चिकन पटाखा(तेलाशिवाय)

Submitted by देवीका on 25 April, 2014 - 05:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

हि तेलाशिवाय करायची कृती आहे. चवीला झणझणीत पण मस्त वाटते एखादी तंदूरी रोटी किंवा नान असेल तर. ब्रेड्/पाव वगैरे सुद्धा मस्त जातील. तयारी जरा करावी लागते.

१ किलो चिकनचे तुकडे.
२ मोठे चमचे हिरवी चटणी: पेरभर आलं, लसूण(८-९ पाकळ्या), १ मूठी कोथींबीर धूवून निवडून, २-३ हिरवी मिरची, १ मूठी पुदीना धूवून साफ निवडून घेवून गंधासारखे वाटून.
१ मोठा कांदा उकडून वाटून
पटाखा मसाला: २ चमचे धणे, १ चमचा जीरं, पाव चमचा बडीशेप, पाव पेक्षा निम्मी काळंमिरी, पेरभर दालचिनी तुकडा, ३-४ लवंग, १ फूल जायपत्री, १ बडी वेलची, १ चहा वेलची असे वेगवेगळे भाजून पूड करून घ्यायची. वरील पूड १ मोठा चमचा घेवून त्यातच आपल्या सोसेल अशी व आवडीप्रमाणे तिखट लाल मिरची भिजवून वाटायची. १ चमचा रंगाला म्हणून काश्मिरी तिखट किंवा देगी मिरची पूड टाकावी. आता हा ओलसर मसाला तयार करून ठेवायचा.
२ मोठया वाटया घट्ट दही भरपूर फेटून एकजीव करून,
मीठ चवीला

क्रमवार पाककृती: 

आदल्या दिवशी रात्री चिकन साफ करून आधी हळद लावून मग पटाखा मसाला मस्त चोळून ठेवावा व चिकन बाहेरच ठेवावी.
१ तास वाट पाहून त्याला हिरवी चटणी लावावी. मग त्यातच कांदा पेस्ट घालावी मस्त कालवावे जिन्नस मग चिकन काचेच्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावी.
दुसर्‍या दिवशी सकाळीच बाहेर काढून फेटलेले दही घालावे व आता चिकन बाहेरच ठेवावी. दोन तास मुरवावी.
दोन तासाने पुर्ण चिकन टोपात घालून , टोपाच्या कडेला कणीकेने बंद करून वरून झाकण ठेवून मंद आचेवर शिजत ठेवावी. खाली लागायची भिती असेल तर झाकणावर पाणी ठेवायचे. पण आत अजिबात पाणी टाकू नये.

चिकन शिजल्याचा वास सुटेल आपोआप. तसेही चिकनला २०-२२ मिनिटेच लागतील. मुरलेली असल्याने पटकन शिजेल.चिकन अप्रतिम लागते.

अधिक टिपा: 

दही चांगल्या प्रतीचे व घट्ट असावे.
आता ताजे काजू मिळतात ते सुद्धा घालू शकता.
चिकन शिजले की त्यातच सोललेली उकडलेल्या अंडयाचे काप टाकावे. वाढताना एक अंड देवु शकता.
नेहमी सारख्याच कांदा चकती, टोमॅटो व लिंबू काप देवून वाढावी.
मसाला पापड सुद्धा बनवु शकता.

खास शाकाहारीसाठी: कच्चा बटाटा मुरवून घाला. Happy पनीर घालू शकता, उकडलेले छोले ह्या मसाल्यात ठेवून आणखी मुरवून चवीष्ट बनवु शकता. सर्व कुर्मा भाज्या घालून बनवु शकता.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Photo
pls

आंबटपणा फक्त दह्याचा का?
आदल्या रात्रीच्या मॅरिनेशनमधे लिंबू घातला तर जास्त टेंडर होईलसे वाटते. बरोबर का?

20140427_140938_resized.jpg

आज करून पाहीला. आवडला घरी सगळ्यांना...... मी केलेले variation म्हणजे परतुन घेतलेल्या कांद्याची पेस्ट वापरली आणि थोडे पाणी घातले. धन्यवाद देवीका.

मी_मस्तानी,

तुम्ही ह्याच्यात अजिबात तेल नाहि घातले का?( माझा विचार चालू आहे करायचा... बघुया. खरेच तेल नसेल तर करेन)

झंपी, कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतुन घेतला त्याला लागेल तेवढेच तेल वापरले होते. मी शाकाहारी आहे पण घरी बाकी लोकांना आवडला हा प्रकार.

देवीका,
छान आहे पाककृती आले -लसूण्-कोथिंबीर्चे वाटण,तिखट / मसाला आणि दही हे सर्व चिकनला लावून मातीच्या मडक्यात शिजवले होते.खाणार्‍यांनी चांगले लागत होते म्हणून सांगितले. पण त्याला तेवढासा रस्सा नव्हता.आता तुमची पा.कृ. नुसार करून पाहीन.

सर्वांना धन्यवाद, मला ह्या रविवारी सुद्धा वेळ नाही मिळाला घरी कोणीच खाणार न्हवते आज. पुढच्या रविवारी फोटो टाकेन.

मंजूडी: बटाटा कच्चा मुरवून सुद्धा छान लागेल. पनीर सुद्धा छान होइल पण वेळ कमी लागेल.
इब्लिसः लिंबू सुद्धा चालेल पण पाककृती बराच वेळ शिजवायची आहे तेवा लिंबू, दही एकत्र आणखी बराच वेळ शिजवली तर चिकनला चिवट होइल. तंदूरी चिकन बनवताना लिंबू + दही लावतो पण शिजवायचा वेळ कमी असतो.
दिनेशः हो मातीच्या घडयात छान होइल.
स्वाती२: चिकन शिजल्याचा वास सुटेल आपोआप. तसेही चिकनला २०-२२ मिनिटेच लागतील. मुरलेली असल्याने पटकन शिजेल.
मी_मस्तानि: फोटो छानच. धन्यवाद.

कोणी बटाटा वापरून केला तर फोटो टाकाल हि अपेक्षा. मी केलं नाहीये.

छान आहे पाककृती. मी अशी हे बिनतेलाचे नुसते हिरवे चिकन केले होते मातीच्या भांड्यात. तेही अप्रतिम लागले चविला. आता हे करुन पाहीन.

सही पाककृती आहे. करून बघायची आहे.

आलं-लसणाचा कच्चा वास जातो का? कारण कृतीत कुठेही झाकणाशिवाय शिजवलेलं किंवा परतलेलं नाही.

me_mastaniच्या चिकन पटाख्याचा फोटो मस्तं आहे.

>>ह्यात शिजवायला ठेवताना थोडेसे तांदूळ घातले तर?
बिना तेला-तुपाची बिर्याणी?>> तांदळाचा भात व्हायला पाणी नाही लागणार? की शिजलेला भात म्हणताय?

भानुप्रिया: कोरडा तांदूळ नाही शिजणार. तो बराच वेळ भिजवून घातला तर शिजेल पन मग थोडे दही ज्यास्त व आधणाचे पाणी लागेल. तुम्ही करुन पहा व सांगा कसे झाले ते.
पण एक सुचवू का? असे करण्यापेक्षा भात शिजवून मग चिकन करी बरोबर खाउ शकता. Happy

मृण्मयी: वास नाही राहत(असा माझा अनुभव आहे) कारण दह्यात सुद्धा मुरवली आहे. पण तुम्ही चिकन टोपात टाकून, ५-७ मिनिटे एकदम मोठया आचेवर सवताळून घेवून मग कणीक लावून मंद आचेवर शिजवा.वास येणार नाही.

आज केलंय पटाखा ... .. नीट लक्ष न ठेवल्याने जास्तच सुकं झालंय , पण चवीला टॉप लागतंय..

फोटो टाकेन पण फोटू पाहून कुणी हिरमुसु नये... वो मेरी मिस्टेक है..

अतिशय सोपी आणी महा टेस्टीये ही रेसिपी.. थांकु देवीका.. Happy

Pages