Submitted by सुप्रिया जाधव. on 9 March, 2014 - 14:52
झोपेवर की त्याच्यावर फोडावे खापर ?
माझ्या स्वप्नांमध्ये हल्ली ज्याचा वावर
वास्तवतेच्या खात्यावरती खर्ची पडती
आठवणींच्या ठेवीसुध्दा जपून वापर
त्याच्या-माझ्या आत खोलवर रुजते काही
काही फुलले नाही हे भासवतो वरवर !
तुझ्या मनाचा तुला घ्यायचा कौलच नाही
तूच सांग ना काय अता मी बोलू यावर ?
कधी ठेवली मलाच नक्की माहित नाही
आयुष्याच्या पाणवठ्यावर उपडी घागर
काल शेवटी शत्रुंची यादीच बनवली
नांव स्वतःचे लिहीत गेले पूर्ण पानभर
कोण कुणाच्या मनात करते कायमचे घर ?
पक्षी उडतो दाणा-पाणी टिपल्यानंतर
मालिकेहुनी जाहिरात उसळून पहावी
मुद्दा वगळुन बोलत बसतो तसे अवांतर
तुला वाटते तितकी ती ना लेचीपेची
तिला वाटतो तितकाही नाहिस तू कणखर
कुणी कुणाचे नसते भरल्या दुनियेमध्ये
आलो शेवट आपणही या निष्कर्षावर
सांगायाचे असते काही उमगत नाही
दारुण ठरते शेवटच्या श्वासांची घर-घर
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुझ्या मनाचा तुला घ्यायचा
तुझ्या मनाचा तुला घ्यायचा कौलच नाही..
तूच सांग ना काय अता मी बोलू यावर ?
कधी ठेवली मलाच नक्की माहित नाही
आयुष्याच्या पाणवठ्यावर उपडी घागर
सांगायाचे असते काही उमगत नाही
दारुण ठरते शेवटच्या श्वासांची घर-घर<<<
चढ्या क्रमाने चांगले शेर!
सुंदर
सुंदर रचना.
<<
त्याच्या-माझ्या आत खोलवर रुजते काही
काही फुलले नाही हे भासवतो वरवर !
तुझ्या मनाचा तुला घ्यायचा कौलच नाही..
तूच सांग ना काय अता मी बोलू यावर ?
सांगायाचे असते काही उमगत नाही
दारुण ठरते शेवटच्या श्वासांची घर-घर >>
क्या बात है!
>> वास्तवतेच्या खात्यावरती
>>
वास्तवतेच्या खात्यावरती खर्ची पडती
आठवणींच्या ठेवीसुध्दा जपून वापर !
>>
हा विशेष आवडला.
छान आहे. बेफिकीर +१
छान आहे.
बेफिकीर +१
छान.. आवडली
छान..
आवडली
सगळे शेर आवडले शेवटच्या ३
सगळे शेर आवडले शेवटच्या ३ शेरांबाबत बेफीजी+१
धन्यवाद !
धन्यवाद !
तिसरा आणि पाचवा शेर सर्वात
तिसरा आणि पाचवा शेर सर्वात छान.
सुंदर . पहिले दोन अत्यंतच.
सुंदर . पहिले दोन अत्यंतच.
2,4,5,6 सर्वांत जास्त
2,4,5,6 सर्वांत जास्त आवडले
धन्यवाद
त्याच्या-माझ्या आत खोलवर
त्याच्या-माझ्या आत खोलवर रुजते काही
काही फुलले नाही हे भासवतो वरवर !
वाहवा अख्खी गझल झक्कास जमली आहे
आभार मंडळी .
आभार मंडळी .
>>>तुझ्या मनाचा तुला घ्यायचा
>>>तुझ्या मनाचा तुला घ्यायचा कौलच नाही..
तूच सांग ना काय अता मी बोलू यावर ?
कधी ठेवली मलाच नक्की माहित नाही
आयुष्याच्या पाणवठ्यावर उपडी घागर
काल शेवटी शत्रुंची यादीच बनवली
नांव स्वतःचे लिहीत गेले पूर्ण पानभर !>>>वाव्वा...वाह् ! एक सर एक!
आवडली गझल!