मुलगा

Submitted by राजसी on 28 March, 2014 - 02:38

गेल्या आठवड्यातली गोष्ट. सकाळी मुलाचं शाळेत जाण्यासाठी आवरून देणे चालले होते. माझं नेहमीचं Race against time आणि मुलासाठी रोजचंच बस काय? शाळा काय? आणि आवराआवर काय कुठे पळून जातात का म्हणून रमतगमत.

त्याने अचानक विचारले, " आई, Do you like boys?"

मी एकदम सतर्क पण तसं न दाखवता त्याची पँट पुढे करून, " हं. (प्रश्नाचा रोख काय कळला की मग नक्की हो-नाही सांगता येइल.) पाय घाल रे, किती उशीर?

"मी जेव्हा बॉर्न झालो ना तेव्हा तुला डॉक्टरनी सांगितले इट्स अ बॉय. वेअर यू व्हेरी हॅपी ऑर यू वॉन्टेड अ गर्ल?" मन अचानक झर्रकन २५-३० वर्षे भूतकाळात ...... धाकटी भगिनी बाबांना विचारत होती, " बाबा, तुम्हाला दु:ख झालं होत का मी दुसरी मुलगीच झाले म्हणून?" तेव्हा बाबांचा चेहरा असा का दिसला होता ते आत्ता कळलं. बिचारे! आयुष्यभर विचार करत राहिले की आपल्या वागण्यात असं काही वावगं आलं का म्हणून मुलीला असा प्रश्न विचारावासा वाटला. माझ्या मनांत विचारांचा गोंधळ आणि विचारांना दिशा काही नाही. जिन्स म्हणतात ते हेच असावेत बहुतेक! तिच्या डावरेपणा बरोबर विचार आणि त्याचा उच्चार करायची अक्कल(?) पण घेतली वाटतं. मला मुलगाच हवा होता तेव्हा .... आम्ही दोघी बहिणी त्यामुळे मुलांचे आयुष्य जास्त सोयीस्कर असते असा तेव्हाचा समज होता. स्वतःचा, स्वतःच्या दुटप्पीपणाचा राग पण यायचा पूर्ण नऊ महिने. काय हे स्वतःलाच आपण नको आहोत? काय उपयोग आपल्या शिक्षणाचा? संस्कारांचा? एवढं सगळं कळून-सवरून परत टिपिकल बाईसारख्या आपण पण मुलगा झाला तर बरं असा विचार करणार. पोटातल्या बाळांला पण आपले विचार कळत असतीलच, मुलगी असेल तर काय विचार करेल मोठी झाल्यावर आपल्याबद्द्ल? देवा! मुलगा असला तर बरं (५१%) आणि मुलगी असेल (४९%) तर प्लीज तिला हे सगळं आठवू दे नको. मुलगीच हवी असा विचार करायला लावणारे प्रत्येक आर्ग्युमेंट मुलगा झाला तर (त्यावेळी वाटणार्‍या) सोयीपुढे (म्हातारपणाची नाही) निष्प्रभ ठरत होते. शुद्धीवर आल्यावर जेव्हा मुलगा झाल्याचे कळले होते तेव्हा मनासारखं झाल्यामुळे सुटल्यासारखे वाटल्याचे अंधुक आठवते .....

"हो. मला खूप आनंद झाला होता, तू मुलगा झालास म्हणून" (निदान आता खरं बोलायची तरी हिंमत करू. श्या! काय हा नेभळटपणा) मी.

"Phew! I was really worried. I know Baba must have been very very happy that I am a boy, we are same-same. But I don't like girls so I was worried if You didn't like boys then I would've been sad."

"आता तूला का मुली आवडत नाहीत?" मी.

"They are know-it-all, hand raisers and mean. They know all the spellings especially big with 20 alphabets, know tables till 20 even though we have sums till tables10. If Mam tells to keep quiet, they can non-stop stare at Mam or blackboard. Their team always wins any puzzles round because Mam is also a girl and She doesn't like boys team winning, I think."

"अरे! पण तुझा कोणी हात किंवा तोंड धरलयं का? अभ्यास करू नकोस, स्पेलिंग, पाढे लक्षात ठेवू नकोस म्हणून. आणि मॅडम वर्गात गप्प बसायला सांगतात तेव्हा तू का नाही गप्प बसत?" मी.

"How boring! No fun. Did you like boys when you were little?" मुलगा.

नाही. ते मला जोरात मारून सुसाट पळून जायचे. मला फास्ट पळता यायचे नाही, त्यांना पकडून मारायला. But I could get back at them with spellings and tables." मी.

"I am happy that You got me when you started liking boys now and not when you were hating them." मुलगा.

" Me too" मी हसून म्हणाले.

"आई, I love that I am a boy." मुलगा.

माझ्यापुरते मला सगळ्या शंकांचे उत्तर मिळाले होते; मुलगा का हवासा वाटला ते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तंय गं!! आमचे साहेब नंतर काय शंकाकुशंका काढू शकतील याची झलक वाचायला मिळाली सध्यातरी अर्णव माळ का नाहीये, अर्णव आणि बाबा ओढणी का नाहीये इ. प्रश्नांवर उत्तरं चाचपडतेय Happy क्यूट आहे तुझा मुलगा आणि समंजसही!! किती साध्या (!!) पद्धतीने मनातील शंका मांडल्या आहेत आणि एक्स्प्लेनेशनही गर्ल्स न आवडण्याचं!! (पटलं बुवा एकदम Happy )

मस्तच! मुलांना खूपदा अगदी साधी सोपी उत्तरं हवी असतात, आपण त्यांच्या प्रश्नांचे नको ते अर्थ लावत बसतो!

मस्तच! मुलांना खूपदा अगदी साधी सोपी उत्तरं हवी असतात, आपण त्यांच्या प्रश्नांचे नको ते अर्थ लावत बसतो!
>>>>>>>>>>>
+७८६

मस्त! मला २ मुलगेच असल्याने आणि मी स्वतः बहिणीं मध्ये वाढलेली असल्याने अगदीच रिलेट करू शकले.

girls are so boring! या त्यांच्या (वय वर्षे ७ आणि ४) वाक्याने पुर्वी डोकं फिरायचं. पण त्यांच्या दृष्टीने Star Wars
वगैरे गेम्स खेळत नाहीत म्हणजे - बोरिंग! हे ऐकून काय म्हणावे ते कळेना! Happy

धन्यवाद, मंडळी.... आवडल्याचं कळवल्याबद्द्ल... Happy

मला थोडसं शिकायला मिळालं वरच्या प्रसंगात-संवादात... त्याच्या मते तो पण विक्टीम आहे, डिस्क्रिमिनेशनचा, त्याच्यात पण उणीवा आहेत... तो पण मागे पडतो ..... त्याला तरीही 'तो स्वतः' आवडतो. मला स्वतःला बर्‍याचदा छोट्या-छोट्या प्रसंगात माझ्यावर मुलगी / बाई आहे म्हणून अन्याय होतो असं वाटायच.... अजूनही क्वचित वाटतं .... क्वचित विचार केला गेलाय बाईच्या जन्माला आलो म्हणून .... मला त्याच्या स्वतः आवडण्याचा त्या क्षणाला हेवा आणि अभिमान दोन्ही वाटलं ... म्हणून हा प्रपंच.....