Submitted by सुशांत खुरसाले on 27 April, 2014 - 22:21
असा चालतो की तसा चालतो
कळेना कुणा मी कसा चालतो
मला फक्त छापील डिग्री हवी
मला कोणताही ठसा चालतो
पळावे तुम्हां वाटले तर पळा
मला चालुद्या मी जसा चालतो
नको एवढी सावली जीवना
मला उष्णसा कवडसा चालतो
कुणीही न आहे कुणाचे इथे
जगाचा तरी वारसा चालतो
कधी फक्त ओठांवरी ओठ दे
तुला मी कुठे फारसा चालतो ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली
आवडली
मला फक्त छापील डिग्री हवी मला
मला फक्त छापील डिग्री हवी
मला कोणताही ठसा चालतो<<< छान!
ठसा जसा वारसा जास्त आवडले
ठसा जसा वारसा जास्त आवडले
ठसा बेस्ट इतरही शेर मस्तय्त
ठसा बेस्ट
इतरही शेर मस्तय्त
छान आहे..!
छान आहे..!
Amit , बेफिजी, वैवकु ,जयदीपजी
Amit , बेफिजी, वैवकु ,जयदीपजी , शाम ...सर्वांचे मनःपूर्वक आभार ..
मला फक्त छापील डिग्री हवी मला
मला फक्त छापील डिग्री हवी
मला कोणताही ठसा चालतो व्वा व्वा ....भाऊ इंजिनीरिंग समजली तुला आता
इंजिनिअरिंगचा हाच 'अगाध'
इंजिनिअरिंगचा हाच 'अगाध' महिमा आहे भाऊ..
धन्यवाद !
कुणीही न आहे कुणाचे इथे जगाचा
कुणीही न आहे कुणाचे इथे
जगाचा तरी वारसा चालतो
आपल्यात साधेपणा येत आहे; छान गोष्ट आहे ही.