भारतीय रेल्वे

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मला भारतीय रेल्वेची एक गोष्ट अगदी लहानपणापासून आवडत आलेली आहे. ती म्हणजे त्यांना दिलेली नावे. नद्यांची नावे, ग्रंथांची नावे, इतिहासातील प्रसिद्ध घटनांची नावे, ज्यांनी देशासाठी आयुष्य वेचले अशा महान नेत्यांची नावे, कवींची नावे, लेखकांची नावे. देशातील एका गावातील लोकांना दुसर्‍या गावात पोचवताना रेल्वे आपल्या सोबत भाषा, संस्कृती, माणसे, धर्म, अन्नधान्य -- काय काय वाहून नेते!

मी इथे भारतीय रेल्वेवर एक कविता लिहित आहे जी अजून पुर्ण व्हायची आहे. मला वाटतं या कवितेत कडवे जमवायला मला तुमची देखील मदत मिळू शकेल. बघा प्रयत्न करुन. धन्यवाद!

पोलादी आयुष्य माझे
फिरते भारत सारा,
वाढता वाढता वाढे
माझा रुळ्-पसारा

इतिहासाची साक्ष मी,
मी 'ऑगस्ट क्रांती',
जनमाणसातील दुवा मी,
मी आहे 'संपर्क क्रांती'

टागोरांची 'गीतांजली' मी
माउलीची 'ज्ञानेश्वरी' मी
प्रेमचंदची 'गोदान' मी
नझरुलची 'अग्नीवीणा' मी

....

.....

....

रेल्वेवर अथवा बीच्या कवितेवर लिहा काहीतरी. कम्पूशाहीच्या बीबी चा इथे काय संबंध? उगीचच वडाची साल पिम्पळाला लावायची !

दिल्लीची राजधानी मी
मी नेताजींची आझाद हींद
कोल्हापुरची महालक्ष्मी मी
मी गांधीजींची अहिंसा

बी, लिस्ट फ़ार मोठी आहे! Happy

वा छान्.प्रकाशच्या चार ओळी पण छान.
कोकणची कोकणकन्या मी
सोलापुरी सिद्धेश्वर
उज्जैनची अवंतिका मी
एंम्.पी .यु .पी.फ्राँटीयर

>रेल्वेवर अथवा बीच्या कवितेवर लिहा काहीतरी. कम्पूशाहीच्या बीबी चा इथे काय संबंध? उगीचच वडाची साल पिम्पळाला लावायची !
ओ पाहुणं, हा चमत्कार कसा झाला ते बीलाच विचारा... Sad या पानावर त्याने कंपुशाही बद्दल एक स्वगत (अ‍ॅडमिन ला तक्रार) लिहीलं होत, ते आता गायबलय.