CAUTION! Fraudsters posing as tax officials dupe Indian Americans

Submitted by mansmi18 on 17 February, 2014 - 08:21

आज रेडीफ मधे वाचलेल्या बातमीनुसार
http://www.rediff.com/news/report/caution-fraudsters-posing-as-tax-offic...

CAUTION! Fraudsters posing as tax officials dupe Indian Americans

The Indian-American community is increasingly being targeted by telephone fraudsters. Rediff.com's George Joseph reports from New York.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटले अमेरिकेतले भारतीय जरा जास्त अक्कलवाले असतील! उगाच उठून कुणि म्हंटले म्हणून $१०००० द्यायला ते दारू पिऊन पडलेले असावेत!

दहा वेळा घरी पत्रे, रजिस्टर्ड पत्रे आल्याशिवाय मी कुणाला एक पैसा देत नाही. मला असे एफ, बी, आय, आय आर एस, निरनिराळ्या राज्यातील कोर्टाचे, पोलीस विभागाचे नेहेमीच फोन येतात. एक तर मी असले फोन उचलतच नाही. त्यांनी मेसेज ठेवला तर पोलीसला फोन करतो. एक पोलीस घरी येतो, त्याला मी तो नंबर, मेसेज दा़खवतो. तो तक्रार लिहून घेतो नि मा़झे आभार मानून चालायला लागतो. कॉफी हवी का विचारले तर नाही म्हणतो. डोनट हवा का विचारले तर पोलीसची चेष्टा करतो म्हणून मलाच धरून नेईल!!

बातमी खरी आहे. मला स्वत:ला आणि माहितीतल्या अनेकांना असे कॉल गेल्या काही महिन्यात आले आहे. अर्थात मी किंवा माहितीतल्या कुणी असे पैसे भरले नाहीत.

अरे बापरे.
मला असा नाही, पण डीश नेटवर्क कडुन बोलतोय असा कॉल ६-७ महिन्यापुर्वी आला होता.
त्याने सांगितले, तुम्ही डीशचे एक वर्षाचे बील एकदम भरलेत तर ५० टक्के सवलत देउ व premium channels पण एक वर्षासाठी फुकत देऊ.
आम्ही म्हटले आम्ही फोनवर पैसे भरणार नाही. तो म्हणला वॉलमार्ट्मधे जाउन भरा व पद्धत सांगितली. मग त्याने आम्हाला कोणती प्रिमियम चॅनल्स हवीत ते विचारले. आम्ही सांगितली व ती चक्क आमच्या टीव्हीवर त्याने टाकली व ती सर्व चेनल्स दिसु लागली!!!!!!
आता इतके झाल्यावर आम्हाला खरेच वाटले. नाहीतर आधी तशी ऑफर to good to be true अशीच होती.

वॉलमार्ट मधे जाऊन विचारले तर डीशने असे काहीच सांगितले नाहिये हे कळले व वॉलमार्टची बाई म्हणाली, 'हे संशयास्पद आहे तुम्ही काही करु नका. डीशला फोन करा'.
फोन केला तर डीशने पण सांगितले की तसे काही नाहिये व डीश च्या साईटवर आमचे ऑन्लाईन अकाउंट त्यांनी सुरु केले आहे व चक्क प्रिमियम चेनल्स ची ऑर्डर आमच्या खात्यावर दिली आहे. डीशने अर्थात त्याकरता आम्हाला पैसे लावले होते.
मग डीशने आम्हाला सांगितले की असा फ्रॉड होत आहे. डीशनी आमचे खाते काढुन टाकले व आम्हाला ३ महिने ती चेनल्स दिली फुकट व लावलेले पैसे पण काढले.

ही बातमी खरी आहे. ह्या विषयी माहिती आणि सुचना IRS च्या संकेतस्थळावर आहे.

आम्हाला २ आठवड्यापुर्वी असाच कॉल आला होता. त्यामाणसाने सुरुवात त्याच्या आयडी पासुन केली आणि सांगितले की तुम्ही ६,४७२.४० डॉलर्सचा फ्रॉड केला आहे. आम्ही २-३ नोटीस पाठवल्या होत्या आणि IRS ऑफिसर्स पण येउन गेले पण घरी कोणीच नव्हते. तुमच्या नावाने अ‍ॅरेस्ट वॉरंट निघाले आहे पण आत्ता लगेच पैसे भरले तर वॉरंट कँन्सल होउ शकेल असल्या बाता मारल्या. हे सांगताना लॉमधील कलम वगैरे पण सांगत होता.
पत्नीने सांगितले की मला सीपीए शी बोलायचे आहे. प्रथम त्याने आम्ही सीपीएला involve करत नाहीत. हा टॅक्स आणि फ्रॉड तुमचा आहे त्यामुळे आम्ही फक्त तुमच्याशीच बोलु. पण मी घरी नसल्याने त्याने एक नंबर (१-८६६) दिला आणि म्हणाला की ह्या नंबरवर फोन करुन पैसे ताबडतोब भरा.
अर्थात हे फ्रॉड आहे हे माहिती असल्याने असले पैसे भरले नाही पण गंमत म्हणुन फोन केला आणि अपेक्षेप्रमाणे कोणीही उचलले नाही.
असल्या कॉलची ठळक वैशिष्ठ्ये:
१. हा कॉल तुमच्या डीरेक्टरी मधे लिस्टेड फोन नंबर वर येतो. आमच्या बाबतीत आम्ही तो नंबर कुठेच वापरत नाहीत त्यामुळे तिथे फोन आला त्याच वेळी कळाले की गडबड है.
२. ते नेहमी डीरेक्टरी मधे आहे तसेच नाव उच्चारतात. प्रसाद देशमुख ऐवजी सतत 'पी. देशमुखा' असे चालु होते.
३. IRS साईट नुसार कधीकधी ते लास्ट-४ सोशल पण सांगतात. बहुतेक वेळा तुमचे मेल चोरुन वगैरे ही माहिती काढलेली असते.
४. त्यांना विचारले कि तुम्ही IRS चे आहात तर माझे टॅक्सेबल इनकम किती होते तर त्या माणसाने सेक्युरीटी असले फुसके कारण देउन सांगायला नकार दिला.
५. पैसे भरताना ते नेहमी प्रीपेड कार्ड वर बॅलेन्स अ‍ॅड करायला सांगतात. हे ट्रान्सॅक्शन ट्रॅक करणॅ अवघड आहे.

असा फोन आल्यास , प्रथम तो फोन आदळुन IRS ला फोन करा. त्यांच्या वेबसाईटवर याबाबत तक्रार करण्यासाठी एक नंबर व संकेत स्थळ दिले आहे. ९११ ला कॉल करुन पोलीस काही करु शकतील असे वाटत नाही.
अर्थात सारखा फोन येत असेल तर जरुर पोलीसांची मदत घ्यावी पण ह्या प्रकारातले लोक एकदाच कॉल करतात.
आणि शेवटचे: तुमचे जे फोन नंबर डीरेक्टरी मधे असतील त्यांना Do Not Call लिस्टींग मधे रजिस्टर करा. https://www.donotcall.gov/

मला पण असा कॉल आला होता. मी लॅन्ड लाईनवर त्या माणसाशी बोलत एकीकडे सेलफोनवर FBI ला फोन केला. त्यांनी लगेच तक्रार लिहून घेतली. मग या लोकांना सांगितले की आत्ताच तक्रार केलेय म्हणून.
सध्या आमच्या इथे नवा स्कॅम ज्युरी ड्युटी चुकवली, कोर्टात हजर व्हा किंवा फाईन भरा असा आहे. असा कॉल आला तर पोलीसांना कॉल करायला सांगितले आहे.

महागुरु,
५. पैसे भरताना ते नेहमी प्रीपेड कार्ड वर बॅलेन्स अ‍ॅड करायला सांगतात. हे ट्रान्सॅक्शन ट्रॅक करणॅ अवघड आहे. >> आम्हाला अगदी हेच करायला सांगितले होते. नंतर तर २-३ वेळा त्या व्यक्तीने फोन करुन मेसेज ठेवला की, तुम्ही पैसे भरले नाहीत, ते भरा.
त्या नंतर १-२ महिन्यांनी पुन्हा त्याच व्यक्तीने दुसर्‍या ८०० नंबरवरुन मेसेज ठेवला की , 'मी पोलीस ऑफीसर हा हा बोलतोय.. एक प्रॉब्लेम झाला आहे त्यासाठी लगेच आम्हाला ह्या नंबरवर फोन करा'.
दोन्ही मेसेजमधला आवाज एकच होता. तो भारतीय नव्हता वाटला, अमेरिकन तर नव्हताच.
मलातर आता वाटतय, ही तीच टोळी असेल नवा लुटण्याचा मार्ग घेउन आलेली.

हा ज्युरी ड्युटीवाला कॉल माझ्या मित्राला आला होता. त्याने सरळ येत नाही जा असे उडवुन लावले कारण एकतर कॉल शनिवारी आला होता आणि मित्राकडे एचवन आहे त्याने ६ महिन्यापुर्वीच एलिजिबल नाही असे लिहुन पाठवले होते. त्यामुळे हा फेक कॉल आहे हे माहिती होते.

अजुन एक ऐकलेला फोन स्कॅमः आपल्या फोन वर १-२ रींग वाजुन फोन बंद होतो. १-८०० किंवा १-८६६ असा मिस कॉल दिसतो म्हणुन आपण परत फोन करतो. तो कॉल इंटरनॅशनल नंबरवर फॉरवर्ड झालेला असतो. त्यामुळे आपल्याला इंटरनॅशनल फोन चे बिल लागते. पण याने फ्रॉड करणार्‍याचा फायदा कसा होतो ते नाही कळाले.

वेस्टर्न युनिअन == स्कॅम.

ओळखीतल्या एका स्वामिजींना एक ईमेल आली. इंग्लंड मधे एका सेमिनार मध्ये वक्ते म्हणून आमंत्रण होते. विमानाचे तिकीट आणी व्हिसा चा खर्च संयोजकच करणार होते. थोडीशी मेलामेली झाल्यावर त्यांनी एका हॉटेलचा पत्ता दिला. सेमिनार त्याच होटेलात आहे तेव्हा तिथे रूम बूक करा आणी पावती पाठवा म्हणजे व्हिसा साठी अर्ज करता येइल. त्या हॉटेलला फोन केला तर सर्व्हर डाऊन अस्ल्याने वेस्टर्न युनिअन ने रूम भाडे पाठवा असे सांगण्यात आले. पैसे पाठवल्यावर लक्षात आले की त्या हॉटेलची वेबसाईट, तो सेमिनार सारे बोगस होते.

पण खरंच ह्या कोणा गव्हर्नमेन्ट एजन्सीचा फोन असेल तर कसा ओळखायचा?

IRS च्या ऑफिसरने सांगितले की आम्ही असा फोन करत नाही. रीतसर पत्र येते. शंका असेल तर फोन बंद करुन त्या शासकीय विभागाच्या संकेतस्थळावर दिलेल्या फोन नंबर वर परत फोन करायचा.

पैशासाठी किंवा खाजगी माहिती विचारण्यासाठी असेल तर तो सरकारी एजन्सीचा नाही असे गृहीत धरून. कारण सहसा पैसे वा खाजगी माहिती फोन करून वा इमेल करून अधिकृतरीत्या विचारली जात नाही. कोणत्याही 'इनकमिंग' फोन ला कसलीही खाजगी माहिती द्यायची नाही हा नियम पाळावा.

ज्या एजन्सीकडून फोन आलाय असे सांगितले जाते आहे, त्यांना स्वतंत्रपणे फोन करून कन्फर्म करावे. इनकमिंग कॉल वर सांगितलेला नंबर, मेल आयडी, वेब साईट हे न वापरता स्वतंत्रपणे शोधून तेथे संपर्क करावा.

खरोखरच पैशाकरिता फोन केला असेल तर तुम्हाला बिल पाठवलेले आहे त्याचे पेमेण्ट (चेक पाठवून, ऑनलाईन जाऊन) करा अशी आठवण करायला केलेला असतो (तो ही बहुधा खाजगी कंपन्यांकडून). फोन वर आत्ताच पेमेण्ट द्या असा आग्रह असेल तर शक्यतो गडबड असू शकते.

पण खरंच ह्या कोणा गव्हर्नमेन्ट एजन्सीचा फोन असेल तर कसा ओळखायचा?
----- ते (फोन करण्याअगोदर) कागदोपत्री व्यावहार करतील ना?

माझ्या कडे IRSचा नम्बर आहे त्यावर मी फोन करतो असे सान्गुन कटवता येइल ना?

IRS चे नुकतेच पत्र मिळाले आहे आणि त्यानी मला पैसे द्यायचे मान्य केले आहे... $ ४५०० चा चेक IRS च्या फाईल मधे असलेल्या पत्त्यावर पाठवणार आहात हे विचारायचे...

दुसरे म्हणजे 'आत्ताच्या आत्ता' पेमेण्ट करा असे इनकमिंग कॉल वर कोणी म्हंटले तर 'रेड फ्लॅग' समजावी. सरकारी काम सहसा आरामात असते. नोटिशीनंतर काही दिवस किमान दिलेले असतात. खाजगी कंपनी असेल (इलेक्ट्रिक, मेडिकल, केबल ई) आणि २-३ महिने उलटून गेले असतील तरी आधी 'कलेक्शन एजन्सी' कंपन्यांकडे तुमचे अकाउंट दिले जाते. ते लोक मग पोस्टल मेल आधी करतात. त्यावरही काही काळ गेला तर फोन करतात. अगदी तशा वेळेसही 'मी इनकमिंग कॉलवर पेमेण्ट करणार नाही' सांगून १-२ दिवसांत नक्की पेमेण्ट करतो सांगितले तर तेवढे ते थांबतात.

माझ्या मित्राच्या बायकोला सॉलिड हिसका बसला ह्याचा, एवढा की ती पूर्ण एक आठवडा शॉक्ड आणि कुठलाही फोन घ्यायला ही प्रचंड घाबरत होती. मित्राला पैसे गेल्याचे दु:ख होतेच पण तिची मानसिक अवस्था बघून आम्हा सगळ्यांनाच खूप चीड आली ह्या प्रकाराची.
मित्राला संध्याकाळचे क्लासेस असतात आणि बायको चार तास ह्या फोन च्या कचाट्यात सापडली, मुलाला रात्री पर्यंत डे केअर मध्ये पिक अप करायला कोणी गेले नाही. ईथले पोलिस काहीच करू शकले नाही.

ठाण्यातले कॉल सेंटर पकडल्यानंतरही माझ्या बायकोच्या फोनवर दोनदा फोन आला. आणि दोन्ही वेळा IRS ची धमकी ठेऊन गेले. तेव्हा हा 'धंदा' बर्‍याच Call Center वाल्यानी उघडला असावा...
..
हल्ली Vonage चेही असले फोन येऊ लागलेत. १००$ भरा, म्हणजे यापुढे महिन्याला फक्त ८$ बिल येईल असे सांगणारे भारतीय असतात (मुकेश, सुनिल... ) अशी नावे असतात.
मी हजार प्रश्न विचारायला सुरूवात केली, मग त्याने वैतागून त्याच्या मॅनेजरला फोन दिला.
मी त्याला हजार प्रश्न विचारले.. मग म्हटलं ठिक, मी भरतो $१००, फक्त सगळी माहीती तुम्ही सांगायची आणि मी 'हो किंवा नाही' तेव्हढेच सांगेन.
मॅ - तुमचं आडनाव 'देसाई' आहे.
मी- हो..
मॅ - तुमचा ईमेल पत्ता सांगा..
मी - तुमच्या कॉम्प्यूटर वर आहे.
मॅ - तुम्ही सांगा , मी बरोबर आहे की नाही ते बघतोय...
मी - तुम्ही सांगा, मग मी बरोबर की नाही ते सांगेन.
मॅ - असं केलंत तर आम्ही तुम्हाला ही सवलत देऊ शकत नाही.
मी - धन्यवाद. (फोन कट)..

मी Vonage ला फोन केला, तर त्यांचे म्हणणे हा Fraud होता, तुम्ही लक्ष देऊ नका.
मी - अरे तुमच्या नावावर Fraud करताहेत, आणि अर्धी अधिक माहिती त्यांच्याकडे आहे , तरी तुम्ही म्हणताय लक्ष देऊ नका... या पुढे Vonage ला पण बाय.. बाय...

अशा गोष्टी सांगणे सोपे व्हावे आणि त्या सगळ्या एकत्रित रहाव्यात म्हणून नवीन ग्रूप सुरु करून हा धागा तिथे हलवला आहे.

देसाई, थँक्स इथे सांगितल्याबद्दल. लक्षात ठेवीन असा कॉल आल्यास.

मलापणा IRS चे दोन तीन कॉल येऊन गेले. मला स्कॅम आहे हे माहीत होते.
माझ्या टीममधल्या एकीला कॉल आला. तिला हा प्रकार माहीत नव्हता, ती बोलली थोडावेळ. नंतर तो माणूस म्हणे काहीतरी २-३ हजार डॉलर भरावे लागतील आणि त्याचं गिफ्ट कार्ड घेऊन वॉलमार्टच्या मागे भेटा. हे ऐकल्यावर तिला संशय आला आणि मग तिने आसपास विचारलं आणि फोन क्ट केला.

आजकाल इमिग्रेशनवाले आहेत असे भासवूनही कॉल करतात. मला गेल्या आठवड्यात असा कॉल आला होता. त्या माणसाला मी सांगितले की कालच गावच्या मिटिंगमधे अशा प्रकारच्या फ्रॉडबद्दल पोलीसांनी सांगितले तसा चिडला आणि खोटा अ‍ॅक्सेंट विसरून देशी स्टाईल बडबडू लागला Proud
अजून एक फ्रॉडचा प्रकार- थंडीत असेच फोन ही मंडळी लहान गावातल्या सिनियर सिटिझन्सना करतात. युटिलिटी बंद करु, बील थकलेय असे सांगतात. तुम्ही चेक पाठवलेले असले तरी आम्हाला मिळालेले नाहीत तेव्हा दोन तासात गॅस, वीज तोडणार आहोत असे धमकावतात आणि गिफ्ट कार्डा द्वारे पैसे उकळायला बघतात.