सलामात दातांग (वेल्कम) टू इंडोनेशिया - भाग २ ,'बोरोबुदूर'

Submitted by वर्षू. on 3 February, 2014 - 20:33

सलामात दातांग ( वेलकम ) टू इंडोनेशिया -भाग १ http://www.maayboli.com/node/47517

मेरापि चे दर्शन घेऊन, परतीच्या वाटेवर ,' बोरोबुदूर' हे जगातले सर्वात मोठे बुद्धिस्ट टेंपल पाहिले.
९ व्या शकात ,' सैलेन्द्र(शैलेन्द्र) डायनेस्टी च्या काळात बौद्धधर्माच्या प्रसाराकरता हे मंदिर बांधण्याचे काम सुरु झाले. उण्यापुर्‍या ७५ वर्षात हे बांधकाम पूर्ण झाले.

वरून पाहिले असता बोरोबुदूर चे स्ट्रक्चर एका भल्यामोठ्या तांत्रिक बुद्धिस्ट मंडला सारखे दिसते.

बुद्धिस्ट तांत्रिक मंडल (नेट वरून साभार)

बोरोबुदूर चा एरिअल व्ह्यू ( नेटवरून साभार)

बांधकामावर,'कलिंग' आणी ,'गुप्ता' स्टाईल आर्किटेक्चर चा प्रभाव दिसून येतो.
संपूर्ण बांधकामात दोन लाख कोरीव वोल्कॅनिक दगड, इंटरलॉकिंग तंत्र वापरून, सीमेंट्,मॉर्टर काहीही न वापरता असेंबल केलेले आहेत .
निर्वाण गती ला पोचण्या अगोदर बोधीसत्वाच्या दहा लेवल्स पार कराव्याच लागतात या महायान तत्वज्ञानानुसार हे मंदिर दहा मजली बांधलेले आहे.

अ‍ॅक्चुली मंदिर म्हणावे तर तसे प्रार्थना गृह , सभा गृह वगैरे इथे आढळून येत नाहीत. इथे फक्त गोलाकार चढत जाणारे कॉरीडोर्स आणी पायर्‍याच दिसून येतात.त्यामुळे ही जागा बुद्धिस्ट सेरेमनीज करता वापरत असावेत. इथे सहा चौकोनी , तीन गोलाकार अंगणांव्यतिरिक्त एक मुख्य अंगण ,सर्वात वरच्या दहाव्या मजल्यावरच्या मुख्य स्तूपात स्थित आहेत.
ही संपूर्ण इमारत एक भली मोठी , गोलाकार फिरत जाणारी स्टेअरकेसच आहे.

इंटर्लॉकिंग तंत्र वापरून एकमेकात बसवलेले दगड

या मोन्युमेंट मधे २,६७२ रिलिफ पॅनल्स असून यापैकी १४६० पॅनल्स वर संपूर्ण जातककथेतील गोष्टी दाखवल्या आहेत. डावी कडून या गोष्टी बघायला सुरुवात केली कि आपोआपच प्रदक्षिणा घातली जाते . आणी आपण एका मागून एक मजले याच प्रकारे चढत जातो.
पहिल्या ते चौथ्या मजल्यावर जातककथा, बुद्ध जन्म, त्याचे आयुष्य, लग्न इ. विषयांवरच्या कहाण्या कोरलेल्या आहेत . बेसिकली मनुष्या चे जीवनमृत्यू चक्र चितारलेले आहे.
पाचव्या,सहाव्या आणी सातव्या मजल्यावर च्या भिंतींवर कोणत्याही प्रकारच्या आकृत्या नाहीत. आयुष्याच्या या मजल्यांवर मनुष्य येऊन पोचला तरी तो निर्वाण गती ला प्राप्त झाला नसला तरी सर्व प्रकारच्या लोभ लालसेतून मुक्त झालेला असतो या गोष्टीचे प्रतीक हे मजले आहेत.

इथून नवव्या मजल्यापर्यन्त उपड्या राईस् बोल चा आकार असलेल्या जाळीदार स्तूपांच्या आत बुद्धाचे वेगवेगळ्या मुद्रांमधे ५०४ पुतळे आहेत.
सर्वात वरचा , दहाव्या मजल्यावरचा सर्वात मोठा स्तूप आता रिकामा आहे. या स्तुपात बुद्धाची अपूर्ण राहिलेली मूर्ती सापडल्याने , तिला म्युझियम मधे हलवण्यात आले आहे.

जाळीतून दिसणारी ध्यानमग्न बुद्धाची मूर्ती

सर्व जाळीदार स्तूपांमधे स्थित बुद्धा च्या विविध मूर्तींची स्पष्ट कल्पना यावी म्हणून एक स्तूप वरून अर्धा कापण्यात आला आहे.

उत्तरेकडून फुल व्ह्यू

मधे अनेक शतके ज्वालामुखी ,' मेरापि' च्या स्फोटांमधून उडणार्‍या राखेचे थर, वेडेवाकडे वाढलेले जंगल यांच्या

थरांखाली ,' बोरोबुदूर' अदृष्य झाले होते.

१८११ ते १८१६ , जावा बेट जेंव्हा ब्रिटीश अमलाखाली आले, त्यावेळी लेफ्टनंट गवर्नर ,' रॅफल्स' यांच्या अथक

प्रयत्नांमुळे हे भव्यदिव्य स्ट्रक्चर दुनियेच्या नजरेसमोर आले.

बोरोबुदूर चे सौंदर्य, भव्यता, त्याचे ऐतिहासिक महत्व , येथील अद्भुत कला या सर्व गुणांचे महत्व जाणून

युनिस्को ने बोरोबुदूर ला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केले आहे ते अगदी सार्थ आहे.

समाप्त.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच भव्य, दिव्य आणि सुघटित वास्तू दिसते आहे.
आम्हाला तिचे दुरून का होईना दर्शन लाभते आहे ह्याचा आनंद आहे.

ते करवून दिल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद!

जाता जाता: बुद्धाच्या गळ्यात काय जानवे दिसते आहे की काय?

अफाट सुंदर वास्तुशिल्प आहे. आणि तितक्याच निगुतीने जतन केलं गेलय. त्याची ओळख करून दिल्याबद्दल खूप धन्यवाद.

अफाट सुंदर वास्तुशिल्प आहे. आणि तितक्याच निगुतीने जतन केलं गेलय. त्याची ओळख करून दिल्याबद्दल खूप धन्यवाद.>>>>माधव +१ Happy

काय सुंदर जागा आहे. अश्या बांधकामाचे डिझाईन आणि प्लानिंग कसे केले असेल. आणि कामगारांकडून कसे करवून घेतले असेल ?

फारच भव्य, दिव्य आणि सुघटित वास्तू दिसते आहे. >>>> +१००....

प्रचंड, भव्य असे शब्दही कमी पडतील अशी ही वास्तू कशी काय उभारली असेल त्याकाळात ???

त्याची ओळख करून दिल्याबद्दल खूप धन्यवाद. >>>> +१००...

बोरोबदूर व प्रबानन खरच अप्रतीम आहेत. भारतीयांनी अगदी अवश्य जाउन पहाव अस. आम्हाला हे पहायच भाग्य मिळाल. बोरोबदूर येवढ भव्य प्रार्थना स्थळ भारतातही कुठे असल्याच ऐकीवात नाही.
प्रबानन मधील ब्रम्हा, विष्णू व महेषाची देवळ , त्यांच्या समोरील त्यांच्या वहानांची देवळ व या सर्वावरील राम, कृष्ण आणि महाभारत या कोरलेल्या चरित्र कथा खरोखरच अचंबीत करणार्‍या.

मेरापी वोल्कॅनोने उध्वस्त झालेल्या बोरोबदूरला पुन्हा पूर्वीचे रूप मिळवण्यासाठी भारत सरकारने मदत केली होती.

वर्षू , छान लिहिलय. पुन्हा एकदा इंडोनेशियाची चक्कर घडवून आणल्याबद्दल धन्यवाद. Happy

@ नरेंद्र गोळे काका

तुमची क्वेरी आताच पाहिली.

बुद्धिजम मधे उपनयन नसल्याने , बुद्धाच्या गळ्यात जानवे / यज्ञोपवित कुठेही दिसून येणार नाही.

त्या पर्टिक्युलर पुतळ्यात दाखवलेल्या बुद्धाचे सार्वभौमित्व स्पष्ट करण्यासाठी म्हणून माला रूपी चिन्ह

आहे.

वर्षू, बुद्ध धर्मात अनेक पंथ होते. त्यातले काही हिंदू विचारसरणीच्या अगदी जवळ होते. हे तांत्रिक बुद्ध (बुद्ध धर्मात पण तंत्रसाधना होती. कदाचीत हिंदू धर्मात तंत्र हे बुद्धांकडूनच आली असावी अशी एक विचारधारा आहे) मंदीर असेल तर त्याचा महायान पंथाशी संबंध असण्याची खूप शक्यता आहे. महायान हे हिंदू विचारसरणीच्या खूप जवळ होते. त्यांचे मुख्य दैवत - अवलोकितेश्वर. अवलोकितेश्वर म्हणजे संस्कृतमध्ये पद्मपाणी. म्हणून तो विष्णूचेच रूप असावा असेही म्हटले जाते. हिंदू पण बुद्धाला विष्णूचा अवतार मानतातच. त्यामुळे त्याच्या गळ्यात जानवे असणे सहज शक्य आहे.

माधव जी, तुम्ही जे सांगितले त्याची ही शक्यता नाकारता येत नाही . हे मंदिर ,'महायान' तत्वज्ञानावरच उभारलेले

आहे.

पण हा धर्मचक्रमुद्रेतील पुतळा वैरोचना चा असून , अरुपधातु लेवल वर असल्यामुळे त्याच्या गळ्यात जानवं असण्याची शक्यता कमी आहे..

स्टिल मला या विषयावर अथॉरिटी नाहीये..

'माधव' !!! तो 'जी' कशाबद्दल आहे?

मी पण या विषयातला तज्ञ नाहीये. फक्त एक शक्यता बोलून दाखवली.

पण तुमच्या पोस्ट मधून नविन माहीती मिळाली - वैरोचन. हिंदू mythology मध्ये पण विरोचन आहे - प्रल्हादाचा मुलगा.

अरे, मी कसं मिसलं हे?
काय सुंदर आणि सुघड आहे ही वास्तू! आणि सर्व फोटो आणि माहिती पण मस्त!! Happy

वर्षूजी दोन्ही भाग माहीतीपुर्ण. मंदिराचे फोटो खुप छान. मेरापिची माहीती आवडली.