मायबोलीवर दिसणार्‍या राजकीय जाहिराती

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

गेले काही आठवडे मायबोलीवर राजकीय जाहिराती दिसू लागल्या आहेत. त्याबद्दलच्या धोरणाबद्दल काही मायबोलीकरांनी विचारणाही केली आहे.

मायबोलीची बॅनरसाठी असलेली जागा इतर जाहिरातदारांप्रमाणे कुठल्याही राजकीय पक्षासाठी जाहिरातीसाठी खुली आहे. हे नवीन धोरण नसून गेली जवळ जवळ १० वर्षे हे स्वीकारले आहे. इतकेच नाही तर अनेक देशांमधल्या निवडणूकीच्या काळात त्या त्या देशातल्या राजकीय पक्षांनी बॅनर जाहिरातीसाठी मायबोलीचा यशस्वी वापर केला आहे. अगदी आताही भारतात नरेंद्र मोदींच्या तर बोस्टनमधे स्टीव्ह ग्रॉसमनच्या जाहिराती दिसत आहेत.

यात काही नियम आपण आखून घेतले आहेत.

१) मायबोली कुठल्याच राजकीय पक्षाकडून थेट जाहिरात स्वीकारत नाही.
२) राजकीय पक्षांना गुगलकडे आधी पैसे भरून गुगलतर्फे मायबोलीवर या जाहिराती दाखवा असे सांगण्याची सोय आहे. आधीच घेतलेल्या या रकमेचा काही भाग मायबोलीला मिळतो.
३) कुठल्या जाहीराती कुठे कुणाला दाखवायच्या हे मायबोली ठरवत नाही तर गुगलचा संगणक प्रोग्राम ठरवतो. संगणकात चाललेल्या लिलावाची बोली ज्या जाहिराती जिंकतात, त्या जाहिराती दिसतात.

तुम्हाला एकाच पक्षाच्या/पुढार्‍याच्या जास्त जाहिराती दिसत असतील तर मायबोली जाणीवपूर्वक त्या पक्षाला पाठींबा देते आहे असे मुळीच नाही.

जो पक्ष/पुढारी मायबोली सारख्या सोशल नेट्वर्कींग साईटचे महत्व ओळखतो, जास्त पैसे खर्च करायची तयारी दाखवतो आणि जाहिरातीच्या या आधुनिक तंत्रामधे जास्त अवगत असतो त्याच्या/तिच्या जाहिराती तुम्हाला दिसतील.

उदा. या अगोदर प्रसिद्ध झालेल्या या जाहिराती वानगीदाखल.

political_katherine_clark_sm.jpgpolitical_steve_grossman_sm.jpg

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

हे माहितीच नव्हतं, बर झाल सांगितलेत. Happy
(पण मला तरी अजुन तरी नरेन्द्र मोदीन्ची जाहिरात नाही दिसली ब्वॉ! )

मलाच का दिसत आहे मग ? Happy
मे बी ,त्यांच्याकडे असे सॉफ्टवेअर असेल ज्यामुळे त्याना माझ्यासारखे Neutral असलेले लोक कळत असतील Wink
विरोधी लोकाना दाखवून काय फायदा अन अपने तो अपने होते है Happy

फाफॉ, मध्ये अ‍ॅडब्लॉक लावल्याने अ‍ॅड दिसत नाहिये.
पण स्पष्टीकरण आले हे बरेच झाले. Happy

>>(पण मला तरी अजुन तरी नरेन्द्र मोदीन्ची जाहिरात नाही दिसली ब्वॉ! )<<
ऑ! मला तर रोज दिसते. पण मला दुर्लक्ष करण्याची मुभा आहे. ज्यावेळी जाहिराती प्रचंड व मजकूर थोडाच अशी वेळ येईल त्यावेळी विचार करावा लागेल.