न्यूयॉर्क

Submitted by Adm on 28 June, 2009 - 02:24

बॉलिवूडपट परत रिलिज व्ह्यायला लागल्यावर नुकताच आलेला चित्रपट न्यूयॉर्क पाहिला.. एकंदरीत विचार करता चांगला प्रयत्न वाटला.. कबिर खान च दिग्दर्शन बर्‍यापैकी चांगलं आहे.. निल नितीन मुकेशचा अभिनय लई भारी !!!!! कॅट उच्च दिसते.. सुरुवातीच्या १/२ सीन्स मधे जरा जाड झालीये की काय असं वाटलं.. पण नंतर नाही जाणवलं तसं काही... ABCD स्टाईल बोलणं एकदम मस्त जमवलय.. Happy इरफान खान नेहमीप्रमाणेच सही.. ! JA ठिकठाक.. त्याला दिलेलं काम शहाण्यासारखं करतो ( बाकी JA बद्दल त्याचे फॅन्स लिहीतीलच डिटेल मधे.. Proud ) न्यूयॉर्कच डाऊन टाऊन च मस्त दर्शन घडतं.. अजिबात अ आणि अ प्रकार नाहियेत असं नाही.. पण हिंदी चित्रपट असल्याने थोडं फार चालतच.. गाण्यांकडे विशेष लक्ष गेलं नाही.. पण संगीत कथेला पुरक आहे.. शेवट अगदी बॉलीवुडी आहे.. !
मला पिक्चर बघायच्या आधी स्टोरी अजिबातच माहित नव्हती.. त्यामूळे जास्त चांगला वाटला.. म्हणूनच स्टोरीबद्दल काही लिहित नाही... पण इथल्या "सेक्यूलर" लोकांना नक्की आवडेल असा आहे.. Wink

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण इथल्या "सेक्यूलर" लोकांना नक्की आवडेल असा आहे
म्हणजे हिंदुत्ववाद्यांना शिव्या काय???
~~~~~~~~~~~~~~~~~~
जब जब जगने कर फ़ैलाए
मैने कोष लुटाया
रंक हुआ मै नीज निधी खो कर
जगतीं ने क्या पाया!
भेंट न जिससे में कुछ खोऊं
पर तुम सब कुछ पाओ
तुम ले लो मेरा दान अमर हो जाए।
तुम गा लो मेरा गान अमर हो जाए।

LOL. नाही नाही.. भारत, हिंदू, हिंदुत्ववादी ह्याच्याशी काही संबंध नाही.. तू बघ पिक्चर म्हणजे कळेल..

आड्मा, का चिन्याला छळत आहेस रे? चिन्या, ९/११ च्या पार्श्वभूमीवर अनेक एशियन्सना केवळ संशयावरून डांबून बराच छळ केला होता, त्यावर आहे सिनेमा.
परिक्षणांमध्ये नीलवर सर्वात जास्त कमेन्ट्स आहेत- की ठोकळा आहे, अभिनय येत नाही- अगदी जॉनपुढेही फिका म्हणून! आणि आडाम त्याचंच कौतुक करतोय! Lol
-------------------------
God knows! (I hope..)

पूनम,
TOI मधे तर नील मुकेशच्या कामाचं खूप कौतुक केलं आहे. Happy

ठोकळा आहे, अभिनय येत नाही >>>> कोण म्हणे असं... मला तरी त्याचं काम आवडलं.. !!

त्या नीलचे फोटू बघूनच मला त्याला प्रत्यक्ष बघायची भिती वाटू लागलीये. पण प्रत्यक्क्षात तसे काही नुकसान होणार नाही, असे वाटते आहे. (आधी केलीच आहे, पण अनास्पूर्‍याचा आणखी एखादा सिनेमा बघून साधना बळकट करावी म्हणतो.)

उद्या बघणार आहे, न्युयॉर्कला. Happy

-----
असं एखादं पाखरू वेल्हाळ, त्याला सामोरं जातंया आभाळ!

ह्या फोटोत तरी भितीदायक नाही वाटत आहे तो Happy

बादवे, कुठे पाहिलास रे अडम हा मुव्ही?

कुठे पाहिलास रे अडम हा मुव्ही? >>>> थिएटर मधे.. उसगावात रिलिज झाला.. अटलांटात पिच ट्री गॅलेक्झी मधे आहे..

आड्मा, का चिन्याला छळत आहेस रे?
आडम्,त्या बाबतीत माझा समविचारी आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~
जब जब जगने कर फ़ैलाए
मैने कोष लुटाया
रंक हुआ मै नीज निधी खो कर
जगतीं ने क्या पाया!
भेंट न जिससे में कुछ खोऊं
पर तुम सब कुछ पाओ
तुम ले लो मेरा दान अमर हो जाए।
तुम गा लो मेरा गान अमर हो जाए।

आडम्,त्या बाबतीत माझा समविचारी आहे.
>>>
म्हणजे नक्की काय? चिन्या, तू कायम स्वतःला छळत असतोस का? कसं? Lol

चिन्या, तू कायम स्वतःला छळत असतोस का? कसं?
म्हणजे आडम माझ्या सेक्युलर्,कम्युनलच्या विचारांशी सहमत आहे.आयला,मी स्वतःला छळतो का इतरांना हे बरेच माबोकर सहज सांगतील.
~~~~~~~~~~~~~~~~~~
जब जब जगने कर फ़ैलाए
मैने कोष लुटाया
रंक हुआ मै नीज निधी खो कर
जगतीं ने क्या पाया!
भेंट न जिससे में कुछ खोऊं
पर तुम सब कुछ पाओ
तुम ले लो मेरा दान अमर हो जाए।
तुम गा लो मेरा गान अमर हो जाए।

मलाही फारसा नाही आवडला. जेवढी हवा झाली होती, त्या तुलनेत तरी.
इथला दहशतवाद दाखवून थकले, आता अमेरिकेतला.
पण तो नील अपेक्षेपेक्षा बरा आहे. शिवाय अडम म्हणतो तसं, न्युयॉर्कच्या डाऊनटाऊनचे मस्त दर्शनही. मला विचाराल, तर फक्त इरफान खानसाठी हा सिनेमा बघायला हवा. Happy

---
असं एखादं पाखरू वेल्हाळ, त्याला सामोरं जातंया आभाळ!

मला या चित्रपटातली एकही गोष्ट आवडली नाही.. अर्ध्यातून उठून येणार होतो.
राष्ट्रगीताच्या वेळी काही कॉलेजकन्या आणि त्यांच्या आया उठून उभ्या राहिल्या नाही, म्हणून त्यांना झापण्याचा आनंद मात्र मिळवला.

अर्ध्यातून उठून येणे म्हनजे टू मच झाले. एवढा काही वाईट नाही.मला तर आवडला बुवा. इव्हन नील मुकेशचेही काम आवडले. कदाचित आमची अभिरुची अगदी बाळबोध असावी असे वाटते.जॉन ची आणि त्याची तुलना कशी करता येईल. ? जॉन बाबाने किती सिनेमे केले? नीलने किती. ? अगदी अमिताभ बच्चनही सुरुवातीस अगदीच अन्डरकॉन्फिडन्ट वाटत असे.

चित्रपट काढायला नवा विषय न मीळाल्याने आतंकवादाच्या पुस्तकाला भारता एवजी न्यु यॉर्क च कव्हर घालुन प्रेक्षकांपुढे ठेवलय... Sad ... नथींग न्यु ऑर डिफरंट!

'न्युयॉर्क' :
काही तरी संदेश देण्याच्या नावा खाली उगीच परिस्थीती नी टेररिस्ट बनलेल्यांना सहानुभुति दाखवण्याचा अजुन एक नॉन सेन्स प्रकार !

C'mon, जे काही एफ बी आय ने केलं, त्यात काय चुकल?
असतील Terrorism शी संबंध नसललेले, केवळ संशया वरून पकडलेले हजारो मुस्लिम लोक !
पण त्या हजारो मधून एक जरी culprit सापडत असेल, किंवा त्या हजारों वर ०.०१ % संशय जरी असेल तरी FBI have full rights to do so for nation's security !
'शूट ऑन साइट' मधे एक British इन्स्पेक्टर म्हणतो त्या प्रमाणे "All muslims are not terrorists but all terrosists are msulims'
जे काही मूठ भर लोक टेररिस्ट असतील, त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या इतर समजाला (निरपराध लोकां सकट) भोगावच लागणार हे सगळ !
आणि जे काही torture दाखवलय, nothing infront of terror attacks happening all over the world !
उगीच आपल किती सोसाव लागल निरपराध लोकांना वगैरे दाखवून अनेक सिनेमां सारखाच सहानुभुति ची बाजु दाखवण्याचा अजुन एक फालतु प्रयत्न !
शेवटी जे इरफान खान म्हणालय तेवढ च एक sensible, 'Nothing justifies terrorism' !

दीपांजलीला अनुमोदन..

दुर्दैवी असले तरी एफ बी आय ला जे करावे लागते त्यात काही चुकीचे वाटत नाही मला तरी..

मला एवढा खास नाही वाटला..