महाबळेश्वर ट्रीप

Submitted by प्रितीभुषण on 24 March, 2014 - 03:25

लोकहो मला महाबळेश्वर ला जाण्याची माहिती हवी
म्हणजे नवी मुंबई ते महाबळेश्वर कसे , रस्ता कोण ता
MTDC पासुन साईट सिई ग ई
कोणी गेले असेल तर इथे लिहा , मी येता weekend plan करतीये

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रितीभूषण, लवकरात लवकर बुक कर. आता १० वीच्या परीक्षा संपल्या आहेत म्हटल्यावर महाबळेश्बरला गर्दी असणार.

मायबोलीवरच सर्च करून बघितलंस का आधी? इथे चिक्कार माहिती आधिच असेल. : http://www.maayboli.com/search_results?as_q=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%...

इथेही हेडरमध्ये आणि प्रतिसादात महाबळेश्वरची माहिती मिळेल. शिवाय http://www.tripadvisor.in/ हॉटेलांसंदर्भात माहिती मिळेल. आम्ही ब्राईटलँड रीझॉर्टमध्ये राहिलो होतो. फार छान आहे ते.

नवी मुंबईहून बाय रोड स्वतःच्या कारमधून जाणार असशील तर फारतर ५ तास लागतील. रस्ता छान आहे. लवकर निघालात तर ट्रॅफिक आणि ऊन दोन्ही टाळता येईल. जाता जाताच वाईच्या गणपतीचे दर्शन घेता येईल. महाबळेश्वर मध्ये शिरताच मॅप्रो गार्डनमध्ये खाऊन मग हॉटेलवर जाता येईल.

महाबळेश्वरला मस्त ताज्या भाज्या मिळतात. जमल्यास वांगी, पालेभाज्या, बटाटे घेऊन ये. तिथले इंद्राणी तांदुळही अतिशय चविष्ट असतात.

आजकाल महाबळेश्वर उन्हाळ्यात जाण्यासारखे राहिलेले नाही.... सुट्ट्यांच्या दिवसात आणि वीकेंडला तर नाहीच नाही.... रस्ते अरुंद असल्याने सगळीकडे नुसते ट्रॅफिक जाम झालेले असते.... जिकडे जाल तिकडे गर्दी, चढे भाव आणि सगळ्याचे कमर्शिलायझेशन.... त्यापेक्षा पावसाळ्यात जा..... भर पावसात महाबळेश्वरची मजा काही औरच असते Happy

स्वरुप
+ .एप्रिल मे महाग .बहुतेक एमटिडीसी बुक केले आहे तर जाणारच .
रस्ता १)न०मुं -पनवेल-पेण-माणगाव-महाड(१४०किमी) पोलादपूर -येथून गोवा रस्ता
सोडून डावीकडे ४०किमि घाट चढून -महा०श्वर .
२)न०मुं०-कळमबोली -इक्सप्रेस वे -पुढे तोच सातारा रोड (पुण्याच्या बाहेरून)
शिरवळ पुढे वाई छोटा घाट -पाचगणी महा०श्वर .
जाताना महाडमार्गे एक वाजता पोहोचून संध्याकाळचे वेणणालेक वगैरे होईल
।सकाळी महा०देऊळ ,आणि जवळचे पॉईंट करणे .संधयाकाळी बाजार भटकणे खरेदी
.तिसरे दिवशी सकाळीच आठला चेक आउट करून पाचगणी टेबल लैंड ,मग वाईचा गणपती
,जमल्यास बालाजी करत रात्री नउपर्यंत ईक्सप्रेसवेने परत येता येईल .

आले जाउन
mumbai -e:way-wai-mbleshwr

दिवस १ ला
१> मुंबई महाबलेश्वर प्रवासात पाचगनी येथे थांबले हॉटेल gandharv मधे जेवण केले
[सोलकढी काहि चांगली मिळाली नाही
२> MTDC मधे चेक इन केले[ रूम्स अगदीच बर्या होत्या १२०० च्या मानाने ]थोडा आराम करुन वेणणा लेक कडे गेलो
पॅडल वाली बोट केली - मी अन नवर्या ने हाकली
३> रात्री MTDC हॉतेलातच जेवलो [ सो सो जेवण होते
दिवस २ रा
१> सकाळी ८.३० ला तयार होउन मंदीरात गेलो [old mahabaleshwar + panchganga].. मस्त वाटले
२> तिथुन २ ३ points केले सोबत आइ बाबा असल्याने ते जास्त फिरले नाही
३> ५ ला प्रताप गडा वर गेलो तुळगा भवानी चे दर्शन घेतले आंधार होत आस ल्याने परत लवकरच निघालो

दिवस ३ रा
१> सकाळी ९ ला चेक आउट केले तापोळ्याला गेलो
सिझन नसल्याने काहिच नव्हते तिथे
बोटिंग करुन रस्त्यात प्रती बालाजी करुन ७.३० पर्यंत नेरुळ्[घरी] आलो

थोडक्यात बरी झाली सहल !!

व्वॉव लगेच वृत्तांतही आला .पाडवा गडावर झाला .छान !एमटिडीसीला आम्ही कधीच टाटा केला .घेतलेल्या पैशाचं काही देणं लागतो हे त्यांच्या गावीही नसतं .जाऊ दे .सप्टेंबरात (गणपतीत) फक्त माउंट अबू तीन दिवस करा .स्वस्त आणि मस्त .हॉटेलचे बुकिंगपण करायची गरज नाही .

वापि ,सुरत पुढे पाऊस नसतो .परंतु नखी तलाव भरलेला असतो .हॉटेल्सचे दर नवारात्रीपासून वाढवतात .गुजराती आणि बंगाली (LTA वाले) येतात .महत्त्वाचे तिकडेही सार्वजनिक गणपती असतात .वातावरण फारच छान असते .

महाबळेश्वर ट्रीप झाली.
१७-२० एप्रिल (३ रात्र - ४ दिवस)

१७ एप्रिलला महामंडळाच्या बशीने जाण्याचे आरक्षण केले होते! पण बहुतेक मतदानामुळे भरपूर बसेस रद्द झाल्या होत्या / उशिरा धावत होत्या.
आमची ९:३० ची बस ११ ला आली आणि त्यात पन विनाआरक्षण वाली, धावपळ करीत जाग पकडावी लागली.
४ ला महाबळेश्वरला पोचलो. हॉटेल श्रेयस स्टँडसमोरच असल्याने बरं झालं. संध्याकाळी मार्केटातच टाइमपास केला.

१८ एप्रिलला तापोळा, क्षेत्र महाबळेश्वर, मॅप्रो गार्डन आणि वेण्णा लेक केलं.
१९ ला जुने महाबळेश्वर केलं, २० ला परत पुण्यात.

श्रेयस मधील जेवण मस्त होते, महागडे पण होतेच. मॅप्रोचा स्ट्रॉबेरी महोत्सव सुरू होता, छान कार्यक्रम सादर केले. या तीन-चार दिवसात हवा छान थंड होती आणि पाऊस ही पडला त्यामुळे छान वाटलं.

मी २०११ जुनच्या सुमारास गेलो होतो, पावसाळा जस्ट सुरू झाला होता. रात्रीच्या गारव्यात पाऊस गायब असायचा तेव्हा मार्केटमधे फिरायला खुप मजा यायची. आणि दिवसभर पावसात साईटसीईंग... आठवणी ताज्या झाल्या Happy
DSCN1161

मला सापूतारा बद्द्ल माहिती हवी......

म्हणजे तेथील ठिकान, hotels, resort ,lodge

कोणी गेले असेल तर इथे लिहा , येता weekend .ला जायचय

पुण्याहून महाबळेश्वराला जाण्यासाठी चांगला पर्याय कुठला? माझी आई, बहिणे, तिची कन्या, माझी पुतणी असे चार जण आहेत. तेथून पुढे पाचगणीला जाणार आहेत.

सविस्तर माहिती मिळेल का?