लिहिताना र्‍हस्व-दीर्घचे नियम

Submitted by हर्ट on 20 February, 2014 - 23:34

माझे लेखी मराठी बर्‍यापैकी चांगले आहे अशा प्रतिक्रिया सतत मिळत असतात पण सोबत एक सल्लाही दिला जातो की माझ्या लिखाणात व्याकरणाच्या खास करुन र्‍हस्व दीर्घच्या खूप खूप चुका असतात. मी विदर्भात वाढलेला आहे. आमच्या भागात पाण्याला पानी आणि आणिला आनि म्हणणारेच अधिक भेटतील. बालपणापासून अशा वातावरणात माझी वाढ झाली आणि शाळेत शिकताना कधी बाईंनी वा गुरुजींनी र्‍हस्व दीर्घचे दोन धडे शिकवले नाहीत. त्यामुळे लिहिताना होते असे की मला कळत नाही की अमुक शब्दात कुठले अक्षर र्‍हस्व आणि कुठले दीर्घ आहे.

मला कुणी मार्गदर्शन वा शिकवू शकेल का? धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मयेकर,
नीतिन हा शब्द असा लिहायचा की नितीन की नितिन?
नितीन असे बरोबर वाटते. पण तरीही चूक असल्यास सांगा.

माहीत नाही. Happy बहुतेक नितिन
विशेषनाम ज्याच्या मालकीचे आहे, त्याला हवे तसेच लिहायला हवे.

Pages