निसर्गशिल्प — "सांदण दरी"

Submitted by जिप्सी on 28 May, 2014 - 01:01

विविधतेने नटलेल्या आपल्या महाराष्ट्रात भटकंतीच्या दृष्टीने जे पाहिजे आहे ते सर्वच आहे. एकिकडे सह्याद्रीचे उत्तुंग शिखरं आहे तर दुसरीकडे मन मोहविणारे समुद्रकिनारे, निसर्गनिर्मित चमत्कार तसेच मानवनिर्मित चमत्कारही. इथे प्राचीन कोरीव लेणी आहेत आणि विविधतेने नटलेली वन्यसंपदाही. महाराष्ट्रातील काही भागात तर निसर्गाने नाजुक आणि रौद्र सौंदर्याची मुक्तहस्ताने उधळण केली आहे. त्यातीलच एक भाग म्हणजे भंडारदरा आणि परीसर. येथे दुर्गमतेचे बिरूद मिरवणारे अलंग, मलंग आणि कुलंग हे दुर्ग त्रिकुट आहे, एकीकडे आकाशला गवसणी घालणारे कळसुबाई शिखर तर दुसरीकडे थेट पाताळाचा वेध घेणारी सांदण दरी. भंडारदरा धरण, किल्ले रतनगड, अमृतेश्वर मंदिर अशी अनेक ठिकाणे आपली या भागातली भटकंती अविस्मरणीय करतात. या भागातील भटकंती सगळ्या ऋतुत मनाला आनंद देणारी ठरते. पावसाळ्यात तर येथे स्वर्गच उतरतो.
कवी माधव यांच्याच शब्दात सांगायचे तर...

"हा इकडे सह्याचळ, हे इकडे सागरजळ, हे वरी नभोमंडळ
आणि खाली पाताळसम खोल दरीचा तळ!"

अशाच एक पाताळसम खोल दरी म्हणजे आजच्या भेटीचे ठिकाण "सांदण दरी". सांदण दरीबद्दल योरॉक्स, रोहित एक मावळा, Discoverसह्याद्री, डोंगरवेडा आणि इतर मायबोलीकरांनी (सचित्र) भरभरून लिहिलंय. त्यामुळे मी जास्त काही लिहित नाही. Wink मला प्रत्येकाच्या प्रचित दिसणारी सांदण दरी नेहमीच वेगवेगळी भासली आणि प्रत्यक्षात तर अजुनच वेगळी. थोडक्यात काय तर "जो बात तुझमें है तेरी तस्वीरमें नही...". खरंतर प्रत्यक्ष जाऊन भेट द्यावी अशीच हि जागा. Happy

महाराष्ट्रात पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगांनी अनेक निसर्गलेणी तयार केलेली आहेत. सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर ४ महीने कोसळणार्‍या धुवाधार पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वहातात. त्यांच्या रोरावत जाणार्‍या पाण्यामुळे सह्याद्रीचे कातळ कडे कापले जातात आणि अनेक अजोड निसर्गशिल्प तयार होतात. अशा प्रकारचे निसर्गशिल्प "सांदण" येथे तयार झालेले पहायला मिळते. या ठिकाणी वहाणार्‍या नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने लाखो वर्षे कातळकडे तासून त्यातून मार्ग काढलेला आहे. त्यामूळे काही ठिकाणी नदीच्या पात्राची रूंदी 7-8 फूट असूनही वरच्या बाजूचे कातळकडे एकमेकाला जोडलेले आहेत. या निसर्गशिल्पात भर पडलेली आहे ती कातळ भिंतीं मधून तुटून पडणार्‍या खडकांची. उन्हाळ्यात तापलेल्य़ा खडकावर/ कातळभिंतींवर जेंव्हा पावसाचे थंड पाणी पडते, तेंव्हा त्यांना मोठया भेगा पडतात. या भेगांमध्ये पावसाचे पाणी शिरून त्याच्या रेट्याने मोठ- मोठे खडक कातळभिंतीतून वेगळे होऊन नदीच्या पात्रात पडतात.हे सर्व घडून येण्यासाठी अनेक वर्षे जावी लागतात.
(माहिती साभारः http://trekshitiz.com)

प्रचि ०१

"अलंग, मदन, कुलंग" हि दिग्गज मंडळी जमली एकाच ठिकाणी सारी
"बारी" गावच्या "कळसुबाई"ची तर बातच न्यारी
साम्रद गावातील "सांदण दरीत" पाहिली निसर्गाची कमाल
"भंडारदरा" परीसरात पुन्हा एकदा भटकंतीची धम्माल"

मे महिन्यात भंडारदरा परीसरातील साम्रद गावातील सांदण दरीचे निसर्गनवल पाहुन आलो. हि दरी जमिनीच्या खाली साधारण १००-१५० फूट खोल आणि १-२ किमी अंतराची आहे. थोडक्यात जमिनीला पडलेली प्रचंड भेग. या ठिकाणी खालपर्यंत सूर्यकिरण पोहचत नसल्यामुळे घळीत कमालीचा गारवा जाणवतो त्यामुळे वैशाख वणव्यातही सांदण दरीची भटकंती सुसह्य ठरते. दोन ठिकाणी पाण्यातुन पुढे जावे लागते (सूर्यकिरण खालपर्यंत पोहचत नसल्याने येथील पाणी कधीही आटत नाही). सामद्र गावातुन दिसणार्‍या सह्याद्रीच्या रांगा तर केवळ अप्रतिम. या सार्‍या परीसराची भटकंती करताना मनोमन जाणवते कि निसर्गापुढे माणुस किती खुजा आहे ते.

या परीसरात "सह्याद्री सुंदरी" म्हणजेच "अंजनीची" झाडे प्रचंड प्रमाणात आढळली, नुकतंच अंजनीच्या बहराला सुरूवात झाली आहे. करवंदाच्या जाळ्याही जागोजाग होत्या, थोडीफार पिकलेली करंवद दिसली, तोडली आणि खाल्ली. अहाहा! काय तो स्वाद!!. आंब्याच्या झाडावरच्या कैर्‍याही पाडल्या. सह्याद्रीच्या कुशीत भटकुन आल्यावर उद्दिपीत झालेल्या जठराग्नीला शांत करण्यासाठी गावातल्याच एका अन्नपूर्णेने वाढलेल्या पिठलं भाकर, हिरवी मिरची-शेंगदाण्याचा झणझणीत ठेचा, तिखटमीठ लावलेल्या कैर्‍या, चुलीत खरपूस भाजलेला पापड, घरच्या तांदुळाचा मऊसुत भात आणि गरमागरम तुरीच्या डाळीच्या वरणाची आहुती दिली.

अलंग, मदन, कुलंग हे दुर्गम दूर्ग त्रिकुट, महाराष्ट्रातील एव्हरेस्ट "कळसुबाई", निसर्ग नवल "सांदण दरी", रौद्रभीषण सह्यकडे यांनी हा सारा परीसर सजलेला/नटलेला आहे.

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७
कोकणकडा

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११
आंबट चिंबट करवंद Happy

प्रचि १२
"सह्याद्रीसुंदरी अंजनी"च्या कळ्या आणि फुले

प्रचि १३

प्रचि १४
सांदण दरीकडे जाणारी वाट
प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९
रतनगड, खुट्टा आणि सांदण दरी
प्रचि ३०
अलंग, मदन आणि कुलंग
प्रचि ३१

प्रचि ३२

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो छान आहेत.. कारण लक्षात येत नाहीये पण नेहमी इतकी मजा नाही आली Happy

मागे कोणीतरी (यो ?) टाकलेले सांदण दरीचे फोटो खूप आवडले होते..

खूप मस्त माहिती आणि सुर्रेख फोटो....

एक शंका - आजमितीला या सांदण दरीत दगड पडत असतात का किंवा मोठ मोठ्या दरडी कोसळत असतात का ? स्थानिक लोकांकडून अजून काही कळले का ?

फोटो आवडले .तुमच्या कैमऱ्यात साठवलेले फोटो जास्ती एमबी असणार आणि ते आणखी आकर्षक दिसत असणार .तुम्ही कुठून गेलात ?डोक्यावर हेल्मेट घालावे लागते का ?आत गेल्यावर अचानक पाऊस पडला तर धोका उद्भवतो /उद्भवण्याची शक्यता आहे असे वाटते काय ?

कमाल फोटो राव तुमचे !! प्राची ४,५,६,७ म्हणजे कोराल्या गेल्या मनावर. जिप्सी कुठला क्यामेरा रे बाबा. करवंद आणि अन्जनि च्य कळ्यन्ची प्रकाशचित्र टाकून तर धमाल रंगत आणलीत कि भाऊ !

माबोकरांचा ट्रेक होता काय हा?

छानच फोटो.
तूला सांगायचे राहिले, सांदणदरीतून वरच्या दिशेने कॅमेरा ठेवून आभाळाचा पट्टा टिपायला हवा होता. यो रॉक्स चा तसा फोटो होता.

तिथे दुसर्‍या बाजूला खाली नदी आहे का ? २२ मधे अंधूकसे काय दिसतेय खाली ? आणि दरीतल्या पाण्याचा फोटो ?

मस्त फोटो आणि माहिती.
निसर्गाचा चमत्कारच ही दरी म्हणजे. अंजनीची फुले पण सुंदर.
कवी माधवांची कविता पण एकदम सूचक.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!

मागे कोणीतरी (यो ?) टाकलेले सांदण दरीचे फोटो खूप आवडले होते..>>>>हो पराग, बहुतेक योने काढलेलेच फोटो. माबोकर्स गेले होते या ट्रेकला. नुकताच पाऊस पडुन गेल्यावर धुक्यातले फोटो होतो. धुक्यामुळे एक मस्त गूढसा इफेक्ट होता फोटोंना.
हि लिंकः http://www.maayboli.com/node/26521

पुढच्या वेळी जाताना मलाही घेऊन जा रे>>>>केपी, नक्कीच Happy

आजमितीला या सांदण दरीत दगड पडत असतात का किंवा मोठ मोठ्या दरडी कोसळत असतात का ? स्थानिक लोकांकडून अजून काही कळले का ?>>>>>> शशांक, याबद्दल माहिती नाही. Sad

तुम्ही कुठून गेलात ?डोक्यावर हेल्मेट घालावे लागते का ?>>>>>Srd, आम्ही साम्रद गावातुन गेलो होतो. (मुंबई-कसारा-घोटी-भंडारदरा-साम्रद). आमच्याकडे हेल्मेट नव्हते पण दुसरा एक ग्रुप सांदण दरी-करोली घाट असा ट्रेक करणारे होते त्यांनी हेल्मेट घातलेले. Happy

जिप्सी कुठला क्यामेरा रे बाबा. >>>>>अमित, कॅमेरा Canon EOS 550D with 18-135 Lens Happy

माबोकरांचा ट्रेक होता काय हा?>>>>>नाही, आम्ही ऑफिसमधले मित्र गेलो होतो. माबोकरांचा ट्रेक झालाय पूर्वी. वर (याच प्रतिसादात) यो रॉक्सच्या वृत्तांताची लिंक दिली आहे. Happy धम्माल वर्णन आणि मस्त फोटो आहेत. Happy

दिनेशदा, मे महिन्यामुळे पानी थोडे कमी होते. फोटो टाकायचे राहुन गेले. Happy

पहिला प्रचि सुंदर!

सांदण दरिची भव्यता, गुढता ही कॅमेर्‍यात मावाणारी नाही. त्या साठी प्रत्येक निसर्गप्रेमीने इथे एकदा तरी भेट दिलीच पाहिजे.

जिप्सी अप्रतिम फोटो. अगदी एक आणि एक. निव्वळ अप्रतिम. मी नेहमी म्हणते त्याप्रमाणेच हि ठिकाणं प्रत्यक्ष इतकी सुंदर आहेत का? कधी कधी वाटतं फोटोच पहावेत, प्रत्यक्ष पाहूच नयेत, अपेक्षाभंग होईल.
असो, त्या अंजनीचा पहिला फोटोत त्यात तर फांदीला मोती आलेत असंच वाटतय. Happy

ह्या प्रकारच्या भौगोलिक रचनेला dyke म्हणतात. कठीण खडकाच्या मध्ये मृदू खडकाचा थर असतो. मृदू खडक पाण्यामुळे लवकर झिजतो आणि अशी संरचना तयार होते. नाणेघाट हे अजून एक उदाहरण.

प्रत्येकाच्या प्रचित दिसणारी सांदण दरी नेहमीच वेगवेगळी भासली आणि प्रत्यक्षात तर अजुनच वेगळी. थोडक्यात काय तर "जो बात तुझमें है तेरी तस्वीरमें नही...". खरंतर प्रत्यक्ष जाऊन भेट द्यावी अशीच हि जागा. >> +१००

मस्तच फोटो रे.. प्रचि २८ चा कोन मस्तच !

पुन्हा कधी जायचे..

Pages