कळ आहेत आणि ती अजूनही आहेत.चारचाकी गाड्यांची संख्या मात्र खूप वाढली आहे हे सुबत्तेचंच लक्षण आहे.
हा योगानंदी शिस्तीचा स्टॅम्प घेऊन नवीन पिढी तयार होत आहे ते त्यांच्या वार्षिक कार्यक्रमाच्या आयोजनावरून पहायला मिळते.एकूणच नव्या पिढीच्या कर्त्ुत्वाचा परीघ कितीही वाढता असला तरी त्यात फिरणारी त्यांच्या जीवनाची सुई ही टिपीकल 'योगानंद मेक 'चीच आहे.
अंजली मायदेव
ही बोरीवलीची योगानंद सोसायटी
ही बोरीवलीची योगानंद सोसायटी का? अनबिलिव्हेबल आहे. मला सोसायटी माहीत आहे पण तिथे अशी लाईफस्टाईल, व्रतवैकल्यं असू शकतील ही कधी कल्पना केली नाही!
वेदिका२१ : +१
वेदिका२१ : +१
छान वाटलं वाचुन.
छान वाटलं वाचुन.
कुठे आहे ही सोसायटी.. छान
कुठे आहे ही सोसायटी.. छान वाटलं वाचून. एखाद्या जून्या काळातील मालिकेचे चित्रण होऊ शकेल इथे.
माझी शाळा या सहनिवासाच्या
माझी शाळा या सहनिवासाच्या शेजारीच. मामांचे घरही याच योगानंदात. त्यामुळे अजूनही दोन-तीन महिन्यांतून एकदा जाणे होते. काही वर्गमोत्र, शिक्षिकाही योगानंदमध्येच राहत.
गावातल्या वाड्यांत भांडणे असावीत तशी शेजारच्या सोसायट्यांशी वाद त्यामुळे सोसायटीकडे जाणारा रस्ता नादुरुस्त.
व्रतवैकल्ये अजूनही होतात हे माहीत नाही. पण सोसायटीत इंटरकॉमची व्यवस्था आहे.
मराठीत छापलेला वार्षिक अहवाल , फळ्यावरच्या कार्यक्रमांच्या नोटिस पाहून छान वाटले होते.
धन्यवाद सगळ्यांना. प्रतिसाद
धन्यवाद सगळ्यांना. प्रतिसाद वाचून छान वाटले
जुने फोटो टाका. बहार येईल
जुने फोटो टाका. बहार येईल
चांगली सूचना ......प्रयत्न
चांगली सूचना ......प्रयत्न करते. धन्यवाद!
माझी मावशी योगानंदामधे राहात
माझी मावशी योगानंदामधे राहात असल्यामूळे नि बरेच मित्र सुविद्यामधले असल्यामूळे तुम्ही हे वर लिहिलेले एकदमच पटले.
व्वा ! ही पावती ।धन्यवाद!!!
व्वा ! ही पावती ।धन्यवाद!!!
छान वाटलं वाचुन. जुने फोटो
छान वाटलं वाचुन.
जुने फोटो टाका. बहार येईल. =+++१००
मी आणि माझी बायको सुविद्यालय
मी आणि माझी बायको सुविद्यालय चे विद्यार्थी ...
योगानंद बद्दल वाचुन बर वाटल ..
बायकोची आतेबहीण राहते इथे
बायकोची आतेबहीण राहते इथे .वर्षातून एकदा तरी जातोच .वर्णन वाढवा .फोटो चार तरी टाका .प्रथम कोणत्या बुवांच्या आश्रमाबद्दल असेल म्हणून धागा वाचला नव्हता .परांजपे स्कीमविषयी लिहावेच लागेल .इथले पहिले रहिवाशी त्यांचा आदराने उल्लेख करतात .पूर्वी कर्ज काढून घर घेणे ही कल्पना रुजली नव्हती त्यावेळी लोकांना "जमेल तसे पैसे द्या तुमचे घर होईल "यावर ज्यानी विश्वास ठेवला ते आता परांजपे यांची आठवण काढतात .
माझी आत्या आहे योगानंदमध्ये..
माझी आत्या आहे योगानंदमध्ये.. त्यामुळे तिथे लहानपणापासून जाणं आहे. तिचं पाळणाघर आहे तिथे..
एस् आर डी तुमचं म्हणणं एकदम
एस् आर डी तुमचं म्हणणं एकदम मान्य. परांजप्यांच नाव तिथे वझि-याच्या गणपतीनंतर घेतात असे म्हणले अतिशयैोोक्ती होणार नाही. पण माझ्याद्रुष्टीने लग्नानंतर पाहिलेली योगानंद व मी संसारात पूर्ण रमल्यावर म्हणजे पक्की सासरची झाल्यावर १०-१५ वर्षांनी पुन्हा अनुभवलेली योगानंद अस डायरीवजा लिखाण केलं .
हेम, बहुतेक तुमची आत्या माहित आहे मला.
एस् आर डी तुमचं म्हणणं एकदम
एस् आर डी तुमचं म्हणणं एकदम मान्य. परांजप्यांच नाव तिथे वझि-याच्या गणपतीनंतर घेतात असे म्हणले अतिशयैोोक्ती होणार नाही. पण माझ्याद्रुष्टीने लग्नानंतर पाहिलेली योगानंद व मी संसारात पूर्ण रमल्यावर म्हणजे पक्की सासरची झाल्यावर १०-१५ वर्षांनी पुन्हा अनुभवलेली योगानंद अस डायरीवजा लिखाण केलं .
हेम, बहुतेक तुमची आत्या माहित आहे मला.
मस्त वाटलं योगानंद
मस्त वाटलं योगानंद सोसायटीबद्दल लेख आहे ते पाहून. माझ्या शाळेच्याच बाजूला आहे ती. मी एक-दोन क्लासेसना पण जायचे तिथे.


सगळं परत आठवायला लागलं आता
पुन्हा कमेंट्स देईनच लेख वाचून.
आणि एक फोटो सुविद्यालय कव्हर
आणि एक फोटो सुविद्यालय कव्हर करुन पण टाका ना. प्लीजच.
मी आणि माझा नवरा सुविद्यालय
मी आणि माझा नवरा सुविद्यालय चे विद्यार्थी ...योगानंद मधे सासर आणि राजयोग मधे माहेर
योगानंद बद्दल वाचुन बर वाटल ..
विवेक दिप्ती प्रतिसादाबद्दल
विवेक दिप्ती प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
मी काका-काकूना ओळखते