सोशल नेटवर्कचा चित्रकला प्रसारासाठी उपयोग

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

फेसबुक आणि इतर सोशल नेट्वर्क्समुळे कित्येक चित्रकारांची कामं रेग्युलरली पाहाता येतात, आपल्या कामांवर अनेकांच्या प्रतिक्रिया आणि सुचना मिळतात. अनेक आंतराष्ट्रीय आर्ट सोसायटीज ची स्वतःची फेसबुक पेजेस आहेत आणि आंतराष्ट्रीय स्तरावर अनेक ऑनलाईन स्पर्धा FB वर आयोजल्या जातात.
इथे लिहायचे प्रयोजन म्हणजे मुंबईतल्या दोन प्रतिथयश चित्रकारांनी FB वर चित्रकले साठी चालवलेल्या प्रयत्नांची माहिती करुन देणे.
श्री. प्रदीप राऊत- जेहांगीर बाहेर गेली २५ वर्षे प्लाझा आर्ट गॅलरी चालते, इथे अनेक नवोदिताना विनामुल्य चित्र प्रदर्शीत करायची संधी मिळते. या गॅलरीशी संबंधीत चित्रकार प्रदिप राऊत हे स्वतः अ‍ॅबस्ट्रॅक्ट पद्धतीची चित्र काढतात मात्र आपल्या कला महाविद्यालईन दिवसात त्यांनी लँड्स्केप, पोर्ट्रेट , रीअ‍ॅलिस्टिक असे खुप काम केलेले आहे. त्या दिवसांना उजाळा म्हणुन आणि नविन चित्रकाराना प्रोत्साहन म्हणुन ते गेले काही महिने ऑन्लाईन लँड्स्केप स्पर्धा आयोजित करतायत आणि त्याला उत्तम प्रतिसाद लाभतोय.
त्यांच्या FB पेज चा दुआ
https://www.facebook.com/pradip.raut.313

श्री. वासुदेव कामथ - अमेरिकन पोर्ट्रेट सोसायटीचे मानाचे "ग्रँड ड्रेपर अ‍ॅवार्ड विजेते" चित्रकलेच्या दुनियेतले मोठे नाव.
त्यांनी Portrait artist group initiated by Vasudeo Kamath हा ग्रूप
https://www.facebook.com/groups/217380251768906/ इथे चालू केलाय. तेथे पोर्ट्रेट ची मासिक स्पर्धा होते आणि त्यातले १२ विजेते लाईव्ह पोर्ट्रेट स्पर्धेसाठी निवडले जातील. यातिल विजेत्याला येक मोठ्या रकमेचे बक्षिस दिले जाईल आणि यातुन येक चळवळ उभी राहावी ही अपेक्षा.
चित्रकारांनी चित्रकारांसाठी चालवलेल्या या दोन प्रयत्नांची नोंद म्हणुन हे लेखन

विषय: 
प्रकार: 

.फेसबुक आणि इतर सोशल नेट्वर्क्समुळे कित्येक चित्रकारांची कामं रेग्युलरली पाहाता येतात, आपल्या कामांवर अनेकांच्या प्रतिक्रिया आणि सुचना मिळतात. अनेक आंतराष्ट्रीय आर्ट सोसायटीज ची स्वतःची फेसबुक पेजेस आहेत आणि आंतराष्ट्रीय स्तरावर अनेक ऑनलाईन स्पर्धा FB वर आयोजल्या जातात.
<<<<<<<<<

फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्क्सचा हा खुप चांगला उपयोग आहे. प्रत्यक्षात भेटही न झालेल्या कितीतरी चित्रकारांची चित्रे, त्यांचे विचार, त्यांची चित्र काढण्याची पद्धत पहावयास मिळते. आपले काम कोणत्या स्टेजवर आहे ते कळते. लोकांच्या प्रोत्साहनपर तसेच टिकात्मक प्रतिक्रिया, सुचनांमुळे पुढे प्रगती करण्यास वाव मिळतो.

इथे ही माहिती शेअर केल्याबद्दल मनापासुन धन्यवाद....

छान माहिती इथे शेयर केल्याबद्दल धन्यवाद!!

एक प्रश्न आहे जो या धाग्याच्या विषयाशी निगडीत नाही, चित्रकला कशी शिकायची या बद्दल मार्गदर्शन कराल का?

काय असते की बर्‍याचदा शाळेत चित्र काढायची खुप आवड असते, अनेकांची चित्रे खुप चांगली येत असतात, बरेचजण एलिमेंटरी परीक्षेत पास ही होतात, पण शाळेनंतर चित्रकलेचा संबंधच तुटतो. मग शिक्षण, नोकरी यानंतर जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा चित्र काढावीशी वाटतात पण ते जमतच नाही. मुलांबरोबर चित्र काढताना जुन्या आठवणी, शाळेत मिळालेली बक्षिसे आठवतात पण दरम्यान आपण चित्रकलेपासून दूर गेलेलो असतो.
असे अनेक लोक आजूबाजूला असतील ज्यांना स्वत:ला किंवा त्यांच्या पाल्यांना चित्रकला शिकायची आहे, त्यांच्या साठी काही संस्था, शिबीर, वर्कशोप्स असतात का?

गमभन- मला वाटतं की स्केचिंगने सुरुवात करावी, कुठलेही चित्र कॉपी करण्यापेक्षा छोटे ऑब्जेक्ट्स, थोडे कॉप्म्लेक्स ऑप्ब्जेक्ट, आर्किटेक्चर , व्यक्ती असा सराव वाढवत न्यावा. हे येकट्याने करण्यासारखे आहे. यावर मराठी आणि इंग्रजीत उत्तम पुस्तकं उपलब्द्घ आहेत. तसेच बहुतेक शहरात स्केचिंग क्लब्ज आहेत ( थोडे गुगल केलेत तर तुमच्या जवळ्पास येखादा क्लब मिळेल), त्यांच्याबरोबर सराव करता येईल. त्यात एकदा गती आली की मग आपल्याला आवडते त्या एका माध्यमात काम करायला सुरुवात करावी. youtube /net var बरेच व्हिडीओ आहेत्,पुस्तकं /सिडी बाजरात उपलब्ध आहेत. आपले काम वेगवेगळ्या फोरम्स वर (e.g. wetcanvas.com) टाकले तर फिड्बॅक मिळेल.
पुणे/मुंबई/बँगलोर सारख्या शहरात काहि चांगले क्लासेस आहेत ते जॉइन करु शकता, मुंबईत आर्ट सोसायटी ऑफ ईंडीआ सारख्या संस्था आहेत ज्या मेंबर्स साठी डेमो, वर्कशॉप्स, स्टडी टुर आयोजीत करतात

८/१० जण तयार असतील तर मायबोलीवर ऑनलाईन जलरंग कार्यशाळा घेता येईल. >>> मी तयार आहे अशा कार्यशाळेमध्ये शिकण्यासाठी. Happy

कार्यशाळेचे स्वरुप- मी काही पेंटींग टेक्निक थीअरी वर लिहीन, त्यावर पार्टीसिपन्ट्स प्रश्न विचारु शकतील आणि मी माझ्या परिने उत्तर द्यायचा प्रयत्न करीन , त्यावरुन काही एक्झर्साईज दिले जातील त्यापर्माने पेंट करुन पार्टीसिपन्ट्स इथे पोस्ट करतील ज्याच्यावर क्रिटीक लिहता येइल. तसेच काहि स्टेप बाय स्टेप डेमो, व्हीडीओ करता येतील. अ‍ॅड्मीन ना सांगुन हा क्लोज ग्रूप ठेवता येईल

मी तयार आहे अशा कार्यशाळेमध्ये
शिकण्यासाठी.>>>>>मी पण

मी तयार आहे अशा कार्यशाळेमध्ये
शिकण्यासाठी.>>>>>मी पण>> ऱोल नं - ३

पाटील मी पण तयार आहे.. जलरंगात फार चित्रं काढलेली नाहीत कधी.. त्यामुळे नक्कीच आवडेल..

मी, पुस्तकं वाचून, बघून स्वतःचं स्वतःच जलरंगात रंगवायचे १-२ फुटकळ प्रयत्न केले आहेत. पण जलरंगात रंगवताना नेहेमी एक भिती डोक्यात असते. त्यामूळे मला खूप आवडेल यात सहभागी होवून परत एकदा जलरंगामध्ये रंगवायचा प्रयत्न करायला.

बघता बघता ४-५ विद्यार्थी तयार झालेत की कार्यशाळेसाठी. Happy

मला तर जलरंगातील चित्रे फार आवडतात
अल्पना तुला मिलिंद मुळीक माहीत आहेत का
त्यांची चित्रे छान असतात
चेपुवर सर्च मार

थोर कलाकार नव्या लोकांना प्रोत्साहन देताहेत, हे वाचून छान वाटले.

स्केचिंगवर खुप छान पुस्तके आता मराठीतही आहेत. मी बरीच घेऊन ठेवलीत पण .... !

हो जाई. माझ्याकडे त्यांची जलरंग आणि अ‍ॅक्रेलिकची पुस्तकं आहेत. (ज्योत्स्ना प्रकाशनाची ही पुस्तकं खूप सुरेख आहेत.)

खुप छान कल्पना.... आय अ‍ॅम इन...

मला सर्व माध्यमातील चित्रे पहायला व काढायला आवडतात. प्रत्येक माध्यमातील यशस्वी चित्रकारांची उत्कृष्ट चित्रे पाहुन खुप आनंद मिळतो. फेसबुक व इतर सोशल मिडिया ग्रुप्समुळे जगातील कानाकोपरयातील चित्रकारांची चित्रे नित्यनियमाने पहायला मिळतात. विविध चित्रकार त्यांनी निवडलेले माध्यम, त्यांनी वापरलेली पद्धत, त्यांचे कसब यानुसार एकच विषय वेगवेगळ्या प्रकारे काढतात. ते पहायला छान वाटते.

सध्या मी नवोदित आहे. पुस्तक वाचुन, इंटरनेटवरील चित्रकलेसंदर्भात संस्थळांवरुन माहिती मिळवुन चित्रे काढण्याचा सराव करते. मला तुमच्या ऑनलाईन कार्यशाळेत सहभागी व्हायला नक्की आवडेल.

चला अजुन काही लोक जमले तर फेब मधे आपण जलरंग कार्यशाळा सुरू करुया.
यात काय गोष्टींचा सामवेश हवा याच्या सुचना इथेच करा

>> इथे करता नाहि येणार का पाटील ?>>>>> इथेच घेणार आहेत ते
हे पाहा

पाटील | 20 January, 2014 - 13:26
Anvita- ८/१० जण तयार असतील तर
मायबोलीवर ऑनलाईन जलरंग
कार्यशाळा घेता येईल.

पाटील, इथल्या (मायबोलीवरच्या) चित्रकला ग्रूपमध्ये पण लिहिणार का वर्कशॉपबद्दल ? (किंवा मी लिहिते हवं तर. :)) बरेच जण रंगीबेरंगी पान बघत नाहीत मुद्दाम. त्या ग्रूपमधल्या अशा लोकांना पण या कार्यशाळेबद्दल कळेल.

Pages