मायबोलीच्या डाटाबेसचे नवीन सर्वरवर स्थलांतर

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

काही मिनिटांपूर्वी मायबोलीच्या डाटाबेसचे नवीन सर्वरवर स्थलांतर झाले आहे.

बहुतेक मायबोलीकरांना काहीच फरक जाणवणार नाही. जाणवलाच तर मायबोली जास्त वेगवान झाल्यासारखे वाटेल. नवीन SSD तंत्रज्ञान असलेल्या या सर्वरमधे काहीच फिरते भाग नाहीत. आपल्यासाठी जास्तीची जागा, नविन सुविधा आणि भविष्यातील काही योजनांसाठी नवीन तंत्रज्ञान आणि जास्तीचा वेग यातून मिळेल अशी आशा आहे.

नवीन हार्डवेअर/सॉफ्टवेअर असल्यामुळे काही अडचण आली तर कृपया याच धाग्यावर सांगा.

विषय: 
प्रकार: 

कला शाखेतील माझे सारे शिक्षण असल्याने ह्या तांत्रिक घटकांत मला विशेष गती नाही; पण वर दिनेश म्हणतात त्याप्रमाणे "मायबोलीच्या प्रगती" साठी होणार्‍या प्रत्येक गोष्टीबाबत अभिमानच वाटत राहील.

अभिनंदन.

अभिनंदन... मायबोलीची प्रगती म्हणजे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट ! > खरंच आहे! Happy
तरीच आज सकाळी माबो उघड्त नवतं घरी...! सर्वर नॉट फाउंड एरर होता. पण १०/१५ मिंटात झालं ठीक.

अभिनंदन!! काहिच फरक जाणवला नाही. बदल एकदम स्मूथ झाला आहे. SSD * लाळ गाळणारी बाहूली * (आमच्या office मधे SSD laptop साठी खूप मस्कामारी करावी लागते !!)

घाईत मायबोलीच्या डायबेटीसचे असे शब्द वाचले गेले Wink

सीमलेस ट्रान्स्फर झालेली दिसतेय. कुठेही त्रास जाणवत नाहिये. अभिनंदन.

अभिनंदन,
मायबोलीच प्रत्येक पाऊल
म्हणजे प्रगतीची चाहूल
आमचीहि होवो प्रगती
मायबोलीच्या संगती
धन्यवाद

अभिनन्दन! मी पण सकाळी आधी घाईत मायबोलीच डायबेटीस असे वाचले.:अरेरे::फिदी:

मला वाटले नवीन बाफ सुरु झाला.

mala mabo load vhayala tras hotoy duparpasun.

madhech purna page load hotay. pan atta iphone varun hi marathit type karata yet nahiye Sad

आता लोड झालं पेज. पण दुपारपासून हा प्रॉब्लेम येतोय मला. मराठीत टाईप करायचा बॉक्स, बोल्ड, इटॅलिक हे ऑप्शन्स नाही दिसत मग.

SSD तंत्रज्ञान असलेल्या या सर्वरमधे >> Woohoo!

आम्ही अलिकडेच काही मिशन क्रिटिकल अ‍ॅपकरता अशा ड्राइव्हस वापरणे चालू केले आहे. अमेझिंग पर्फॉर्मंस जंप आहे.
एकदम सीमलेस मायग्रेशन बद्दल अभिनंदन !

वा वा अभिनंदन! अशिच उत्तरोत्तर प्रगती होऊ देत. प्रत्येक नविन तंत्रज्ञान (गरजेचे अर्थात) मायबोली वापरू देत.

SSD तंत्रज्ञान असलेल्या या सर्वरमधे काहीच फिरते भाग नाहीत >>> अहो हे मुव्हिंग पार्टचे जशास तसे भाषांतर म्हणजे फारच. Happy

Pages