Submitted by सुप्रिया जाधव. on 29 January, 2014 - 06:02
पुढे जसा तो वाटे बहुधा
तसा नसावा मागे बहुधा
घट्ट ओठ मिटलेले त्याचे
दु:ख असावे ताजे बहुधा
सुस्का-यांची त-हा वेगळी
होते घांव निराळे बहुधा
स्वत्व सोडते तरी हारते
उलटे पडती फासे बहुधा
त्याचा काही दोष नसावा
चुकत असावे माझे बहुधा
चंद्र आणला ओंजळीत मी
जळफळणार सितारे बहुधा
व्यर्थ चालतो खटाटोप हा
कोणी ना कोणाचे बहुधा
अंधारावर राज्य स्थापती
अति काजवे शहाणे बहुधा
घर दु:खाच्या नावे केले
सौख्य पोरके झाले बहुधा
-सुप्रिया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घट्ट ओठ शिवलेले त्याचे दु:ख
घट्ट ओठ शिवलेले त्याचे
दु:ख उसवले ताजे बहुदा
सुस्का-यांची त-हा वेगळी
होते घांव निराळे बहुदा
घर दु:खाच्या नावे केले
सौख्य पोरके झाले बहुदा
चंद्र आणला ओंजळीत मी
जळफळणार सितारे बहुदा>>> हे विशेष आवडले
व्यर्थ चालतो खटाटोप हा कोणी
व्यर्थ चालतो खटाटोप हा
कोणी ना कोणाचे बहुदा<<< व्वा
तसा नसावा मागे बहुदा<<< वा
सुस्का-यांची त-हा वेगळी
होते घांव निराळे बहुदा<<< वा
चंद्र आणला ओंजळीत मी
जळफळणार सितारे बहुदा<<< छान
गझल आवडली. बहुधा तो शब्द बहुधा असा असावा!
ओह !! मी नेहमीच अशा चुका
ओह !! मी नेहमीच अशा चुका करते बहुधा
धन्स बेफिजी, थॅक्स कविन !!
-सुप्रिया
व्यर्थ चालतो खटाटोप हा कोणी
व्यर्थ चालतो खटाटोप हा
कोणी ना कोणाचे बहुदा
त्याचा काही दोष नसावा
चुकत असावे माझे बहुदा<<< फारच आवडले
२, ५, ७ हे शेर आवडले.
२, ५, ७ हे शेर आवडले.
घट्ट ओठ मिटलेले त्याचे दु:ख
घट्ट ओठ मिटलेले त्याचे
दु:ख असावे ताजे बहुधा
मस्त…
'अति काजवे शहाणे बहुधा' या मिसऱ्यात थोडा अडखळलो.
व्यर्थ चालतो खटाटोप हा
कोणी ना कोणाचे बहुधा
व्वा…
गझल छान झाली आहे.
शुभेच्छा.
'माझे' आणि 'कोणाचे' 'झाले'
'माझे' आणि 'कोणाचे' 'झाले' हे शेर खूप छान
'सितारे' आणि 'ताजे' मधले खयाल फर आवडले
'अति काजवे शहाणे बहुधा' या मिसऱ्यात थोडा अडखळलो. <<<+१
माझ्या मते ही रदीफ मतल्यात म्हणजे दोन्ही ओळीत बांधण्यासाठी जरा अवघडच जाते - स्वानुभवातून आलेले वै.म.गै.न.
असो
एकंदर काय तर गझल आवडली
पोरके वरून एक शेर आठवला
पोरकेसे वाटते आहे मला जे ....
ती तुम्ही माझी व्यथा नेलीत बहुधा
~वैवकु
असो
धन्स
वैभव (दोन्ही), शहाणॅ बाबत
वैभव (दोन्ही),
शहाणॅ बाबत सहमत
मतल्याबाबतही.
आभार सार्यांचे !