अपवाद...

Submitted by मी मुक्ता.. on 25 May, 2014 - 02:39

मला खात्री होती,
शरीरावरुन नाहीसे होतात स्पर्शांचे ठसे..
त्वचा कात टाकेल तसतसे...
सगळ्या नियमांना अपवाद करुन
मन जसं धरुन बसलय
तुझ्या प्रतिमा..
भरु देत नाहीये जुन्या जखमा..
तसं शरीर नाही करणार..
सृष्टीच्या नियमाप्रमाणे
ते टाकत राहिल कात..
आणि मग माझ्या नव्या त्वचेला नवा वाटेल
तुझ्या कातडीचा पोत..
तुझ्या स्पर्शातली आसोशी..
मला खात्री होती..
या काळात कितीदा कात टाकली असेल,
तुझ्या माझ्या शरीराने..
मोठ्या उत्सुकतेने हात पुढे केला मी,
तुझा अनोळखी स्पर्श अनुभवायला..
तेव्हा जाणवलं..
यावेळी शरीरानेही अपवाद केलाय नियमाला..
इतक्या काळानंतरही,
तुझे ठसे जिवंतच..
तुझा स्पर्श ओळखीचाच..
आता मलाच समजेनासं झालंय..
हा मोहोर,
तुझ्या ओळखीच्या स्पर्शाचा,
की माझं शरीर माझ्या मनाशी एकरुप झाल्याचा?
-----------------------------------------------------------------
http://merakuchhsaman.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वाटले हे विचार!

(अवांतर - 'घागर मे सागर' हा विचार लागू करायचा म्हंटला तर ही कविता कशीकशी बदलता येईल?) Happy

बेफिकीर,
धन्यवाद..!
'घागर मे सागर' हा विचार लागू करायचा म्हंटला तर ही कविता कशीकशी बदलता येईल?>> आपणच मार्गदर्शन करा..
सागर मे घागर म्हटला नाहीत यातच मी आनंद मानते.. Lol

आपणच मार्गदर्शन करा..<<< मार्गदर्शन कसलं आलंय, पण मला प्रयत्न करावासा मात्र वाटत आहे. हळूहळू सुचेल तसे लिहीन.

yep..