मायबोलीवर छायाचित्र अपलोड करताना साईझचा प्रश्न!!!!

Submitted by हर्ट on 8 March, 2014 - 11:07

खूपदा आपण एखाद्या प्रदेशात फिरायला जातो. तिथे काय काय आणि काय काय बघतो अनुभवतो. ते सगळ इथे मुलामुलींना दाखवायच असत पण अस होत नाही कारण इथे छायाचित्र चिकटवताना साईझचा एक मोठा प्रश्न उपलब्ध होतो. ह्यावर काही तोडगा आहे का? पिकासा वगैरे सुचवू नका. फोटो मायबोलीच्या डीबीमधे असायला हवेत. उद्या पिकासा बंद पडले तर फुल्या दिसतील तिथे.

मीपिकसाईझर वापरुन वापरुन दमलो आहे. कधीकधी तर असे होते की आपण फोटोची साईझ कमी करुन करुन शेवटी होतो तो उत्साह मावळून जातो.

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी तुम्ही http://www.maayboli.com/node/1556 हा धागा वाचला असेलच असे गृहीत धरतो.

मायबोलीच्या डीबी ला पण मर्यादा आहेत. इतर उत्पन्नाची साधने मर्यादीत असताना पण विनामुल्य सेवा देत आहेत. अशा परिस्थितीत पिकासा, फ्लिकर, शटरफ्लाय यासारख्या कंपन्या ज्या सुविधा देत आहेत त्या मायबोलीकडुन अपेक्षिणे योग्य नाही. लिहिताना एखादा संदर्भ द्यायचा असेल तर तेवढ्या करीता इतर साईटवरुन फोटो टाकण्याचा त्रास नको म्हणुन माय्बोलीने ही image ची सुविधा दिली असावी.

पिकासा किंवा इतर सुविधा ह्या मोठ्या कंपन्यांची उत्पादने आहेत. त्यामुळे ही उत्पादने अशी एका रात्रीतुन बंद होणार नाहीत. अगदीच (माबोसोडुन) कोणत्या कंपनीवर विश्वास नसेल तर स्वतःची साईट होस्ट करुन तिथे फोटो टाकावीत. उदा. एका मायबोलीकराने आपली स्वतःची फोटोग्राफी साईट चालु केली आहे. http://www.maayboli.com/node/1556

वेगळा धागा चालु करण्यापेक्षा मायबोलीच्या प्रश्नोत्तराच्या धाग्यावरच (http://www.maayboli.com/node/1556) तुमची शंका विचारल्यास सर्व माहिती एकाच धाग्यावर संकलीत राहील आणि त्याचा इतरांना उपयोग होईल असे वाटते.

तुम्हाला हवे तिथे चित्र अपलोड करा, उदा. tinypic.com
हवे तितके मोठे असू द्या.
इथे डकवताना, त्याच्या लिंकेत img src = लिहून पत्ता दिला, की पुढे, widht="600" इतके अ‍ॅड करा. इथे दिस्ताना बरोब्बर मापात दिसेल.

दुसरे,
irfanview नामक एक उत्तम फुकट सॉफ्टवेअर आहे. ctrl+r दाबताच एक डायल्वाग बाक्स येईल, त्यात रिसाईझ मधे विड्थ = ६०० निवडा, छोटं चित्र बनेल. वाट्टेल तो पिक्चर फॉर्मॅट इंटरचेंज करता येईल. फास्ट अन सोप्पे.
हे वापरून, या क्षणाला, माझ्या पर्सनल स्पेसमधे, 148 files using 3.89 mb of 30 mb अशी परिस्थिती आहे.

Microsoft picture manager हे फ्री आहे व अतिशय उत्तम आहे ते वापरून एडीट करू शकता. dropbox अकौंट उघडून public फोल्डर हवी तितकी पिक्चर्स ठेवून इकडे link देवू शकता.