Submitted by बेफ़िकीर on 3 May, 2011 - 12:15
गोष्ट साधीच पण गहन केली
माणसे व्यर्थ मी जतन केली
ऐकवा की विनोद म्हणले ते
मी कथा आपली कथन केली
फाळणी टाळली अयोध्येची
आणि रामायणे सहन केली
या जगाने गझल तुझ्यावरची
आज माझ्यासवे दहन केली
तीच प्रगती खरीखुरी समजा
टाळुनी जी अधःपतन... केली
दूर जाशील या भयापोटी
ती कृती मीच खाडकन केली
जाळले 'बेफिकीर' हिंदूंनी
शायरी तेवढी दफन केली*
(* - उर्दू गझलेचा प्रभाव मनात राहिला आहे असे सांगायचे आहे)
गुलमोहर:
शेअर करा
मनापासून आवडले व्याघ्र
मनापासून आवडले व्याघ्र
या जगाने गझल तुझ्यावरची आज
या जगाने गझल तुझ्यावरची
आज माझ्यासवे दहन केली >>> हा शेर सव्वाशेर..!
तीच प्रगती खरीखुरी समजा
टाळुनी जी अधःपतन... केली >>> व्वाह...!
दूर जाशील या भयापोटी
ती कृती मीच खाडकन केली>> "खाडकन" शब्द प्रयोग कोणत्या अर्थाने..आहे?
जाळले 'बेफिकीर' हिंदूंनी
शायरी तेवढी दफन केली*>>> अगदी मनातुन (कळवळीतुन)उतरला आहे हा शेर भुषणराव.
धन्यवाद!*
_____!
गजल-तरही बद्द्ल जास्त ज्ञान नाही (भाव कळतो) पण समजाउन घेण्याचा सतत प्रयत्नात असतो.
सुरेखच !
सुरेखच !
अनिल, चातक, विशाल, मनःपुर्वक
अनिल, चातक, विशाल,
मनःपुर्वक आभारी आहे.
-'बेफिकीर'!
एकदम छान! <<फाळणी टाळली
एकदम छान!
<<फाळणी टाळली अयोध्येची
आणि रामायणे सहन केली >> एकदम गहन शेर आहे हा.
सगळे शेर आवडले .मस्त .
सगळे शेर आवडले .मस्त .
हेच म्हणते, सगळेच शेर आवडले.
हेच म्हणते, सगळेच शेर आवडले. त्यातही विनोद्-कथा कथन, अगदी मनापासून आवडला.
दहन अधःपतन आवडले .... रामायणे
दहन अधःपतन आवडले .... रामायणे कळला नाही
ह्यावेळच्या तरही ची जमिन अवघड वाटते आहे...
या जगाने गझल तुझ्यावरची आज
या जगाने गझल तुझ्यावरची
आज माझ्यासवे दहन केली
आवडला हा शेर बेफिकिर
दहन ऐवजी दफन चालेल का?
गणेश, छाया, प्राजु, वैदेही -
गणेश, छाया, प्राजु, वैदेही - खूप आभार!
मिलिंद - हो, ही जमीन जरा अवघडच आहे. कैलास गायकवाड आता येथे लिहीत नाहीत हे आपल्याला माहीत झाले का? तरहीचा धागा आता विजय पाटील चालवत आहेत. आपणही तरहीत सहभागी व्हाल का?
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
अरे कैलास का लिहीत नाही... एक
अरे कैलास का लिहीत नाही... एक दोन धाग्यांवरून ते समजून आले... पण कारण कळले नाही
बहुतेक वेळा मी तरही ची ओळ बघतो तोपर्यंत नविन ओळ आलेली असते किंवा यायची वेळ झालेली असते
किंवा एवढ्या कमी वेळात एखादी गझल रचणे (आणि त्यातही अवघड रदीफ असेल तर) मला जमतेच असे नाही
नाहीतर तरही लिहायला मला तसा काही प्रॉब्लेम नाही... 'एकदा तरी' मी लिहिली होतीच (pun intended) 
मिलिंद - रामायणे या शेराचा
मिलिंद - रामायणे या शेराचा अभिप्रेत अर्थ!
दशरथाने भरत व राम यांच्यात अयोध्येची समान वाटणी केली असती तर रामायण कदाचित झालेच नसते.
(किरकोळ सुखासाठी भली मोठी दु:खे माणूस काही वेळा स्वीकारतो असे म्हणायचे आहे.)
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
अप्रतिम गझल बेफिकीर ! फाळणी
अप्रतिम गझल बेफिकीर !
फाळणी टाळली अयोध्येची
आणि रामायणे सहन केली..
कोणताही पर्याय स्वीकारा, दु:ख मागून येतच असते इमानी कुत्र्यासारखे.
गोष्ट साधीच पण गहन केली माणसे
गोष्ट साधीच पण गहन केली
माणसे व्यर्थ मी जतन केली
ऐकवा की विनोद म्हणले ते
मी कथा आपली कथन केली
दूर जाशील या भयापोटी
ती कृती मीच खाडकन केली
जाळले 'बेफिकीर' हिंदूंनी
शायरी तेवढी दफन केली* >>>>>> आवडले हे सगळे
दूर जाशील या भयापोटी
ती कृती मीच खाडकन केली....आ हा हा क्या बात !!
जवळपास सगळेच शेर आवडले .
जवळपास सगळेच शेर आवडले .
मक्ता कातिल !