केमिस्ट्री ऑफ जंक फुड

Submitted by मंजूताई on 10 March, 2014 - 05:02

साधारणतः सध्या सगळ्या घरांमध्ये बाहेरुन आणलेले तयार खाद्यपदार्थ खाण्याचे प्रमाण खूपचं वाढलंय. पिझ्झा, बर्गर, पावभाजी, वडापाव, कोला हे खास आवडीचे पदार्थ. हे पदार्थ खाणं कितपत योग्य आहे? हा प्रश्न प्रत्येक पालकाच्या मनात आहे म्हणून सेतू - अ कॉन्शस पॅरेंट फोरमतर्फे 'केमिस्ट्री ऑफ जंक फूड' ह्या विषयावर एक चर्चात्मक कार्यक्रम आयोजित केला होता. व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर असलेले श्री रविकिरण महाजन आहारशस्रेआवर कसे बोलणार हा प्रश्न काहींना होता. पण बोलायला सुरुवात करताच, थोड्या वेळातच आहारशास्त्रावर त्यांनी किती अंगाने आणि किती खोलवर अभ्यास केलाय हे सुज्ञांना स्मजायला वेळ लागला नाही. त्यांच्या भाषणाचा सारांश

मी असाध्य अश्या रोगातून आहारा व योगामुळे बरे झालो. मला ह्रुमॅटीक आथ्रायटीस झाला होता व आता पंथाला लागल्याचे डॉ शब्दातून नाही पण देहबोलीतून सांगायचे व असा पेशंट वय वर्षे बत्तीसच्यावर(माझे वय ३३) जगत नसल्याचे दाखले दिले होते. मी त्यांना विचारले की मी तर आता ३३ वर्षांचा आहे हे कसं काय तर ते म्हणाले हा माझा विषय नाही. त्यावेळेला मी अगदी अंथरुणाला खिळून होतो. शरीरात जिथे जिथे हाडं आहेत तिथे दुखणं होतं. हाड नसलेले अवयव जीभ, ह्रुदय व मेंदू काम करीत होते . डोळ्यांमध्येही हाड नसल्यामुळे, मी वाचू शकतो हे लक्षात आलं व वाचू लागलो. विनोबा भाव्यांचं कुठेतरी वाचलेलं आठवलं की आपल्याला काही रोग झाला की आपण डॉकडे जातो. डॉ काहीतरी गोळ्या लिहून देतो,आपल्याला बरं वाटतं. पण आपण आपल्या शरीराबरोबर इतकी वर्षे राहत असतो, त्याला आपण ओळखत नाही हा आपल्या बुध्दीमत्तेचा फार मोठा अपमान आहे... विनोबांचे विचार मला पटले. मी आहार, विहार व विचार ह्याचा विचार करु लागलो. ह्यात सगळ्यात उच्च म्हणजेच वरच्या स्थानावर आहे तो 'विचार' त्यानंतर आहार व विहार. आपल्याला समाजाला, कुटुंबाला जे घडवायचे आहे ते आपल्या विचारातूनच. मी आहाराचा आपल्या शरीरावर होणारा परिणामाचा विचार करु लागलो, मी ह्या त्रीसुत्रीचा विचार करु लागलो. मी मेकॅनिकल इंजिनियर असूनही आहारशास्त्रा खोलवर अभ्यास करु लागलो. आपण आज आपल्या मुलांना भवितव्य मानतो त्यांचा आहार काय आहे? पिझ्झा, बर्गर चायनीज. ह्या अश्या सगळ्या पदार्थांचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो त्याचा विचार करु लागलो. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी तार्किक, सुसंगतपणे व त्यांना पटेल, कळेल अश्या पध्दतीने सांगायची गरज आहे. आहाराच्या बाबतीत काही प्रमाणात अज्ञान आहे. आज आपण गाडीत पेट्रोल भरतो तेव्हा काट्याकडे लक्ष ठेवतो. आपल्या शरीरात जे इंधन टाकतो त्याबाबत मात्र अनभिज्ञ/निष्काळजी असतो. अनावश्यक काय काय खातो विचार केला पाहिजे.

आपलं शारीर हे मोठचं अद्भूत आहे.आपल्या शरीरात स्वयंचलित फार मोठी रसायनशाळा आहे. उदाहरणादाखल एक सांगतो आपल्या शरीरात सतत कार्यरत असलेली एक मोठी गाळणी आहे अन ती म्हणजे किडनी. ही किडनी शरीरातले प्रोटीन्स, आरबीसी सेल्स सारख्या चांगल्या गोष्टी राखून ठेवते व वाईट युरिक असिड, सल्फेट सारख्या गोष्टी फेकून देते त्याचबरोबर केव्हा, काय व किती ठेवायचं, किती बाहेर टाकयचं हे पण ठरवते उदा पाणी. आपल्या शरीरातलं ७.४ पीएच कायम ठेवण्याचं हे मुख्य काम किडनी करत असते. हे जर का कमी जास्त झालं तर शरीर धोक्यात येतं. समजा जर दोन्हीपैकी एक किडनी फक्त तीस टक्केच काम करत असली तरीही माणुस आपलं आख्ख आयुष्य काढू शकतो . असे असताना काहींच्या दोन्ही किडन्या निकामी का होतात?

जेवण बनवणे त्याला अर्थपूर्ण असा स्वयंपाक करणे असा पर्यायी शब्द आहे आणि ही एक चौसष्ट कलांपैकी एक कला आहे. आपल्या आयुर्वेदामध्ये स्वयंपाक बनवणार्‍या व्यक्तीचा प्रभाव बनवत असलेल्या पदार्थावर व पर्यायाने खाणार्‍या व्यक्तीवर होतो असे सांगितले आहे. आपण बाहेर हॉटेलमध्ये जे अन्न खातो ते ज्याप्रकारे बनवल्या जातं हे बघितलं तर त्यात एक प्रकारची विकृती दिसून येईल अन आज समाज विकृत होतं चाललाय असंही दिसून येतंय.

'जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह उदर भरण नोहे जाणीजे यज्ञकर्म' अशी आपली प्रार्थना आहे त्या प्रार्थनेचा मी विचार केला व त्यासंबंधित सगळ्या घटकांचा, विषयांचा विचार केला. आधुनिक आहारशास्त्रात शरीर कुठकुठल्या चाळीस घटकांनी बनलंय हे सांगितल आहे पण त्यापलिकडे त्यात चैतन्य, काही व्यवस्था आहे हे सांगत नाही. आपला हा आहार हेच आपलं औषध आहे. आपली जीभ, डोळे, नखं, विष्ठा जर रोज तपासली तर कळून येते आपली तब्येत, आपला निरोगीपणा!

आता मुलांच्या आवडीच्या खाद्यपदार्थांविषयी बोलू. आपल्या मुलांनी रोज दूध प्यावं ह्याबाबत आपण जागरुक असतो. आज जे दूध मिळतंय ते सिंन्थेटीक आहे. ज्या प्रमाणात मागणी आहे त्या प्रमाणात उत्पादन नाही. ही तूट कशी भरुन काढल्या जातेय? गायींनी जास्त दूध द्यावं म्हणून त्यांना हार्मोन्सचीची इंजेक्शनं दिली जातात व त्यामुळे कॅन्सर होतो असे संशोधनाअंती उघड झालंय. तसेच ज्या फळांसाठी आग्रही असतो ती कृत्रीमरित्या पिकवली जातात. भाज्यांच विक्रमी उत्पन्न मिळविण्यासाठी युरियाचा वापर, कीटकनाशकांचा अति वापर केला जातो. द्राक्षं,सफरचंद, व इतर पदार्थ जे चकचकीत, आकर्षक दिसतात ती खाण्यास योग्य आहे का, विचार करावा.मौसमी फळ खावी. जी पेस्टीसाईडस व डब्बाबंद खाद्यपदार्थ अमेरिकेत बॅन आहेत ती आपल्या इथे सर्रास विकल्या व वापरली जातात. आइस्क्रीम, चॉकलेट सारखे पदार्थ ज्यात खूप प्रमाणात साखर, फूड कलर्स असतात ते मुलांच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत.

साखरेतून आपल्याला फक्त पोकळ उर्जा मिळते. शरीराला साखर खाऊन काही फायदा तर होत नाही पण नुकसान मात्र नक्की होते. साखर आपल्या शरीरातील कॅल्शियम शोषून घेते व कमी वयात तीस पस्तिशीमध्ये ऑस्टीयोपोरॅसिस सारखा रोग दिसून येतो. ह्या उलट गूळातून कॅल्शियम, फॉस्फरस, आर्यन, मॅग्नेशियम सारखे अतिशय उपयुक्त असे घटक मिळतात. आपल्या शरीरात प्रचंड ताकद आहे स्वतःवर उपचार करण्याची, स्वतःला संरक्षण देण्याची, त्यासाठी गरज आहे आपल्याला आपल्या शरीरावर शंभर टक्के विश्वास ठेवण्याची व वेळ देण्याची. आजच्या इनस्टंटच्या जमान्यात आपल्याकडे वेळ सोडून सगळ काही आहे. कुठलाही अवयव दुखतोय घे पेन किलर. त्या पेन किलरचा आपल्या लिव्हरवर काय परिणाम होतोय त्याचा विचार करायलाही वेळ नाही.

'संडे हो या मंडे रोज खाओ अंडे' मात्र संशोधन हे सांगत की अंडी खूप मोठ्या प्रमाणात होण्यासाठी कोंबड्यांना इस्ट्रोजनची इंजेक्शन दिली जातात व त्याने मुलींचं 'वयात येण्याचं' वय कमी कमी होत जातंयं तर मुलांची छाती मुलींसारखी होऊ लागलीये. एका अंड्यामध्ये एका कोंबडीपेक्षा जास्त कोलोस्ट्रॉल असतं. अंडी खाणे वाईट नाही. पण अंडी कोणी खाल्ली पाहिजे? तर ज्यांना अतिशय शारिरीक श्रम, कष्ट करावे लागतात त्यांनी.

जया चायनीज पदार्थांनी मुलांना वेड लावलंय त्या पदार्थांमध्ये टाकला जाणारा अजिनोमोटो. एकोणीसशे सत्तरमध्ये ज्यावर डब्लुएचओने बंदी आणली जे आज आपल्याकडे सहज पाच-दहा रुपयाला विकत मिळतं. बुध्दीमत्तेचा र्‍हास, आकलनशक्तीचा अभाव, बंडखोरी सारखे अवगुण ह्या आजकालच्या मुलांमध्ये आढळून येतात. मुलांना अतिशय आवडणारे खाद्यपदार्थ आहेत ते म्हणजे बेकरी प्रॉडक्ट्स. हे सगळे पदार्थ कोंडाविरहीत असल्यामुळे बध्द्कोष्ठता होते. नामांकित अश्या पिझ्झा बर्गरवाले त्याबरोबर अ‍ॅरेटेड, सोडा प्रकारातले पेय फ्रीमध्ये देतात किंवा विकत घेतात त्यापाठीमागचे कारण असे आहे की हे असे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ले नाहीतर ते कुठेतरी वाटेत अडकून राहतात, पोट साफ होतं नाही.

हल्ली च्युईंगम खाण्याची फॅशन आहे. हे जिथ कुठे चिकटल्या जातं ते काही करता निघत नाही त्याला कापून टाकल्याशिवाय ते निघत नाही. हे असं च्युईंगम आपल्या पोटात गेलं थोडं जरी तर काय होईल विचार करा. 'चीज' ही एक अशीच घातक चीज आहे. चीज विरघळवण्यासाठी प्रचंड उर्जा लागते, त्याला ओव्हनमध्ये टाकावं लागतं, हे पचवायला आपल्या शरीरावर किती ताण पडत असेल? शीतपेयांमध्ये फॉस्फरस असिड व अर्सेनिक सारखी शारीराला घातक रसायनं आहेत. अर्थशस्त्र्रनुसार घाऊक प्रमाणात उत्पादन झालं तर वस्तुची किंमत होते. आज ते दहा रुपयाला मिळू लागलंय. ही पेयं अ‍ॅसिडिक आहेत, ह्यांचा पीएच दोन ते तीनच्या दरम्यान आहे. सहज व स्वस्त उपलब्ध आहेत म्हणून किती खायचे?

आपण जे खाणार आहोत गोड्/तिखट त्याचा संदेश जीभ इतर अवयवांना देत असते. आपल्या शरीरातले अवयव पदार्थाच्या स्वागताला व पचवायला संदेश मिळताच सज्ज होते. पण सॅक्रीन सारख्या अनैसर्गिक शुगरफ्रीआपल्याला आता गोड पदार्थाचा संदेश जीभेने पाठवला की पॅनक्रियाज सज्ज होतात पण शुगरफ्री पदार्थाचा वाईट परीणाम पॅनक्रियाजवर अतिरिक्त ताण पडतो. जीभेसाठी पोटाला गहाण ठेवू नये . आपले शरीर ही एक सुरचित व्यवस्था आहे आणि निसर्ग ही एक! निरोगी आयुष्य जगण्यासाठी ह्या दोन्हीं व्यवस्थेचं ट्युनिंग जमणं आवश्यक आहे. आयुर्वेदशास्त्रा म्हणतं शरीर हे निव्वळ एक यंत्र नसून ह्यात चैतन्य, उर्जा, मानस- कल्पना आहेत. पण आधुनिक आहारशास्त्राला हे मान्य नाही म्हणून यंत्राप्रमाणे एखादा भाग निकामी झाला की बदलून टाकतात त्याचप्रमाणे सहजपणे आपल्या शरीरातले अवयव बदलल्या जाताहेत. जेवणे ही एक मनोभावनिक, अध्यत्मिक क्रिया आहे. आपण डोळे, नाक, जीभ्,त्वचा व मन अश्या पंचेद्रियांनी जेवत असतो. टीव्हीमुळे ही समरसता भंग होते. आपल्या शरीरात आपल्या शरीरात अल्कलाईन, असिडिक द्रव्यांचा समतोल बिघडला की रोग होतात. आज अ‍ॅलोपॅथी, रेकी, युनानी, होमियोपॅथी, आयुर्वेद,अश्या अनेक उपचार पध्द्तींची व वेगवेगळ्या सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल्सची संख्या वाढतेय पण रोग्यांची संख्या कमी झालेली नाही. ह्या सगळ्यासाठी मग काय करायचं? काय खायचं? आपला तर्क, विवेक जागृत ठेवला तर आहारतज्ञाची गरज नाही.मुखी घास घेता पेक्षा घास घेण्यापूर्वी करावा विचार..... जितकं नैसर्गिक स्वरुपात, स्थानिक बाजारात उपलब्ध मौसमी भाजी फळं खावी. काच, पितळ, लोखंड सारख्या धातुची भाडी वापरावी. हिपोक्रेट म्हणतो ते खरंच आहे... 'लेट फुड दाय बी मेडिसिन अ‍ॅन्ड मेडिसिन दाय बी फुड '

वदनी कवल घेता नाम ह्या मातृभूचे,सहज स्मरण होते आपुल्या बांधवाचे

कृषीवल कृषीकर्मी राबती दिनरात्र,श्रमिक श्रम करोनी वस्तु त्या निर्मितात

स्मरण करुनी त्यांचे, अन्न सेवा खुशाल,उदर भरण होते चित्त होण्या विशाल

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Food, Inc हे अमेरिकेतील कंपन्यासाठी असलं तरी सर्व देशांत थोड्याफार फरकाने असचं घडत असेल..

झंपी>>>+१,
पिअर गृप प्रेशर मुळे पण मुले जरा असे पदार्थ मागतात, घरी आपण व्हेरिएशन करतो पण ते पुरेसे नसते. शिवाय बाहेरची चव तशीच्या तशी घरच्या पदार्थांना येत नाही (माझी आजी म्हणायची माती नसते ना घरच्या पदार्थात बाहेर सारखी मग चव कशी येणार?), शिवाय जबरदस्तीने सतत फक्त घरचे दिले तरी मुले नाखुष रहातात, विशेषत: मोठी होणारी मुले.

माझा मुलगा दोन्ही मागतो पालेभाज्या सलाड व बाहेरचे पदार्थ, आणि दोन्ही तितक्याच तन्मयतेने व आवडीने खातो. त्यामुळे जबरदस्ती करता नाही येत.

लेख चांगला आहे. ह्यात दोन वेगवेगळे मुद्दे आहेत ...
१. तयार घटक वापरुन शिजवले जाणारे जंक फूड उदा. पिझ्झा, केकइत्यादी, बिस्कीटं इत्यादी. ह्याचा वापर टाळणे थोडी इच्छाशक्ती दाखवली तर सहजशक्य आहे. तसेच स्वयंपाकात मैद्याचा वापर टाळणे, तळण कमी करणे, साखरेऐवजी जास्तीतजास्त गूळ वापरणे हे करता येणे अवघड नाही.

२. नैसर्गिक अन्नपदार्थ उदा. दूध, भाज्या, फळे जे खरंतर जंक फूडमध्ये मोडत नाहीत पण ते पिकवताना / मिळवताना रसायनांचा वापर झाल्याने जंक फूड होऊन जातात. ह्या मुद्द्यावर मायबोलीवर आधीही चर्चा झाली आहे, 'सत्यमेव जयते' सारख्या कार्यक्रमातूनही झाली आहे. हा मुद्दा भयावह आहे आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवणे फार अवघड आहे. उदा. आमच्या घराजवळ स्थानिक लोकांनी पिकवलेल्या भाज्या मिळतात पण त्या ऑर्गॅनिक असतील असे वाटत नाही. दूध स्टँडर्ड कंपनीचे घेतले जाते. ऑर्गॅनिक म्हणून ज्या भाज्या मिळतात त्या घरापासून आठ-नऊ किमीवर आहेत, तिथे रोज जाणे शक्य नाही. शिवाय ऑरगॅनिक अन्नपदार्थ काहीच्याकाही महाग असतात ते वेगळेच ( मुद्दा फक्त मला परवडण्याचा नाही पण खरंच किती लोकांना रसायने खायची इच्छा नसेल तरी ते परवडेल हा एक प्रश्नच आहे. ) ऑरगॅनिक अंडी अजून आम्हाला इथे दिसली नाहीत. केज फ्री कोंबड्यांची मिळतात पण ऑरगॅनिक नाही दिसली !

त्या भाषण देणार्‍यांची चहापान, अल्पाहाराची सोय कशी केली होती? ते स्वतः / घरून रांधलेला डबा घेऊन आले होते किंवा कसं? का कोणा आयोजकाच्या गळ्यात पडलं होतं, त्यांच्यासाठी हेल्दी फूड कूक करून प्रोव्हाईड करणे? ते फूड नक्की हेल्दीच होतं ह्याचा नीट शहानिशा करून मगच ते संबंधितांना उदर भरण नोहे झालं ना?

'चीज' ही एक अशीच घातक चीज आहे >>
याविषयी शंका आहे. आम्ही सुरवातीला मुलीला अजीबात 'चीज' देत नव्हतो. पण आमच्या अमेरिकेतल्या डॉ नी आम्ही शाकाहारी आहोत हे बघितल्यावर तर मुलीला आवर्जुन 'चीज' द्याच म्हणून बजावले होते.

चीज खाल्याने पोट साफ होण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो म्हणुन कन्येला थोडच देत जा असे आम्हाला डॉ़टरांनी सांगितले होते. कारण कन्येचे बरेचदा पोट दुखायचे. चीज कमी केल्यावर फरक पडला. तशीही जास्त देतच नव्हते पण तेही कमी केले. आता त्रास नाही.

चीज खाल्ल्याने दातातील फटी कमी होतात्/बुजतात, असे वाचले होते. ( कारण त्यात कॅल्शियम असते हे पण वाचलेय) पण कुठल्याही गोष्टीचा अतीरेक वाईटच.

मन्जु मस्त लेख. आवडला.:स्मित:

माझे नशीब सध्या थोडेसे जोरदार आहे, कारण मुलीला न्युडल्स हा प्रकार अजीबात आवडत नसल्याने मॅगी अजीबात खात नाही. आईस्क्रीम खूप गार असते म्हणून आवडत नाही आणी केक, पेस्ट्रीज पण गोड असल्याने खात नाही.

आता थोडासा ब्रेन वॉश झालाय म्हणून जन्क फुड नाहीच आहे,मात्र मोठेपणी काय दिवे लावतीय देव जाणे. लक्ष ठेवावेच लागेल.

लेख वाचताना वाटत होते की काय द्यायला हवे हे पण कळेल. वरच्या सर्व गोश्टि माहित आहेत आणि मुलानाच काय आम्हीही जेवणात या सर्व गोष्टई टाळतो. घरात 'जन्क फूड' ठेवायचेच नाही म्ह्णजे खाल्ले जात नाही हा नियम शक्यतो पाळतो. पण तरीही काळजी वाटते.
१. मुले खूप फळे खातात. वर लिहिल्याप्रमाणे जर कीटकनाशके इतकी वापरली जात असतील तर मग काय करायचे? द्यायची की नाही फळे?
२. मुलाना सर्व प्रकारच्या उसळिचे पाणी प्यायला आवडते. अगदी पालकचे इ सुदधा. दरवेळी त्याना ते सार देताना मनात विचार येतो की आपण त्याना कीटकनाशके असलेले पाणी तर देत नाहीये ना?
३. मुलीला कच्च्या भाज्या खुप आवडतात. कितीही धुवून देत असले तरी सर्व कीटकनाशके निघून जात असतील का?

वरच्या सर्व गोष्टी खरतर खायला चान्गल्या, पण त्या देत असताना काळजि वाटत असते की चूक की बरोबर?

विद्या.

सगळ्यांना धन्यवाद!
@ राजसी - गेली अनेक वर्षे ह्या संस्थेशी जोडलेली आहे. आजपर्यंत आम्ही एका पाहुण्या तज्ञांना साधा पुषगुच्छ दिलेला नाही चहापाणी पैकी चहा देत नाही पाणी मात्र देतो. श्री रविकिरण महाजन तर आमच्या संस्थेचे कणा आहेत. त्यामुळे त्यांचा काही प्रश्नच नाही पणनागपुरातले अनेक नामवंत पाकीट, हारतुरे, चहापाणी मिळत नाही हे माहित असूनसुध्दा आवर्जून येतात. दरवर्षी आम्ही मुलांसाठी 'छंदोत्सव' घेत असतो. मागच्या वर्षी डॉ मोहन आपटे आले होते त्यासाठी फक्त भाड्याचे पैसे त्यांनी मागितले होते. जेव्हा पाकीट दिलं तेव्हा ते न घेता तेवढ्या रकमेची पावती घेतली - 'ऐसी भी होता'
श्री रविकिरण महाजन ज्यांना हात उचलता येत नव्हता ते आज वाहन चालवतात, दोन मजले चढू शकतात ते केवळ योग व आहारामुळे.
एक मंत्र - रीजनल व सीझनल खावं व अति सर्वत्र वर्जत्ये