मायबोलिवर काही ठिकाणी देवनागरी का लिहिता येत नाही?

Submitted by हर्ट on 26 February, 2014 - 22:54

खूप आठवड्यांपासून मला हा अडथडा येतो आहे. काही पानांवर देवनागरीमधे लिहिता येत तर काही नाही. पुर्वी मला वाटायचं की हा अडथड फक्त माझ्याच पीसीपुरता असेल पण अलिकडे काही मायबोलिवर मिंग्लिशमधे लिहिताना आढळलेत. तर, हा प्रश्न नक्की काय आहे आणि का आहे? ह्यावर काही उपाय योजना होणार आहे की नाही? मला अजय गलेवाले ह्यांची विपु उघडून त्यात लिहून मग इथे ते डकवून असे ते काम करावे लागत आहे. मी फेवराईट्समधे अजय ह्यांची विपु लिंक ठेवली आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा प्रश्न मलाही आलेला जेव्हा मी इन्टरनेट एक्स्प्लोरर वाप्रत होतो. नन्तर मी क्रोम वापरायला सुरुवात केलि तरी अडच्ण आहेच
शिवाय क्रोम मधे ब्याक स्पेसने मागे आल्यास अन पुन्हा टाईप करु लागल्यास प्रचंड गार्बेज तयार होते, ते पुसताना वैताग येतो. मी क्रोम वापरणे थाम्बविणार आहे. मात्र आयई मधे वापर वेळखाऊ होतोय. Sad मी काय करू?

बहुधा, पेज कोड पूर्णपणे डाउनलोड न होणे हे कारण असावे, व हा युजरसाईड हार्डवेअर/सिस्टिमचाच प्रॉब्लेम असावा असे वाटते. जाणकाराअंनी खुलासा करावा.

>बहुधा, पेज कोड पूर्णपणे डाउनलोड न होणे हे कारण असावे.

मायबोलीच्या सगळ्याच पानांवर देवनागरी लिहायची सुविधा केली आहे. एकाच पानावर लिहता येत नसेल तर नक्कीच त्या पानावरचे कोड तुमच्या ब्राऊझर मधे अर्धवट उतरले गेले असावे. ब्राऊझरची तात्पुरती साठवायची जागा (cache) स्वच्छ करून पहा.

क्रोमचा प्रश्न ही तांत्रिक अडचण अगदी सुरुवातीपासूनच आहे. तेंव्हा क्रोम वापरणारे अगदी थोडे होते त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले ते तसेच राहिले. आता थोडे लक्ष देऊन काही करता येते का ते पाहतो. सध्या तात्पुरता उपाय म्हणजे या खिडकीच्या वर सफरचंदावर टिचकी मारली तर जुन्या मायबोलीत होते त्याप्रमाणे लिहता येते आणि ते सगळ्या ब्राऊझरमधे चालते.

<<<<क्रोम मधे ब्याक स्पेसने मागे आल्यास अन पुन्हा टाईप करु लागल्यास प्रचंड गार्बेज तयार होते, ते पुसताना वैताग येतो.>>>माझा आय प्याड वरील अनुभवही असाच आहे. मी चक्क गुगल transliteration वापरतो. ते उत्तम आहे.

इंटरनेट एक्स्पोलर वर मला देखील मराठी लिहिता येत नाही... Sad

क्रोम वर आरामात लिहिता येते....बॅकस्पेस केला की परत एक स्पेस करुन परत बॅक्स्पेस करायचा असतो.. जो आता हाताला सवयच लागली आहे.

अग्नीकोल्हा(फायरफॉक्स) वापरा.>>>>
Rofl मी विचारच नव्हता केला फायरफॉक्स ला अस काही म्हणाता येईल ते Rofl

हे खरय मी पण अग्नीकोल्हाच वापरतो छान आहे माबो वापरायला

हा त्रास IE वर पण होतो... एकदा चूक झाली की पुढच्या ओळीवर लिहायला लागते. पूर्वी कुठेही मराठी लिहायचे असले की मी मायबोली वापरायचो.
आता गुगलला जावे लागते...

मायबोलीवर नवीन हे पेज स्क्रॉल करताना कानोकानी किंवा छोट्या जाहीराती हे विभाग आपोआप उघडत असल्याचा अनुभव येतोय. कनेक्शन स्लो असेल तर ब्राऊझर बंद करावा लागतो. आणखी कुणाला असा अनुभव आलाय का ? मायबोलीचा वापर कमी आहे, पण असा प्रॉब्लेम आढळल्यास काही दिवस इथे न फिरकणे ठीक राहील.

>>>> आता थोडे लक्ष देऊन काही करता येते का ते पाहतो <<<<<
वेबमास्टरजी, शक्य असेल तर करुन बघा,
पण हा केवळ माबोपुरता प्रश्न नाही, तर क्रोम मधे कोणत्याही साईटवर देवनागरीत (मी तेव्हा बरहा वापरतो) काही लिहायला गेले तर हा प्रश्न येतोच आहे. अगदी क्रोम मधे मी मेसबॉक्स उघडुन मेल लिहायला घेतली तरी हा प्रश्न आहे.

आता त्या सफरचंदाचे शोधात लागतो Wink

क्रोम वर आरामात लिहिता येते....बॅकस्पेस केला की परत एक स्पेस करुन परत बॅक्स्पेस करायचा असतो.. जो आता हाताला सवयच लागली आहे.

>> मलापण सवय लागली आहे. आता आपसुन परत एक स्पेस आणि बॅकस्पेस हे घडते.

आत्ता सफरचंद वापरुन पाहिले. ह्यात बॅकस्पेस वाला प्रॉब्लेम अज्जिबातच नाही येत. वॉव.

>>>> बॅकस्पेस केला की परत एक स्पेस करुन परत बॅक्स्पेस करायचा असतो <<<<<
नाही असे केल्यास गार्बेजच तयार होते. ब्याक्स्पेस करुन एक स्पेस दिली तर काही सन्धि असते. बाकी मामला नशिबावर सोडावा लागतो.
ते सफरचंद आहे कुठे? मला कसे दिसत नाहीये? Sad

असिम, तसला प्रॉब्लेम माबोवर कधीच आला नाही. तुमची बोटे टच स्क्रिनवरुन फिरताना जाहिरातीन्नाही कुरवाळत असतील कदाचित.

नाही असे केल्यास गार्बेजच तयार होते. >>>>

लिंबुभाउ .......... "उदय" चे चुकुन "उदए" केले तर बॅकस्पेस करुन "उद" वर येणार मग परत एक स्पेस द्याय्चा आणि परत बॅक्स्पेस द्या.... म्हणजे परत तुम्ही "उद" वर येणार....

अश्याने गार्बेज तयार होत नाही

लिंबूशेठ, प्रतिसादाच्या खिडकीच्या वर पाहा..उजवीकडून पहिलं प्रश्नार्थक चिन्ह आणि दुसरं निळं सफरचंद!

ओके उदयन, प्रमोद. करुन बघतो. Happy
अरे यार हे सफरचंद होय, मस्तच आहे. Happy

बर हाथोहात विचारतो की माझ्या स्यामसन्ग मोबाईलवर्/ला कीबोर्ड कसा अ‍ॅटॅच करू? आयडीया सान्गा बरे. Happy घरी एक्क्ष्पी आहे.

माझ्याकडे इंटरनेट एक्सप्लोरर आहे. तिथे मायबोलीचे मराठी(देवनागरी) लिहिता येते नीट. मी मराठीसाठी मात्र गुगल इनपुट टूल्स वापरते ते मला सोपे जाते. ते आम्ही डाऊनलोड करून install केले आहे.

अरे असीम, तस नकोय, मोबाईल कॉम्प्युटरला जोडला की कॉम्प्युटरचा कीबोर्ड तरी वापरता यायला हवाय, असे करता येते असे ऐकलय, इतकेच नव्हे तर मोबाईल स्क्रिनवरील कॉम्प्युटरच्या स्क्रिनवर दिसु लागते. पण त्यासाठी काय वापरायचे माहित नाही.
शिवाय, वायरलेस कीबोर्ड मोबाईल करता वापरता येईल का? शक्य व्हायला हवे ते लॉजिकली, पण खरेच होते का?

लिंबुटिंबु
टचस्क्रीन, कुरवाळणे वगैरेंची गंमत वाटली. आमचा लॅपटॉपच आहे नेटसाठी राखीव गडी. मोबाईलवरून छोटी छोटी अक्षरं,छोटी स्क्रीन, छोटा मेन्यु ..आवडतच नाही वापरायला.

असीम, काही काही अ‍ॅड वरती माउस स्क्रोल केला किंवा माउस ठराविक काल ठेवल्यास ती जाहिरात व्हीडीओ किंवा अ‍ॅनिमेशन प्ले करते.