गृहिणी
गृहिणी गृहिणी दार उघड
थांब माझ्या बाळाला अंघोळ घालू दे.
गृहिणी गृहिणी दार उघड
थांब माझ्याबाळालातीट लावू दे.
गृहिणी गृहिणी दार उघड
थांब माझ्या बाळ झोपवू दे.
चिमणे चिमणे दार उघडची आठवण आली ना? काय? माझे चुकले असे वाटते का? बघा त्रयस्थ नजरेने. आले ना लक्षात? क्षणात कसे बरे ती `गृहिणी तुमच्यासाठी दार उघडेल!
कामात असे ना ती? अगदी चोवीस तास! हो नशीब तिचे की तिच्यासाठी, तिच्या विश्रांतीसाठी नियतीने केलेली सोय म्हणू या हवे तर, की रात्र होते.
घरातल्या लोकांच्या काळजीपोटी ही बिचारी झोपते न झोपते, तिचा डोळा लागतो ना लागतो, तोच फटफटीत सकाळ उजाडते.
तिने कितीही ठरवले तरी मॉर्निंग वॉक काही तिच्या नशिबी नसतो. सकाळचा दोन-चार वेळा होणारा चहा, नाष्टा, सकाळ चा `टिफिन, रोजची कटकटच ती. काय करू? काय करू? नी काय करू?
दुपारच्या जेवणाची व्यवस्था भांडी, धुणी, खरकटी `रांधा, वाढा, उष्टी काढा हेच तिच्या नशिबी असते की काय? अंघोळ, देवपूजा, पेपरवाचन, टीव्ही की झाली संध्या, रहाटगाडगे चालूच. नाष्टा, चहा, पुन्हा ऑफिसमधून येणाण्यांची वेळ व तिची भाजी आणायची वेळ एकच. पुरती त्या संसाराच्या चाकात अडकून जाते. जीव मेटाकुटीला येतो. वाटते, सर्व साखळदंड क्षणात तोडून दूरवर धावत सुटावे. क्षितिजाला, आकाशाला गवसणी घालावी, उंच भरारी घ्यावी.
निसर्गाची, संध्याकाळ ची मजा लुटावी, सुर्यास्ताची छबी, घरी परतणारी पाखरे, गुरेढोरे, तो छानसा संधीप्रकाश अनुभवावा, पण छे! `भाजीत लक्ष असते ना? थोडया मैत्रिणींशी गप्पाटप्पांची देवाणघेवाण होते. त्यातही गप्पांचे विषय काही साहित्यिक, मजेशीर, काव्यात्म, असे नसतातच आज काय मेनू? हे कसे बनवतात? आज काय कामवालीच आली नाही? कामवालीने ते काम नीट केले नाही? आज काय भांडीच जास्त होती, मशीनच लावायचे राहून गेले? आज काय पाणीच आले नाही, इत्यादी. एव्हांना संध्याकाळ संपलेली असते. आवडत्या टीव्ही मालिका बघत बघत रात्रीचा स्वयंपाक, उद्याची प्राथमिक तयारी, पुन्हा तीच तीच आवराआवर, की झाली रात्र! काम काम आणि काम; कामाच्या रगाडयातूनच स्त्री-जन्मा केव्हा रे बाबा तुझी सुटका होणार? देव जाणे!
नोकरी करणाण्या स्त्रीची तारेवरची कसरत तर विचारूच नका, पण तिला `स्वऽची जाणीव असते. ती `कमवती म्हणून तिची जागा जरा वरच्या पोस्टवर असते. गृहिणी काय? काय काम असते, घरीच तर असते? केले सर्वांसाठी तर काय बिघडले? गृहिणीला योग्य मान मिळत नाही. विचार करा. घरातली `गृहिणी ही तुमचीच कोणीतरी असते. बायको, आई, बहीण, आजी, मावशी, तिलाही काही स्थान आहे. ती कायमची संपावर गेली तर काय होईल? विचार करा. तुमचे हाल होऊ नये, म्हणून ती वेळेवर सर्व करते. प्रत्येकाचे मन सांभाळते, आरोग्य सांभाळते , प्रत्येकाच्या आवडीचे करून खाऊ घालते, योग्य संस्कार, चांगल्या, वाइटाची जाण, आल्यागेल्याचे स्वागत, त्यांच्यासाठी काहीतरी, मग विचार करा, `ती जर इतके करते तर तिला आपण कामात मदत केली पाहिजे. तिला योग्य `मान व योग्य `मानधनही पाहिजे. ते तिचे स्वतःच्या हक्काचे असेल. त्यातून ती आपली आवडनिवड करू शकेल. (काही लोक या गोष्टीसाठी सहमत होत नाहीत का ते माहीत नाही.)
तिचे मन सांभाऊले पाहिजे, व्यवहार, बाहेरचे जग, दुसरे देश, तिच्या मनाचा होणारा कोंडमारा, तिचे स्वास्थ्य जे सर्वांत महत्त्वाचे आहे. तिची शारीरिक ,. क्षमता ... का ती एखाद्या वेळी चिडचिड करते? तिचेही काही प्रॉब्लेम्स आहेत का? तिच्या भावनांची कदर खरेच घरातल्या सर्वांना आहे का? सर्वांनी मानसिकता का बदलू नये? ती न संपणारे, न थांबणारे यंत्र आहे का? ती तुमच्यासारखीच हाडामांसाची बनलेली आहे. तिला (गृहिणीला) नीट समजावून घ्या. तिला सर्व दृष्टीने आधार द्या. ती तुमच्यावर प्रेम करते, मदत करते. तुमच्यासाठी त्याग करते, काय नाही करत ती तुमच्यासाठी? तुम्हीही तिला प्रेम, माया द्या. कामाची वाटणी करा. मग बघा, प्रत्येक जीवन कसे निकोप होते ते. तिच्या आरोग्याची काळजी घ्या. मायेने, आस्थेने तिची विचारपूस करा. तिला सर्व दृष्टीने, आर्थिक, मानसिक, कायिक, वाचिक तिची आवड, छंद जोपासा, त्याचे कौतुक करा. तिला आधार वाटेल असे करा. तिचे आशीर्वाद तुम्हांला मोठे करतील यात शंका नाही. एक कविता सुचत आहे
`गृहिणी
सर्वांना ती घरी हवी हवी,
(सर्वांच्या) सेवेला ती तत्पर ऐन वेळी,
त्याग करिते `स्व जीवनाचा॥
`गृहिणी सर्वांत उच्च तुझे हे पद,
नकोस मानू ते तू दुय्यम स्थान,
तूच मोठा आधार या सदनाला
`गृहिणी तुझे आशीर्वाद लाभू दे सर्वांना।
लक्ष्मी तू या घरची,
वाचवते पै पै तू कष्ट करूनी,
नाही जाणार हे कष्ट वाया तुझे,
तुझेच ना ग हे लाडके घरटे?।
भक्कम आधार बनून रहा तू येथेच,
नको लेखू स्वतःला कमी।
सत्य काय ते तुलाच ठाऊक
घराचे मंदिर करण्यास तू सदैव आतुर॥
गृहिणी
Submitted by अनघा कुलकर्णी on 13 August, 2013 - 01:36
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अगदी बरोबर आहे. छान लिहिले
अगदी बरोबर आहे. छान लिहिले आहे.
चुकिचं वाटेल, पण नवरा/ इतर
चुकिचं वाटेल, पण नवरा/ इतर कोणी घरकामात मदत करायला गेलं की "राहु द्या हो" म्हणायला हीच गॄहिणी पुढे असते. आपल्या मुलांना भाजी निवडणे, चिरणे इ. सोप्या कामातही मदत घ्यायला हिला चुकिचं वाटते. आणि सगळ्यांना आयतोबा होण्याची सवय लागली की मग चिडचिड करते.
चान चान.
चान चान.
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे . प्रत्येकाने दुसऱ्या व्यक्तीची मानसिकता ओळखावी . नेहमी हेवे दावे ,टीका ,आपण मराठी लोक त्यामुळे प्रगती करू शकत नाही
.अर्थात हे माझे मत आहे ,ते तुम्हाला पटेल अशी आशा करते .
`ती जर इतके करते तर तिला आपण
`ती जर इतके करते तर तिला आपण कामात मदत केली पाहिजे.
चुकिचं वाटेल, पण नवरा/ इतर कोणी घरकामात मदत करायला गेलं की "राहु द्या हो" म्हणायला हीच गॄहिणी पुढे असते. आपल्या मुलांना भाजी निवडणे, चिरणे इ. सोप्या कामातही मदत घ्यायला हिला चुकिचं वाटते.
>> जो पर्यंत घरातिल काम करणे म्हणजे गॄहिणीला मदत करणे ही मानसिकता बदलत नाहि तोपर्यंत यात काहिहि बदल दिसणार नाहि.
घरातले काम करणे हि गॄहिणीला मदत म्हणजे काय, ते स्वतःचे काम नसते का?
नका हो ग्रुहिणीचं कौतुक करू.
नका हो ग्रुहिणीचं कौतुक करू. आपल्याला कर्त्या आत्मविश्वासानी वावरणार्या बाया हव्या आहेत आता. या बिनमोलाच्या कामाचे गोडवे गाउन स्त्रीला अडचणीत आणता आहात.
आणि ती कविता नाही आवडली.
जो पर्यंत घरातिल काम करणे
जो पर्यंत घरातिल काम करणे म्हणजे गॄहिणीला मदत करणे ही मानसिकता बदलत नाहि तोपर्यंत यात काहिहि बदल दिसणार नाहि.
घरातले काम करणे हि गॄहिणीला मदत म्हणजे काय, ते स्वतःचे काम नसते का?>>>>>
हे त्याला वाटुन काय उपयोग, तिला वाटायला नको का? problem फक्त पुरुषांचा नाही, तर स्त्रीयांच्या मानसिकतेचा आहे. परदेशात जवळजवळ सगळेच पुरुष (कधीनाकधी) भांडे घासतात, पण कोणी घरी असेल, तर त्याला भांडी घासु देत नाही. ही तिची चुकिची मानसिकता नाही का?
शिवाय, स्वतःचे कामं स्वतः करु देणे हेही महत्त्वाचे. तशी सवय आईने नाही लावली तर बायकोने लावावी. यात चुकीचे काय लिहिले?
प्रत्यकाचे मत वेगळे असते .
प्रत्यकाचे मत वेगळे असते . शहर,गाव,खेडेगाव प्रत्येकाचे काम वेगळे . चुकीची कविता हे सर्वांचे मत नाही . मी भेद -भाव करत नाही .
हे त्याला वाटुन काय उपयोग,
हे त्याला वाटुन काय उपयोग, तिला वाटायला नको का? problem फक्त पुरुषांचा नाही, तर स्त्रीयांच्या मानसिकतेचा आहे. परदेशात जवळजवळ सगळेच पुरुष (कधीनाकधी) भांडे घासतात, पण कोणी घरी असेल, तर त्याला भांडी घासु देत नाही. ही तिची चुकिची मानसिकता नाही का?
शिवाय, स्वतःचे कामं स्वतः करु देणे हेही महत्त्वाचे. तशी सवय आईने नाही लावली तर बायकोने लावावी. यात चुकीचे काय लिहिले? >>> तुम्हि जर हळु हळु नेहेमी थोडि स्वतःहुन कामे करायला सुरु केलि तर का नाहि म्ह्णेल. जर कधि घरि काम करत नसाल आणि जाऊन एकदम भांडे घासायला लागला तर बायको सुद्धा चक्रावेल ना काय झाले म्हणुन राहु द्या असे म्हटले असेल.
स्वतःचे कामं स्वतः करु देणे हेही महत्त्वाचे वाटते ना तर त्याची सवय बायको ने तुम्हाला लावुन देण्यापेक्शा तुम्हिच बायकोची जी चुकिचि मानसिकता आहे ना ति बदला ना.
ग्रूहीणीला मदत या शब्दात मला
ग्रूहीणीला मदत या शब्दात मला काही चुकीचे वाटले नाही. ज़र ती ग्रूहिणी असेल तर घर साम्भाळणे ही तिची responsibilty असायला हवी. कामाचे विभाजन म्हणून. जर एखादी स्त्री पूर्ण वेळ ग्रूहिणी असेल आणि नवरा बाहेर काम करत असेल तर अर्थातच घरकाम ही मदतच असणार. दोघे काम करत असतील तर घरकाम हे दोघांचे काम म्हणता येईल.
मी बाहेरही काम करणार नाही आणि घरी तू माझ्याबरोबरीने काम कर हे nuclear family काळात मला funny वाटते.
ग्रूहीणीला मदत या शब्दात मला
ग्रूहीणीला मदत या शब्दात मला काही चुकीचे वाटले नाही. ज़र ती ग्रूहिणी असेल तर घर साम्भाळणे ही तिची responsibilty असायला हवी. कामाचे विभाजन म्हणून. जर एखादी स्त्री पूर्ण वेळ ग्रूहिणी असेल आणि नवरा बाहेर काम करत असेल तर अर्थातच घरकाम ही मदतच असणार. दोघे काम करत असतील तर घरकाम हे दोघांचे काम म्हणता येईल.
मी बाहेरही काम करणार नाही आणि घरी तू माझ्याबरोबरीने काम कर हे nuclear family काळात मला funny वाटते.
>>>>> पूर्ण सहमत !!
ताईंचे लिखाण नेहेमी डोक्यावर
ताईंचे लिखाण नेहेमी डोक्यावर धावत जाते.:अओ::अरेरे:
ज़र ती ग्रूहिणी असेल तर घर
ज़र ती ग्रूहिणी असेल तर घर साम्भाळणे ही तिची responsibilty असायला हवी. कामाचे विभाजन म्हणून. जर एखादी स्त्री पूर्ण वेळ ग्रूहिणी असेल आणि नवरा बाहेर काम करत असेल तर अर्थातच घरकाम ही मदतच असणार. दोघे काम करत असतील तर घरकाम हे दोघांचे काम म्हणता येईल. >> घरातिल कामाचा स्कोप किति असतो रोज आणि ऑफिसातिल कामाचा रोजचा स्कोप हे लक्षात घ्या मुलिंनो. त्यात अजुन नवर्याला शनिवारि/रविवारि सुट्टि मिळते, सणांचि सुट्टि मिळते.पुर्ण वेळ ग्रूहिणी जिचि घर साम्भाळणे ही responsibilty असते तिला मिळते का हि सुट्टी? तिचे काम तर नेव्हर एंडींग असते आणि तिने ते "मदत" न मिळता करावे असे वाटते का?
त्यात अजुन नवर्याला
त्यात अजुन नवर्याला शनिवारि/रविवारि सुट्टि मिळते, सणांचि सुट्टि मिळते.पुर्ण वेळ ग्रूहिणी जिचि घर साम्भाळणे ही responsibilty असते तिला मिळते का हि सुट्टी? तिचे काम तर नेव्हर एंडींग असते आणि तिने ते "मदत" न मिळता करावे असे वाटते का?>>>>>>>>>>>>> नोकरी करणार्या स्त्रियांना तर शनिवार/रविवारी जादा कामे असतात.परत घरच्यांच्या फर्माईशी असतात! तिला काही न करता सुट्टी उपभोगायला
मिळत नाही.
BTWमाझ्या नातेवाईकांचे एक वागणे मला ११-१२व्या वर्षी खटकले होते.नवर्याने दाढी करून बाकी सर्व तिथेच
ठेवून तो उठला. नंतर पतिपरायण बाईने साबणाचे पाणी , रेझर इ. उचलून धुतले.तो माणूस हट्टी वगैरे नाही. पण ह्या बाई नेहमी माझ्यावाचून घरच्यांचे अडते म्हणून वात आणायच्या!
ती कायमची संपावर गेली तर काय
ती कायमची संपावर गेली तर काय होईल? विचार करा. >> कुणाच काय होईल? तीच? का घरच्या लोकांच?? भारतातच काय परदेशातही एक गेली तर दुसरी मिळेल/मिळते अशी स्थिती आहे... सबब तिने तिच्या आयुष्याच्या कल्याणार्थ असला काही विचार करू नये आणि इतरांना करायला सांगू नये.
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे . प्रत्येकाने दुसऱ्या व्यक्तीची मानसिकता ओळखावी . नेहमी हेवे दावे ,टीका ,आपण मराठी लोक त्यामुळे प्रगती करू शकत नाही >> हे काय
मराठी माणासाच्या प्रगतीचा आणि लेखाचा काय संबंध
सिमन्तीनी +१००
बाकी , गृहीणी असो वा गृहस्थ , घरात असो वा बाहेर, प्रत्येकाने आपली किंमत आपणच ठेवून घ्यायची असते. एखाद्याला ओझ्याचा बैल व्हायचीच हौस असेल तर लोकही तसेच वागवणार.
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे . प्रत्येकाने दुसऱ्या व्यक्तीची मानसिकता ओळखावी . नेहमी हेवे दावे ,टीका ,आपण मराठी लोक त्यामुळे प्रगती करू शकत नाही >> हे काय अ ओ, आता काय करायचं मराठी माणासाच्या प्रगतीचा आणि लेखाचा काय संबंध>>>>>>>>>>>>>>>>>>>>>. डेलिया मलाही समजलं नाही.....
शिवाय, स्वतःचे कामं स्वतः करु
शिवाय, स्वतःचे कामं स्वतः करु देणे हेही महत्त्वाचे. तशी सवय आईने नाही लावली तर बायकोने लावावी. यात चुकीचे काय लिहिले?>>> आणि घरात भांडणाला कारण निर्माण कराव का? आईच्या बाळाला जर घरातली काम ही बाईनेच करायची असतात, पुरुषांनी बाहेरुन नोकरी-व्यवसायातुन पैसे कमवायचे आणि बाईने घर सांभाळायच अस बाळकडु पाजल गेल असेल तर??? नवरा हा नारायण असतो, लग्नात मुलीचे आईवडील नारायण म्हणुन त्याच्या पाया पडतात, त्याला काम सांगायच नसत इ. इ. ऐकुन घ्यायच का??? हे म्हणजे १० मिनिटाची मदत आणि आयुष्यभराची बडबड... यातुन गृहिणी राहु द्या तुम्ही नका करु हा पर्याय निवडते...
मुग्धा, फारच वैतागलेली
मुग्धा, फारच वैतागलेली दिसतेस. अग पण नवर्यांना अशी सवय लावता येते हळूहळू. आजकालची मुलेही तशी समंजस असतात.
मुल समंजस असुन उपयोग नाही
मुल समंजस असुन उपयोग नाही नताशा...
म्हणजे रोख साबांवर आहे होय
म्हणजे रोख साबांवर आहे होय
छान.
नताशा माझ्या पोस्टीत पण मी
नताशा
माझ्या पोस्टीत पण मी त्याबद्द्लच लिहिलय
मुग्धु
मुग्धु
गृहीणी असो वा गृहस्थ , घरात
गृहीणी असो वा गृहस्थ , घरात असो वा बाहेर, प्रत्येकाने आपली किंमत आपणच ठेवून घ्यायची असते. एखाद्याला ओझ्याचा बैल व्हायचीच हौस असेल तर लोकही तसेच वागवणार.
>> डेलियाला हजारेक मोदक
डेलिया १००% बरोबर. मि काहि
डेलिया १००% बरोबर. मि काहि काळ असा ओझ्याचा बैल झाले होते. घरात व बाहेरहि. आता उमगले आहे, माझि कामे आणि किंमतहि मिच ठरवलि. घरात आणि बाहेरहि. त्यामुळे आता exploit झाल्यासारखे वाटत नाहि. उगिचच मि सगळं करते म्हणुन स्वतःचाच पिट्या पाडणे आणि तक्रार करणे याला काहि अर्थ नाहि.
गृहीणी असो वा गृहस्थ , घरात
गृहीणी असो वा गृहस्थ , घरात असो वा बाहेर, प्रत्येकाने आपली किंमत आपणच ठेवून घ्यायची असते. एखाद्याला ओझ्याचा बैल व्हायचीच हौस असेल तर लोकही तसेच वागवणार.>>>>>>>> १००% सहमत
आणि यात मराठी माणसाचा संबंध
आणि यात मराठी माणसाचा संबंध कुठे?? मी काही लेख वाचलेत...आणि मला वाटते अनघा ताईंना स्वतःची स्तुती ऐकायची असावी आणि इथे सर्वांनी चुका दाखवल्या ( ज्या रास्त आहेत ) ते त्यांना आवडल नाही.....म्हणुन त्या अस म्हणत असाव्यात की मराठी माणसाने लिहिलेले लेखन मराठी माणसांनी अॅडमायर (मराठी शब्द आठवत नाही) करायलाच हव....मग ते कस का असेना.........
ती कायमची संपावर गेली तर काय
ती कायमची संपावर गेली तर काय होईल? विचार करा. >>>>> आम्ही मेड ठेवु....