मधुबाला

Submitted by रसप on 14 February, 2014 - 09:03

डोळ्यांत तुझ्या आकाश पसरले आहे
की पापणीपुढे सागर खळखळ करतो ?
का सौंदर्याला क्षणैकतेची जोडी ?
का मादकतेला कारुण्याची झालर ?

तू एक गूढ जे कधी उकलले नाही

मज प्रश्न सतवती वर्षांमागुन वर्षे
अन् उत्तर देणे वेळ दवडणे वाटे !
तुज निरखुन बघणे हाच सोहळा माझा
त्या अबोल अधरांमधेच जग सामावे

पण इतके नाही सोपे तुझ्यात रमणे

का प्रश्न कधीही आपण होउन विरती ?
बेसावध वेळी पछाडती मन माझे
मग निष्कर्षाप्रत येतो मीच अश्या की -
'हे रूप मानवी नसे, ईश्वरी आहे'

हे असे मानले की मी निवांत होतो

............ डोळ्यांत तुझ्या आकाशच पसरुन आहे
............ अन् त्या आकाशी सागर खळखळ करतो..

आकाश नि सागर एकच असते किमया !
त्या अथांगतेचे रूप असे 'मधुबाला' !!

....रसप....
१४ फेब्रुवारी २०१४
'मधुबाला डे'

(खरं तर आणखी विचार करून नंतर पोस्ट करणार होतो. पण नाही. ही आजच झाले पाहिजे, असं वाटलं.)
http://www.ranjeetparadkar.com/2014/02/blog-post.html

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्या वेगळ्या काढलेल्या ओळी आहेत...त्यांनी लय मजा आणली.

कविता आवडली हे वेगळे सान्गायला नकोच.

मधुबालाच्या स्वर्गीय सौंदर्याबरोबरीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतचे भाव चांगले रेखाटले गेलेत. त्यावरून तिचं वैयक्तिक आयुष्य तितकंसं चांगलं नसावं असा बोध होतो.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(खरं तर मधुबालाविषयी अप्रतीम कालातीत, वादातीत स्वर्गीय सौंदर्य इतकंच ऐकायला मला व्यक्तिश: आवडतं.)