मायबोलीच्या चेहर्‍यामोहर्‍यामधे एक बदल

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

आजपासून मायबोलीच्या चेहर्‍यामोहर्‍यामध्ये एक बदल केला आहे.

यापूर्वी २००७पासून मायबोलीच्या पानाची रुंदी ९६० पीक्सेल इतकी होती. आजपासून ती १०२० पीक्सेल केली आहे. त्यामुळे मधल्या मजकुराच्या भागाची आणि बाजूच्या रकान्याची रुंदी काही प्रमाणात वाढली आहे.

या शिवाय इतर बदल नाही. पण अनेक न्याहाळक (ब्राऊझर) आणि रीझोल्यूशन यांचे इतके पर्याय आहेत, की या सगळ्याच चाचण्या शक्य नव्हत्या. तुम्हांला तुमच्या नेहमीच्या पद्धतीने मायबोलीवर येताना अडचण होत असेल, काही नीट दिसत नसेल तर कृपया या धाग्यावर कळवा. लिहिताना तुमचे यंत्र (डेस्कटॉप, मोबाईल असेल तर ब्रँड / मॉडेल), ब्राऊझर, व्हर्जन, रीझोल्यूशन आ्णि शक्य झाल्यास स्क्रीनशॉट इथे दिलात तर काय अडचण आहे ते कळू शकेल.

कृपया ईमेल करू नका , इथे कळवा म्हणजे तीच तीच अडचण पुन्हा सांगावी लागणार नाही.

विषय: 
प्रकार: 

गूड...

ठीक आहे....माझ्या मायक्रोमॅक्स कॅनवास ४ मध्ये तरी काही अडचण नाही. Happy

पूर्वी मायबोलीच्या लोगोखाली सब मेनू येतात. जसं की आत्ता तिथे मुखपृष्ठःरंगीबेरंगी:अ‍ॅडमिन यांचे रंगीबेरंगी पान असं दिसतंय ते सिलेक्ट करून आत जाता येत होतं. पण काही दिवसांपासून हे करता येत नाहीये.

I can neverl write in PRATISAD in DEVNAGARI but I can write DEVNAGARI in wichaarapoos. I found it difficult to go everytime in my wipu.

मी गूगल क्रोम वापरतो. त्यात कंट्रोल \ किंवा / केले तरी इंग्रजी लिहीता येत नाही. तर ते कसे करावे?
कारण इंग्रजी ही मराठीचीच उपभाषा झाली आहे आजकाल त्यामुळे हे आवश्यक आहे. बर्‍याच भारतीयांना मराठी कळत नाही. जसे अडचण, पंखा या ऐवजी प्रॉब्लेम, फॅन असेच शब्द वापरावे लागतात.

नविन लेखन। हितगुज।
ही लाईन जी आहे तिचा फाँट साईज वाढवा
मुख्यपानावरून आत येताना अक्षरे छोटी असल्याने
बातमी चे पान उघडते

उदयनशी सहमत.

मायबोलीच्या लोगोच्या बाजूला मोकळी जागा आहे. तिथे शोध हि खिडकी लावता येईल का ?
आणि शोध असे सर्च चे ठोक भाषांतर न करता, वरच्या चौकटीत शब्द लिहून टिचकी मारा म्हणजे
मायबोलीवरचे सम्बन्धित लेखन दिसेल, अशी काहीशी सूचना करता आली तर बघा बुवा.

एखादा लेख उघडल्यावर त्या विषयावरचे बाकीच्या लेखाचे दुवे दिसू लागलेत ते छानच.

मी गूगल क्रोम वापरतो. त्यात कंट्रोल \ किंवा / केले तरी इंग्रजी लिहीता येत नाही. तर ते कसे करावे? > >झक्की
१. प्रतिसादाच्या खाली जे icons दिसतात त्यातला apple चा icon वापरून लिहू शकता. (हे अजय ने सुचवले होते माझ्या ह्याच प्रश्नावर)
२. mouse वापरून म/E click केल्यास toggle करता येते.

आद्य मायबोलीत ट्री व्ह्यू होता त्याला तोड नाही अद्याप. तो देताच येणार नाही का? त्यामुळे मायबोलीची रंगत वाढेल...