कल्याण

Submitted by अमोल सूर्यवंशी on 23 October, 2013 - 07:44

सर्व कल्याण मधील मायबोलीकरांसाठी गप्पा मारायचा ह्क्काचा कट्टा :

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कहाणी वविवारची

ऐका परमेश्वरा वविश्वरा तुमची कहाणी. एसपीचे मळे, तरणतळे. सदाहरीत वृक्ष, क्षीण पळे, मायबोलीची देवळे, रावळे. माबोचा वविवार मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? जुलै महीन्याच्या शेवटच्या "वविवारी" घ्यावा, दुस-या दिवशी संपूर्ण करावा.
वविवारच्या व्रताला काय करावं? व्रतासाठी नाव नोंदवावं. सोबत सहकुटूंब व्रत करावं. भल्या पहाटे वविवारी लवकर उठावं. मुहूर्ताच्या वेळेला भेटीचं स्थळ गाठावं. वाटेत गाणी नकला कराव्यात. आपल्यासह सर्वांचं मन रमवावं. सर्वांनी मिळून व्रत करावं.
ह्या व्रताने काय होते? वर्षभराची मरगळ दूर होते. कुटूंबही खूष होते. नवे मैत्र निर्माण होते. जुने मैत्र वृद्धींगत होते.
संपूर्णाला काय करावे? संपूर्णाला वविव्रताचा आनंद वाटून घ्यावा. वृत्तांत लिहून उद्यापन करावे. असे दरवर्षी करावे. असा वविवार मनी घ्याइजे. मनी पाविजे. चिंतिलं लाभिजे. मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करिजे. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण

अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी इथे पहा...

तंटा नाय तर घंटा नाय
आपल्या माबोचा अ‍ॅडमिन भारी,
आपल्या माबोची पोरं भारी
.
.
.
.
.
च्या मायला आपली माबोच लई भारी
आणि माबोचा ववि तर एकदमच लई भारी

कल्याणला सध्या कितपत पाऊस आहे? उद्या एका मैत्रीणीला शॉपिंगसाठी यायचे आहे. शिवाजी चौकात फार्फार पाणी साठलेय का? जलारामला कसं जायचं आणि?

गुड मॉर्नींग कल्याण्यांनो आणि कल्याणींनो !!!

सध्या रोज कंपल्सरी डायपर्स ड्यूटी लागत असल्याने इथे डोकावण्यास वेळ मिळत नाहीये. जसा वेळ मिळेल तशी हजेरी देईनच !