खिन्न उकिडवा बसलेला हा मजूर अड्डा
वाट पाहतो कामाची, करवादत असतो
घासाघीस सकाळी सुचते, मात्र दुपारी
मिळेल तितके घेतो, नशिबी कुदळ घालतो
माझे कुठलेसे पूर्वज शिकलेले होते
म्हणून आलो सधन घरामध्ये जन्माला
नाहीतर मी बसलो असतो खिन्न उकिडवा
कारण नसते कळले का हा जन्म मिळाला
मरतो मी की काय अता ही माझी भीती
त्यांना चिंता कसे जगावे पाळत नीती
सर्वांचा पूर्वज जर कोणी एकच होता
तर मग का ही वाटणीत असमान प्रीती
बघून कविता म्हणाल वा वा, ठरेन मोठा
तुम्ही मोकळे, मीही स्वतंत्र शब्द चिवडण्या
चला लोकहो विसरू त्यांना ...... ते तर साधे
सहाय्य करती कवितेसाठी विषय निवडण्या
खिन्न उकिडवा बसलेला हा मजूर अड्डा
ऊन उन्हाळ्याचेही इतके टिकले नव्हते
दोन वेळच्या अन्नासाठी किती खणावे
माझे पूर्वज इतकेसुद्धा शिकले नव्हते
-'बेफिकीर'!
कविता अतिशय आवडली.
कविता अतिशय आवडली.
अफाट!! सुन्न करणारी कविता!
अफाट!! सुन्न करणारी कविता!
<<खिन्न उकिडवा बसलेला हा मजूर अड्डा
ऊन उन्हाळ्याचेही इतके टिकले नव्हते
दोन वेळच्या अन्नासाठी किती खणावे
माझे पूर्वज इतकेसुद्धा शिकले नव्हते<< ___/\___
उत्तम
उत्तम
मस्तच
मस्तच
व्वा बेफी.. सुंदर
व्वा बेफी.. सुंदर
कविता फार आवडली !
कविता फार आवडली !
आह ! दर्द है !! अचाट
आह !
दर्द है !!
अचाट संवेदनक्षमता अन अफाट निरीक्षण शक्ति यांचा योग्य समन्वय साधला गेलाय !
प्रत्येक कडव्याच्या शेवटच्या ओळीत जबरदस्त पंच जाणवतोय .
स ला म !
चांगली कविता शैली
चांगली कविता
शैली नेहमीप्रमाणे बेजोड
आवडली, काचेच्या तुकड्याने
आवडली, काचेच्या तुकड्याने पत्र्यावर लिहिण्याचा प्रयत्न केला तर जसा आवाज येतो तसा अस्वस्थ करणारा ड्राय करकरीत नाद निर्माण होतोय असे वाटले वाचताना.
अप्रतिम !!
अप्रतिम !!
अमेयशी सहमत! गद्य बाजाची
अमेयशी सहमत! गद्य बाजाची कविता आहे. त्यामुळेच की काय, ती धारदार बनलीये.
-गा.पै.
सलाम.........................
सलाम..........................................................काव्याला आणि कवीलाही
आवडली
आवडली
व्वा ! व्यथा प्रभावीपणे
व्वा ! व्यथा प्रभावीपणे व्यक्त झालेय.
तिसरं कडवं अधिक छान वाटलं.
अफाट!! सुन्न करणारी कविता!
अफाट!! सुन्न करणारी कविता! >>> +१
दोन वेळच्या अन्नासाठी किती
दोन वेळच्या अन्नासाठी किती खणावे
माझे पूर्वज इतकेसुद्धा शिकले नव्हते
क्या बात है ...अतिशय वेगळ्या बाजाची कविता .
आवडली , जबर
आवडली , जबर