नाना पाटेकर यांच्या मुलाखतीवरच्या प्रतिक्रिया.

Submitted by admin on 2 July, 2009 - 22:51

नाना पाटेकर यांच्या मुलाखतीवरच्या प्रतिक्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाना रॉक्स!!!

खरयं ... नानाने मुलाखर रंगविली नाहीतर सुधीर गाडगीळ हे नेहमीच्याच प्रश्नांच्या तयारीने आले होते

मुलाखत दिसतच नाही. वाचायची कशी?

मला पण मुलाखत दिसत नाहीये ... नुसतेच प्रतिसाद दिसत आहेत. पेपरमधे बातमी वाचल्यापासून उत्सुकता वाढलीये.

हा विभाग बृ. म. मं. अधिवेशनात झालेल्या कार्यक्रमांचा वृत्तांत तसेच त्यावर प्रतिक्रिया लिहिण्यासाठी आहे.

नानाच्या मुलाखतीचा व्हिडिओ आहे का कुठे?
तसेच मायबोलीकरांच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ?
नसल्यास संक्षिप्त लिहाल का कुणी?

वृत्तांताचीही वाट बघत आहे. Happy

---
असं एखादं पाखरू वेल्हाळ, त्याला सामोरं जातंया आभाळ!

Wow, नाना पाटेकर नी धमाल आणली, सॉलिड witty आणि एकदम सहज गप्पा मारल्या सारखे बोलले !
महागुरु,
थँक्स लिंक दिल्या बद्दल आणि अगदी १००% अनुमोदन, सुधीर गाडगीळ अगदीच पकाउ वाटले नाना पाटेकर पुढे !

जबरदस्त मुलाखत झाली नानाची. एकदम बिनधास्त. प्रत्यक्षात पण नाना सगळ्यांशी असाच बिनधास्त बोलत होता.

नानाची मुलाखत सही.. Happy
उद्धवचे नेहेमीसारखेच. (म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या. अत्यंत बोअर. Sad )

---
असं एखादं पाखरू वेल्हाळ, त्याला सामोरं जातंया आभाळ!

सुधीर गाडगीळ अगदीच पकाउ वाटले <<< अश्यावेळी मुलाखतकाराने मागे राहून मुख्य पाहूण्याला बोलतं करायचं असतं. सुधीर गाडगीळ काहीवेळा उगाचच जास्त बोलतात. ते इथे केले नाही हेच योग्य. त्यांच्याकडून याचीच अपेक्षा होती माझी....

मायबोलीकरांचा कार्यक्रम, उभ्या उभ्या विनोद (विनय, संदीप) रेकॉर्ड केला नाही, माय सरोसती (समीर) होऊ शकला नाही, मनात नाचते मराठी (लालू) मात्र बघता येईल...

विनय

नाना एकदम बिनधास्त बोलला...लिंकसाठी धन्यवाद.
अजुन काहि प्रोग्रम रेकॉर्ड केले असतिल कुणि तर विडियो लिंक द्या.
व्रुतांत लिहा कि..वाचु आम्ही

सुधीर गाडगीळ काहीवेळा उगाचच जास्त बोलतात.>
एकदम लाखाचं बोल्लात भाऊ. 'असून अडच्ण' आहे तो गाडगीळ.

आता काय झालं आहे त्या सुधीर गाडगीळांच अजीर्ण झालं आहे. गेले कित्येक बी एम एम वर तोच चेहेरा. सॅन होजेला पाहिला, मग न्यू यॉर्कला पाहिला. अ‍ॅट्लांटाला मात्र काट दिली होती. हेही कारण होतं म्हणा तिथल अधिवेशन आवडायचं. त्या खर्चात दुसरं कोणालाच बसवता येत नाही का? थोडी व्हरायटी हवी न अधिवेशनात. इथेही बरेच कलावंत असे आहेत की ते ही जबाबदारी नीट पार पाडू शकतील. केदार, वाचतो आहेस न?

हो. गाडगिळांचा एक कार्यक्रम आमच्याकडे प्ल्पॉप गेला होता. कार्यक्रम समितीला हे पोहचवतो. Happy

खरे तर "बीएमएम कडून अपेक्षा" असा एखादा बाफ उघडावा व त्यात सर्वांनी त्यांना काय नेमके हवे आहे ते सांगावे. कार्यक्रम ठरवायला खूप मदत होईल. कारण डेट्स बिट्स व इतर सर्व ह्याची सुरुवात आता येत्या दोन्-तीन महीन्यात होईल. आणि येणारे बहुतेकजन आधी बीएमेमला गेलेले असतात त्यामुळे सल्ल्यांची मदत होईलच.

केदार,
तु उघडू शकतोस हा बाफ या ग्रुपमध्ये. बरेच जण लिहितील.

केदार, हो. विनय हेच म्हणत होता. अपेक्षा आणि आत्तापर्यंत ज्यांनी बीएमएम पाहिले आहे त्यांना तिथले काय आवडले, आवडले नाही असे वेगवेगळे धागे उघडता येतील.

नानाची मुलाखत ऐकली. अप्रतिम आहे.
काय दिलखुलास बोललाय नाना. अतिव सुंदर.

नाना भन्नाट बोलतो आणि समोरच्याची दांडी गुल करतो.
पहिल्या लिंक मध्ये फक्त जवळ जवळ ७ मिनटे आहे. पण टोटल वेळ ४० मिनटे दाखवत आहे. काही घोळ आहे का?

आंतरजाल थोडे हळू आहे, म्हणून वेळ लागत होतो. गूगल क्रोमचा पण प्रताप असावा.

नानाची मुलाखत अप्रतीम. मजा आली बघायला Happy

नानाच्या मुलाखतीच्या लिंक्स दिल्याबद्दल धन्यवाद. मस्त झाली आहे मुलाखत!
गाडगीळ कंटाळवाणे Sad

मुलाखत तर मस्त आहेच पण नानाची साठी आली???? बाप रे, कधी जाणीवच झाली नाही नानाचे वय वाढले असेल असे..

नाना रॉक्स.. सलाम तुला नाना!! तुला अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही आणि जे करतोस ते जीव तोडून.. तुला केव्हाच मानलं होतच आधी शिक्कामोर्तब पुन्हा!

नानाची मुलाखत मस्तच... एकदम गप्पा मारल्यासारखा खेचाखेची करत बोलत होता.. मजा आली.

नानांची मुलाखत खुप आवडली, येथे दुवा दिल्या बद्दल धन्यवाद.

दुवा दिल्याबद्दल आभार. मस्त मुलाखत. गाडगीळांचा आता कंटाळा आला

गाडगीळ बळांच मधेमधे करत होते !! काही बिघडलं नसते ते बोलले नसते तरी! Happy
नाना बेस्ट आहे पण! अप्रतिम बोलला!!

www.bhagyashree.co.cc/

आता लिंक चालत नाहिये का? पहिला भाग पाहिला. जबरी बोलला नाना.
पण आता तीच लिंक आणि दुसर्‍या भागाची लिंक पण चालत नाहिये का?

Pages