आई मी गोरी आहे का गं?
ठकू, अभ्यास झालाय का तुझा सगळा? असले प्रश्न विचारण्यापेक्षा होमवर्क संपव.
पण आमच्या वर्गातली ती आसावरी आहे ना, ती म्हणाली की ती सगळ्यात गोरी आहे.
आई, गोरं असणं म्हणजे काय?
म्हणजे रंग उजळ असणे.
म्हणजे?
म्हणजे त्वचेचा रंग पांढरा, गुलाबी असा असणे.
मग मी नाहीये गोरी. माझा रंग तर बेसनाच्या लाडूसारखा आहे.
आहेसच तू आमचा लाडू!
आई, माझा रंग असा का झाला?
अगं, तू झालीस तेव्हा किनई डॉक्टर कॉफी पीत होते. आणि तू त्यांच्या कॉफीच्या भांड्यात पडलीस. बुदुक करून!
आं! आई खरं खरं सांग ना! मी का नाही आसावरी सारखी गोरी? तुला माहितीये, तिचे डोळेपण असे हिरवे हिरवे आहेत. आवळ्यासारखे!
पण तिच्या आवळ्यासारख्या डोळ्यांना तुझ्या पापण्यांसारखी मोठी झालर आहे का? आणि तू पाहिलंयस का कधी? तुझ्या चॉकलेटसारख्या बुबुळाला एक हलकसं निळं रिंगण आहे ते?
हो? थांब हं मी बघून येते. खरच की गं आई! मी तर हे पहिलंच नव्हतं!
पण आई गोरं असणं चांगलं असतं ना?
अगं ठकूताई, कशापेक्षा चांगलं?
माझ्यापेक्षा?
हे तुला कुणी सांगितलं?
राहुलदादाची आई म्हणत होती ना तेव्हा, त्यांची सून त्या दुस-या मामींच्या सुनेपेक्षा गोरी आहे.
ठके, मोठ्या माणसांचं बोलणं असं कान देऊन ऐकायचं नाही असं किती वेळा सांगितलय तुला?
आणि असं काही नसतं. गोरं, काळं असल्यानी काही फरक पडत नाही.
मग ती टीव्हीवर जाहिरात का करतात? क्रीम लावलं की गोरं होतं चार ह्फ्तोमे. आई हफ्तोमे म्हणजे काय?
तुझं बोलणं आणि तुझा टीव्ही, दोन्ही बंद करते आता!
पण मग आई, मी बेस्ट कशी दिसणार?
तू बेस्ट दिसतेस ना! जेव्हा तू बाहेर चिखलात खेळत असतेस. किंवा, त्या आंब्याच्या फांदीवर बांधलेल्या झोपाळ्यावरून उलटी लटकून मला वेडावून दाखवतेस तेव्हा! कुठली कुठली भिजलेली कुत्र्याची पिल्लं घरी आणतेस तेव्हा, आणि त्यांच्यासाठी पोळ्या करायला मावशींना रडून रडून गळ घालतेस तेव्हा.
तेव्हा मी गोरी दिसते?
नाही, तेव्हा तू पूर्ण युनीव्हर्समधली सगळ्यात सुंदर मुलगी दिसतेस.
का?
कारण तू खूष असतेस.
लव्हली
Submitted by सई केसकर on 26 March, 2014 - 07:07
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमच्या घरचे माझे आणि लेकीचे
मस्त आवड्लं
मस्त आवड्लं
छान आहे . आवडेश लहान मूलांना
छान आहे . आवडेश
लहान मूलांना जाहीराती ना सगळ्याच ़खर्या वाट्तात....
खूपच मस्त...
खूपच मस्त...
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
आवडले.
आवडले.
मस्त.
मस्त.
आईचा दृष्टीकोन किती छान निकोप
आईचा दृष्टीकोन किती छान निकोप आहे! आवडलं!
(No subject)
(No subject)
शो श्वीट आई लेकी मधले संभाषण
शो श्वीट आई लेकी मधले संभाषण
आमच्या घरचे माझे आणि
आमच्या घरचे माझे आणि लेकाचे संवाद वाटले मला...:)
:...खरच खुप त्रास देतो असे प्रश्न विचारुन ... समजवता ... समजवता नाकि नउ येतात...:(
:
आपल्या देशात अगदी
आपल्या देशात अगदी मध्य्मवर्गीय बायकानाही खाण्यापिण्यात केलेल्या काटकसरीमुळे पंडुरोग(iron deficiency),calcium deficieny असते.डाळीसुध्दा महाग म्हनुन लोकाम्ची ओरड असते. त्याच देशात ह्या fairness creams ची उलाधाल मात्र १५००० कोटींचा टप्पा ओलांदुन गेलि आहे.
मजा म्हणजे हा ग्राहक lower middle class ,rural ,semi urban section मधे ३०% न्या वाढतोय दरवर्षी.
ती १०gmची tube १० ला घेताना काही वातत नाही पण आपण १००० रु. किलोने अशी वस्तु विकत घेतोय की जिचा आपल्याला काहीच उप्योग होणार नाही हे कुणाच्या मनातही येत नाही.
त्या उलट १० रुपयाची ४ केळीघेतली तर पुरेसे उष्मांकही पोटात जातात आणि आवश्यक अन्नघटकाही.
कुठल्या ही cream ने त्वचेचा मुळ रंग बदलु शकत नाही ,इति माझी त्वचा रोगतज्ञ
आवडले आणि पटलेही!
आवडले आणि पटलेही!
वाईट वाटले वाचुन.. बिचारीला
वाईट वाटले वाचुन.. बिचारीला गोरा रंग म्हणजे काय माहित नाही पण गोरा रंग म्हणजेच चांगले हे कंडीशनिंग मात्र होतेय.
गो-या सुनेवरुन आठवले, अशाच एका दोन सुनावाल्या सासुशी एकदा बोलताना, तिने 'दुसरी सुन गोरी आहे पण भांडकुदळ आहे' अशा अर्थाचे काहीतरी उद्गार काढले. तिला मी म्हटले गोरी म्हणजे चांगली हे कोणी सांगितले तुम्हाला... आधी तोंडाकडे बघतच राहिली ती. मग विचारात पडली. तिलाही कुठेतरी पटले असणार मनातल्या मनात.
म्हणजे हा ग्राहक lower middle class ,rural ,semi urban section मधे ३०% न्या वाढतोय दरवर्षी.
ती १०gmची tube १० ला घेताना काही वातत नाही पण आपण १००० रु. किलोने अशी वस्तु विकत घेतोय की जिचा आपल्याला काहीच उप्योग होणार नाही हे कुणाच्या मनातही येत नाही.
त्या उलट १० रुपयाची ४ केळीघेतली तर पुरेसे उष्मांकही पोटात जातात आणि आवश्यक अन्नघटकाही.
+१००
छान! खूप आवडलं...
छान! खूप आवडलं...
लव्हली!
लव्हली!
छान आहे संवाद आणि गोष्टीतली
छान आहे संवाद आणि गोष्टीतली आई एकदम मस्त ..
छान लिहलयसं
छान लिहलयसं
मला भारतात गोर्या रंगाचे
मला भारतात गोर्या रंगाचे खूपच स्तोम माजलेले (हच शब्द योग्य आहे) दिसले.
सुरुवातील, म्हणजे माझ्या लहानपणी असे वाटले नाही की इतक्या क्रीमा आहेत बाजारात.. बहुधा चर्चा न्हवती वा टीवी कमी पाहत होते. पण २० मिनीटाच्या कुठल्याही सिरीयलीत, कुठल्याही चॅनेलवर दोन तरे गोर्या त्वचा पाने के लिये ची अॅड असेल. खूपच बेकार वाटतं.
मॉल मध्ये तर कचर्यासारख्या गोर्या त्वचेची क्रीमा, लोशनं, वगैरे वगैरे.
बरं, नुसतं गोरे पणा किती चांगला ह्याचे अगदी नकोसे भाषणं असतात लिहिलेली त्या क्रीमांवर.
त्वचा चकचकीत ठेवणे वेगळे आणि गोरेपणा साठी धडपडणे वेगळे... पण ह्या अॅड फेअर लवली मध्ये, तुम्हारी त्वचा कैसे गोरी होती है वगैरे ठसवत असतात...
एक अशीव मुर्ख अॅड पाहून मी आणि माझी मुलगी चेष्टा करतो आता... त्यांचे शब्द इतके बेक्कार आहेत ना,
मेरी काली त्वचासे मुझसे कोइ दोस्ती नही करता था, मेरा आत्मविश्वास कम था, ना मुझे कोइ जॉब इंटर्व्युमें कोइ नौकरी देता था.. ना मुझे कोइ अपना साथी मिलता था...फिर मुझे इस क्रीम के बारे मे पता चला...
मग एकदम तिचे क्रीम का लोशन ने थापलेले अंग आणि थोड्याच दिवसात तिला कसा मित्र मिळाला, नोकरी मिळाली. का तर गोर्या रंगाने. क्रीमचे नाव आहे फेअर लूक.
पॅथेटीक एकदम!
बरं, त्या लोशनात टोमॅटो मिक्स करून पुर्ण अंगाला थापून बसलेली दाखवलीय...
भारतात हे खूपच वाढत चाललेय(कि आधीच होतं , माहीत नाही).
झंपी, अगदी मनातलं बोललात. तो
झंपी,
अगदी मनातलं बोललात. तो स्तोम हा शब्द सर्वथैव अचूक आहे.
गोरे रंगपे न इतना गुमान कर
गोरा रंग दो दिनमे ढल जायेगा!
अगदी या ओळींतही गोऱ्या रंगाचं आकर्षण सूचित होतंच.
आ.न.,
-गा.पै.
मस्त लिहीले
मस्त लिहीले आहे!
http://www.youtube.com/watch?v=ZPCkfARH2eE
आगावु,
आगावु,
मस्त लिहल आहे प्रतिक्रीया पण
मस्त लिहल आहे
प्रतिक्रीया पण छान.
छान लिहलेय..
छान लिहलेय..
@आगाऊ फारच मस्त व्हिडियो आहे!
@आगाऊ
फारच मस्त व्हिडियो आहे! धन्यवाद!
मस्त लेख.. मस्त वीडीयो!
मस्त लेख.. मस्त वीडीयो!