ववि२००९:माहिती

Submitted by ववि_संयोजक on 22 June, 2009 - 04:59

नमस्कार मंडळी...

मायबोली वर्षाविहार!!! गेली सहा वर्ष चालु असलेला,जास्तीत जास्त मायबोलीकरांची एकमेकांशी भेट घडवुन आणणारा,पावसात भिजण्याची मजा आपल्या मायबोलीकर मित्रमैत्रिणींबरोबर मनसोक्त लुटायची संधी देणारा मायबोलीवरचा एक उपक्रम.. मैत्रीची नवी नाती जोडणारा आणि जुनी नाती दृढ करणारा असा हा मायबोलीचा एक सोहळा.. दरवर्षी पावसाळा जवळ येऊ लागला की मायबोलीकर आपल्या लाडक्या वविची आतुरतेने वाट पहात असतात.. जुन्या मायबोलीकरांबरोबर नविन मायबोलीकरही सहकुटुंब उत्साहाने यात भाग घेतात..

यावर्षीच्या पावसाचीही चाहुल लागायला आता सुरूवात झाली आहे आणि अर्थातच आपल्या लाडक्या वर्षाविहाराच्या तयारीचीही...

४-५ दिवसांपूर्वी जेव्हा वविची दवंडी पिटली गेली तेव्हापासुनच तुमच्या मनात या वविविषयी उत्सुकता दाटली असेल ना? मनात अनेक प्रश्नही डोकावत असतील जसे `२००९ चे ववि आहे तरी कुठे? कधी आहे?या वविमध्ये कोणकोणत्या नव्या जुन्या मायबोलीकरांना भेटायला मिळेल? या वविला काय काय खेळ असतील ?वविसाठीचे रजिस्ट्रेशन कसे करायचे? पैसे कुठे व कधी भरायचे?' वगैरे वगैरे.. यातल्या काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे मिळतील तर उरलेल्यांची उत्तरे हळुहळु मिळतील.. Happy

    यंदाच्या ववि संबंधी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे :

      तारीख: १९ जुलै २००९ (रविवार)

      वेळ: सकाळी ९.३० ते सायंकाळी ५

      स्थळ: मावळसृष्टी रिसॉर्ट ,पुणे

        या वर्षाविहारात registered मायबोलीकर व त्यांचे कुटुंबीय (पती/पत्नी व मुले) यांनाच भाग घेता येईल.

          आपण vavi@maayboli.com या ई-मेल आयडीवर मेल करुन आपले नाव नोंदवायचे आहे.

            नोंदणी करताना खालील माहिती आवश्यक आहे.

            १. नाव
            २. मायबोलीचा User ID
            ३. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक (भ्रमणध्वनी क्रमांक दिल्यास उत्तम)
            ४. कुठल्या शहरातुन येणार (मुंबई,पुणे ई.)
            ५. आपला नेहमी वापरात असलेला Email ID
            ६. सहभागी होणार्‍या एकुण व्यक्तिंची संख्या (प्रौढ/ मुले).
            ७. लहान मुले (६ ते १० किंवा ३ ते ५ वयोगट) असल्यास त्यांचे वय
            ८. मायबोली गृपबरोबर बसने येणार की स्वतंत्र येणार?
            ९. पैसे कसे भरणार? प्रत्यक्ष की ऑनलाईन?

              नावनोंदणीची अंतीम तारीख ८ जुलै२००९ आहे.

                मावळसृष्टी रिसॉर्टचे प्रवेश शुल्क प्रौढांसाठी प्रत्येकी २५०.०० रुपये आहे. ६ ते १० वयोगटातील मुलांसाठी प्रवेश शुल्क १५०रु आहे. आणि ३ ते ५ वयोगटातील मुलांसाठी प्रवेश शुल्क १०० रु. आहे.

                  एकुण इच्छुक सभासदसंख्येनुसार बसभाडे ठरविण्यास मदत होते. याकरता लवकरात लवकर नावनोंदणी केल्यास उत्तम!

                    पुणेकरांसाठी मावळसृष्टीची बस उपलब्ध आहे.बसप्रवासाचा अंदाजे खर्च प्रत्येकी २०० रुपये.

                    मुंबईकरांसाठी बसप्रवासाचा अंदाजे खर्च प्रत्येकी २५० रुपये.

                    तीन वर्षावरील सर्व व्यक्तीना हे बसभाडे लागू होईल.

                      इतर माहिती जाणुन घेण्याकरता आपण इथे मेसेज टाकु शकता अथवा vavi@maayboli.com या ई-मेल आयडीवर संपर्क करु शकता.

                        वर्षाविहार २००९ चे संयोजक मंडळ:

                          पुण्यातील संयोजक:
                          मयूरेश Kmayuresh2002(०९९२२४०१७७८)
                          दिपक SAJIRA (०९४२२३०३२४१)
                          हिमांशु himscool
                          केतन Arbhaat

                            मुंबईतील संयोजक:

                              निलेश Neel_ved (०९७०२७२१२१२)
                              विनय Vinay_bhide (९८२०२८४९६६)
                              दत्तराज Indradhanushya(०९८३३९५३८८७)
                              संदीप Gharuanna ( ०9819993634)
                              आनंद Anandsuju

                                सांस्कृतिक समिती:

                                नंदिनी nandini2911
                                दिप्ती Dakshina
                                समीर Sameer_ranade
                                मीनाक्षी meenu

                                  मंडळी, पैसे जमा करण्यासाठी माहिती देत आहोत.

                                    पुणेकर मायबोलीकरांसाठी:

                                      तारीख: ११जुलै (शनिवार) आणि १२ जुलै,२००९ (रविवार)

                                        स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा.

                                          वेळ: सं. ५.३० ते ८.००

                                            वर्गणी:

                                              प्रौढांकरता रु. ५०० (मावळसृष्टी रिसॉर्ट शुल्क रु. २५० + बस भाडे रु. २०० + इतर खर्च रु. ५०)

                                                मुलांकरता (६ ते १० वयोगटातील) रु. ४०० (मावळसृष्टी रिसॉर्ट शुल्क रु. १५० + बस भाडे रु. २०० + इतर खर्च रु. ५०)

                                                  मुलांकरता (३ ते ५ वयोगटातील) रु. ३५० (मावळसृष्टी रिसॉर्ट शुल्क रु. १०० + बस भाडे रु. २०० + इतर खर्च रु. ५०)

                                                    मुंबईकर मायबोलीकरांसाठी:

                                                      तारीख: १२ जुलै,२००९ (रविवार)

                                                        स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात

                                                          वेळ: सं. ५.३० ते ८.००

                                                            वर्गणी:

                                                              प्रौढांकरता: रु. ५५० प्रत्येकी (मावळसृष्टी रिसॉर्ट रु. २५० + बस भाडे रु. २५० + इतर खर्च रु. ५०)

                                                                मुलांकरता (६ ते १० वयोगटातील) रु. ४५० (मावळसृष्टी रिसॉर्ट शुल्क रु. १५० + बस भाडे रु. २५० + इतर खर्च रु. ५०)

                                                                  मुलांकरता (३ ते ५ वयोगटातील) रु. ४००(मावळसृष्टी रिसॉर्ट शुल्क रु. १०० + बस भाडे रु. २५० + इतर खर्च रु. ५०)

                                                                    इतर खर्चामधे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लागणार्‍या खर्चाचा अंतर्भाव आहे.

                                                                      तीन वर्षांखालील मुलांना कोणतेही शुल्क नाही.

                                                                        मह्त्वाचे: आपण नाव नोंदवले असल्यास, परंतु १२जुलै२००९ पर्यंत पैसे जमा न केल्यास नावनोंदणी रद्दबातल ठरविण्यात येईल.

                                                                          समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केलं तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.

                                                                            स्वतंत्र येणार्‍यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.

                                                                              ऑनलाईन पैसे भरणार्‍यांना ज्या अकाऊंटमध्ये पैसे भरायचे आहेत त्याचे सर्व डीटेल्स ईमेलने कळविले जातील.

                                                                                मुंबई आणि पुणे सोडुन इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणाला वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.

                                                                                  इथे मावळसृष्टीच्या संकेतस्थळाचा दुवा देत आहोत.
                                                                                  www.mavalsrushti.com

                                                                                    आपल्याला काही शंका असल्यास विनासंकोच संपर्क साधा.

                                                                                    धन्यवाद!

                                                                                    वविसंयोजक

                                                                                    {त.टि:- मावळसृष्टीला २००५मध्ये ववि झालेला आहे तरी वविसंयोजकांनी पुन्हा यावर्षी तिथेच ववि करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय वविचा दर माणसी खर्च,आपल्यासाठी तिथे उपलब्ध असलेल्या सोयी , ४ वर्षांचा गॅप( २००५ ते २००९)आणि नविन मायबोलीकरांची जास्त संख्या इत्यादी मुद्यांचा विचार करून घेण्यात आला.}

                                                                                    विषय: 
                                                                                    Group content visibility: 
                                                                                    Public - accessible to all site users

                                                                                    मी लिंब्याच्या मताशी सहमत आहे,संयोजक समीती काही विचार नक्कि करेल. सुचन आवडली हे म्हंजे अगदी वारी च्या वारकर्यागत झाल की

                                                                                    इदं न मम राष्ट्राय स्वाहा !!

                                                                                    संतोष ,
                                                                                    >>>>माझा कोरडा पाठिंबा नाही तर मनाने व धनाने सहभाग असेल अशा उपक्रमांना.

                                                                                    प्रत्यक्श आलात तर आणखी उत्तम की हो
                                                                                    -- इदं न मम राष्ट्राय स्वाहा !!

                                                                                    'अरे, वविची घोषणा वाचलीस काय? झकास प्लॅन आहे बघ..'
                                                                                    'कसला झकास? पाचशे रुपये भरायचेत, वट्ट पाचशे रुपये! आहेस कुठे?'
                                                                                    'हा काय इथेच.. तुझ्यासमोरच. अरे बाबा, पाचशे रुपयांत येणे जाणे, खाणे वगैरे आहे, म्हणजे परवडेबल..'
                                                                                    'कसले परवडेबल..? खर्चाचे महिने सुरू झालेत. अवघड आहे बाबा..'
                                                                                    'अहो कंजूषाधिपती, इतका हिशेब सुचतोय होय आता? उन्हाळ्यात हापूस आंबे खा-खा खाल्लेस, तेव्हा नाही आठवला हिशेब? चार-पाच हजारांचे आंबे तर खाल्लेच असणार, हो ना?'
                                                                                    'अरे, तरी पण..'
                                                                                    'काही बोलू नकोस. खाणे-पिणे, जाणे येणे सोड, पण ज्यांची आपण रोज नेटभेट घेतो, त्यांची थेटभेट हे सर्वात मोठं आकर्षण आहेच की! त्यांच्या सोबत मौजमस्ती करीत जायचं, अन तिथे धम्माल करून, खुप सार्‍या सुखद आठवणी घेऊन परत यायचं...'
                                                                                    'हम्म..'
                                                                                    'आता शुंभासारखा उभा राहू नकोस. पैशाची एवढीच काळजी असेल, तर एक महिना सिगरेट किंवा बुधवार बंद केला तरी याच्या पाचपट पैसे वाचतील! अरे ते भारताबाहेर अन महाराष्ट्राबाहेर राहणारे मायबोलीकर बघ हळहळताहेत.. नाहीतर तु..'
                                                                                    'हे खरेच रे. मागल्या वर्षी नव्हतो, तर वर्षभर टोमणे ऐकावे लागले, अन मी स्वतःही हळहळत राहिलो, हे मात्र आहे हां! ठीक आहे. करतोच आज रजिस्ट्रेशन..'
                                                                                    'ये हुई ना बात! मी तर दवंडीच पिटतो आता. पुण्यनगरीनिवासी महामहोपाध्याय कंजूषाचार्य वविला येत आहेत होsssssssssss..!!!'
                                                                                    --
                                                                                    तर मंडळी, असे वाद नि संवाद सगळीकडे झडत आहेत.
                                                                                    तुमचे काय? पहले तुम, पहले तुम करता करता त्या लखनवी नवाबांची गाडी सुटून गेल्याचे माहीत आहे ना?

                                                                                    अन मी स्वतःही हळहळत राहिलो<<
                                                                                    पुढचे वर्षभर हेच होणार माझं!! Sad

                                                                                    ----------------------
                                                                                    हलके घ्या, जड घ्या
                                                                                    दिवे घ्या, अंधार घ्या
                                                                                    घ्या, घेऊ नका
                                                                                    तुमचा प्रश्न आहे!

                                                                                    नमस्कार लोक्स कसे आहेत?
                                                                                    सर्व मायबोलिकर ,
                                                                                    अजुनही खूप जणांची नोंदणी झालेली नाही विषेशतः पुण्याची नाव कधी येणार

                                                                                    इदं न मम राष्ट्राय स्वाहा !!

                                                                                    >>>> विषेशतः पुण्याची नाव कधी येणार
                                                                                    पुणे-मुम्बई एक्स्प्रेसवेसारखा "एक्स्प्रेस कॅनॉलचा" प्रस्ताव आहे, तो कालवा पूर्ण झाला की येतिलच पुण्याच्या नावा Happy Proud

                                                                                    एक झलक "मावळ्सृष्टीची"

                                                                                    maval_1.jpgmaval_2.jpg
                                                                                    ________________________________________________
                                                                                    जीवनगाणे गातच रहावे, झाले गेले विसरूनी जावे पुढे पुढे चालावे.

                                                                                    आयला, ही मावळसृष्टिची पाटी, "पुणेरी पाट्यान्मधे" सहज खपली जाईल Proud
                                                                                    म्हणजे अस की "निसर्गरम्य सहलीचे ठिकाण - श्रद्धा चेम्बर्स (?), दान्डेकर पुलाजवळ (???)" Lol
                                                                                    अग आईssssगsssss, जोशान्ची भेट आता घेतलीच पाहिजेल!

                                                                                    लिम्बुदा.....:)

                                                                                    ____________________________________________
                                                                                    जीवनगाणे गातच रहावे, झाले गेले विसरूनी जावे पुढे पुढे चालावे.

                                                                                    ववि संयोजन समिती,
                                                                                    मी नाव नोंदणी साठी मेल पाठवला आहे. कृपया पोचपावती द्याल का?

                                                                                    मी पण मेल केलाय........ मला पण पावती द्या Happy
                                                                                    ************
                                                                                    To get something you never had, you have to do something you never did.

                                                                                    नाव नोंदणीसाठी मेल केला आहे. पोचपावतीच्या प्रतिक्षेत आहे..

                                                                                    धन्यवाद.

                                                                                    किती जणांच्या पावत्या पोहचल्या?

                                                                                    बस किती वाजता, कुठून सोडणार? ठरलं का?
                                                                                    बसचा रंग कळला का? :)- हे महत्त्वाचं!
                                                                                    ---------------------------------------------
                                                                                    यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..

                                                                                    बसचा रंग कळला का? :)- हे महत्त्वाचं!
                                                                                    >>>
                                                                                    हो आणि जमल्यास बसचा फोटो टाका!
                                                                                    नाही तर निळा रंग कुणाला हिरवा दिसायचा तर हिरवा भगवा दिसायचा! Proud
                                                                                    -------------------------------------------------------------
                                                                                    'ज्याला कलाकार नाही बनता येत तो टीकाकार बनतो'

                                                                                    वैनी : जुन्या वविची उचकी लागतिये जनू ............ Happy

                                                                                    ~~~~~~~~~~~~~~
                                                                                    उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून
                                                                                    परवा आहे उद्याच नंतर बोलू काही
                                                                                    चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही

                                                                                    या वर्षीचा म्हणजे २००९ चा ववि यशस्वीरित्या पार पडला.

                                                                                    सर्व ववि संयोजकांचे आणि सा. स. संयोजकांचे मनापासून हार्दिक अभिनंदन ............. Happy

                                                                                    ~~~~~~~~~~~~~~
                                                                                    उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून
                                                                                    परवा आहे उद्याच नंतर बोलू काही
                                                                                    चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही

                                                                                    वा वा वा.... आता वृ येउ देत लवकर!!!!

                                                                                    मी नाही येउ शकले या वेळी Sad

                                                                                    सूर तेच छेडिता गीत उमटले नवे....

                                                                                    लईच मज्जा आली कालच्या वविला... Happy

                                                                                    हो खूप मज्जा आली. ५ वर्षांनंतर वविला हजेरी लावली होती.. मज्जा आली..

                                                                                    ----------------------
                                                                                    हलके घ्या, जड घ्या
                                                                                    दिवे घ्या, अंधार घ्या
                                                                                    घ्या, घेऊ नका
                                                                                    तुमचा प्रश्न आहे!

                                                                                    काल खुप मजा आली ववि ला !! कालचा धबधबा मात्र खरच मस्त होता !!! फुल्ल्टू धमाल !!!!

                                                                                    मावळसृष्टी येथे उधाणलेल्या उत्साहात पार पडलेल्या वविच्या वृत्तांत व प्रतिक्रियांसाठी बघा-
                                                                                    http://www.maayboli.com/node/9430

                                                                                    संयोजक,
                                                                                    "हे पान पहायची परवानगी नाही.
                                                                                    हा नवीन सभासदांसाठी बंद ग्रूप आहे. फक्त ग्रूपचे व्यवस्थापक, नवीन सभासदांना सभासदत्व देऊ शकतात."
                                                                                    असं दिसतंय.

                                                                                    ववि संयोजक आणि सांस संयोजकांचे हार्दीक अभिनंदन Happy
                                                                                    कालचा ववि उत्कृष्टपणे पार पडला Happy

                                                                                    ************
                                                                                    To get something you never had, you have to do something you never did.

                                                                                    तो धागा चुकून 'सार्वजनिक' करायचा राहिला होता, त्याबद्दल क्षमस्व.

                                                                                    यापुढील सर्व वृत्तांत व प्रतिक्रिया कृपया तिथे लिहाव्यात. Happy

                                                                                    संयोजक,
                                                                                    "हे पान पहायची परवानगी नाही.
                                                                                    हा नवीन सभासदांसाठी बंद ग्रूप आहे. फक्त ग्रूपचे व्यवस्थापक, नवीन सभासदांना सभासदत्व देऊ शकतात."
                                                                                    असं दिसतंय.>>>>> मलापण. Sad

                                                                                    Pages