माझं छोटसं क्रोशे विणकाम

Submitted by स्निग्धा on 13 May, 2014 - 02:37

क्रोशाचं विणकाम हा माझा आवडता छंद. आत्ता पर्यंत बरेचदा छोटे रुमाल, लहान बाळांची स्वेटर्स, तोरणं, शाल अस काही काही विणलं, भेटवस्तु म्हणून दिलही. फोटो काढून ठेवावेत हे कधी लक्षात आलं नव्हतं. बर्‍याचजणींच होत तस माझही झालं, लग्नानंतर हा छंद थोडा मागे पडला होता पण माबो. वरच्या अवल, मीन्वा, शांकली, जागू वै. सगळ्याजणीच पाहून पुन्हा विणकामाला हात लावलाच. त्यातून तयार झालेले काही नमुने आज पहिल्यांदाच तुम्हाला दाखवते आहे. आशा आहे तुम्हाला ते आवडतील Happy पुन्हा आवडत्या छंदाकडे वळण्यासाठी माबो. आणि माबो. च्या मैत्रिणींमुळे प्रेरणा मिळाली म्हणुन सगळ्यांना धन्यवाद.

फोटो मोबाईल कॅमेराने काढले आहेत त्यामुळे..... समजून घ्या प्लीज.

Rumal.jpgBaby Sweter.jpg

भाचीसाठी केलेल Blanket
Blanket.jpgBlanket 1.jpgBaby set.jpgBaby set 1.jpgKunchi.jpgKunchi 1.jpg

Poncho
Poncho.jpgPoncho 1.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अय्यो, कित्ती गोड Happy स्वेटर, टोपडं आणी बुटु चा सेट खुपच क्युट झालाय. पाठकुंचीही मस्तच.(लोकरीची पाठकुंची पहिल्यांदाच पाहिली) शाल पण आवडलीये खरतरं...सगळचं मस्त्त्त्त्त्त्त झालायं. (मलाही शिकायचयं :स्वप्नात रममाण बाहुली: )

रंग सुरेख आहेत . नेहमीचे ते लाल पिवळा रंग नसल्याने मस्त वाटतायेत

तुमच कौशल्य एकदम परफेक्ट
एकदम सुबक झालय सर्व

मस्त

mastch Happy

pahila rumal prachand avadala ani tyanantar gulabi ki aboli color che sweater, topade , butu..... khupch cute

Sagalyana khup khup dhanyawad Happy
kahitari gandalay ithe, mala marathi madhe lihitach yet nahi aahe Sad

Pages