सावध...

Submitted by मी मुक्ता.. on 24 February, 2014 - 00:56

इतरांच्या मनाचा विचारच न करणारी
तू नसशील आत्ममग्न स्वार्थी...
आणि तू आताही नाहीयेस,
त्याच्यासाठी आयुष्य वेचशील अशी त्यागाची मूर्ती..
तुझ्यात शोधेल तो तुझीच रुपं,
जशी त्याला दिसायला हवी आहेत तशी..
पण हा साक्षात्कार होईपर्यंत तग धरता येईल का तुला..?
विदिर्ण होऊन जातो गं आत्मा.. शब्दांचे वार व्हायला लागले की,
सावरायची सवडही न देता..
म्हणून म्हणतेय,
सावध हो...
कितीही लोभसवाणं वाटत असलं तुला आता,
शब्दांतून सजणारं तुझं अस्तित्व,
तरी त्या वाटेला नको जाऊ ..
काहीही हो, पण नको होऊ,
कोण्या लेखकाची कल्पना..
कोण्या कवीची कविता..
--------------------------------------------------------------------------------------
http://merakuchhsaman.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्या कविता / रचना वाचून 'आपणही काही म्हणावे' असे वाटू लागते त्या कविता / रचना (माझ्यामते) श्रेष्ठ ठराव्यात.

व्वा ! भावनेला चेतनागुणोक्तीने अलंकृत करणं आवडलं...... छान संकल्पना.

तुझ्यात शोधेल तो तुझीच रुपं,
जशी त्याला दिसायला हवी आहेत तशी.. >>>>> जबरी....

सगळी रचनाच जबरदस्त ......

सर्वांचे खूप खूप आभार.. Happy

बेफिकीर,
ज्या कविता / रचना वाचून 'आपणही काही म्हणावे' असे वाटू लागते त्या कविता / रचना (माझ्यामते) श्रेष्ठ ठराव्यात.>> यासाठी खास आभार.. Happy

वा! छान लिहलय!

मला एका वेड्या शायराचा शेर आठवला!

मेरे सुखन की दाद भी उसको ही दिजीये
वो जिस की आरजू मु़झे शायर बना गई

(सुखन = शब्द,काव्य)

जयन्ता५२

आवडली Happy