घुघुति..

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

एक वर्‍हाडी पदार्थ खिचडी सोबत खायचा असतो. शेंगोळे नाही. ते आणि वेगळे. हे वेगळे आहेत. ह्यात तिळाचा कुट घालतात. हा पदार्थ बायका पायावर करतात. पाय पसरुन उंड्याचे सर गुडघ्यपासून टाचेपर्यत लांबत न्यायचे.

ghughati.jpg

विषय: 
प्रकार: 

इंटरेस्टींग दिसतोय पदार्थ..

पण,
हा पदार्थ बायका पायावर करतात. पाय पसरुन उंड्याचे सर गुडघ्यपासून टाचेपर्यत लांबत न्यायचे. <<< हे झेपले नाही.

पण,
हा पदार्थ बायका पायावर करतात. पाय पसरुन उंड्याचे सर गुडघ्यपासून टाचेपर्यत लांबत न्यायचे. <<< हे झेपले नाही. >>>>>>

बस का राव.... पाव खाताच ना तुम्ही....

धन्यवाद. आमच्या विदर्भात पुरुष स्वयंपाक करत नाहीत. ९९.९९ टक्के स्त्रियाच रांधतात, वाढतात, खरकटे काढतात, भांडी धुतात आणि जेवण रुचकर नाही झाले तर बोलणीही खातात. बाई गं तुझं हे असचं चालायचं!

हा पदार्थ करताना उंड्याला भरपुर तेल असतं लावलेल त्यामुळे जर एखाद्या स्त्रिच्या पायांवर लव असतील तर ते निघत नाहीत.

कससंच वाटतंय वाचून. सॉरी.

पण एकूण त्या पदार्थाचं स्वरूप पाहता पायावर घेऊन करण्यामागचं लॉजिक लक्षात येत नाहीये. एखाद्या पोळपाटावर, पाटावर, ओट्यावर सुरळी करता येईल की!

विदर्भात सतत बायकांनाच कामं करायला लागतात त्याचा वचपा त्या पुरुषांना हा पदार्थ अशा पद्धतीनं बनवून खाय्ला घालून काढत असाव्यात.

एका इंग्लिश मूव्हीमधल्या रेस्टॉरंट सीनची आठवण झाली. कोणता मूव्ही ते आठवत नाहीये पण एका कटकट्या गिर्‍हाईकाला तो रेस्टॉ. वाला ब्रेड नको तिथे पुसून सर्व्ह करतो असला गचाळ सीन होता. तो पाहून नंतर कोणीही कोणत्याही रेस्टॉरंट मध्ये जाऊन भांडणार नाही याची ग्यारंटी! Proud

हो हो बी मी सुध्दा पाहीले आहे हे !
जसे वळवट लग्नातील हातावर, चांगल्या फणीवर करतात तसे हे आहे. पुर्वी फार चालायचे हे. !

बी पदार्थ पुर्णपणे लिहा ना.. पुढे काय करतात? उकडतात? भाजतात? आमटीत टाकतात? काय करतात याचे?

एका नातेवाईकाकडे कसल्याशा कार्यक्रमानिमित्त गेलेले तिथे बायकांना पु-यांसाठीचे पिठाचे गोळे भरपुर तेल लावुन मग ते गुढग्यावर दाबुन त्याच्या पु-या करताना पाहिलेले. असे का करताय म्हणुन विचारले तर पु-या अशाच तर बनवायच्या हे उत्तर मिळाले. त्या बायका इतक्या फटाफट करत होत्या, मी मनातल्या मनात मीही असे करतेय इतकंच इमॅजिन केलं तरी माझे गुढगे दुखायला लागले... Happy

हा फोटो नेटवरुन घेतलाय? गुगल इमेजेस मध्ये हा फोटो आहे पण इथला नाहीय.

बी, तुम्ही मी विचारलेल्या प्रश्णाचे पण उत्तर लिहिले नाही.
कुठल्या पीठाचा आहे हा?
असे वेगवेगळे आकार करतात का?
आणि बकी साधना ह्यांचे प्रश्ण अ‍ॅड करा.

ती पायावर वळायची पद्ध्त का आहे? सुरळी लांब हवी तर पोलपाटावर होइल की.

एका इंग्लिश मूव्हीमधल्या रेस्टॉरंट सीनची आठवण झाली.
>>

मला ३ इडियट मधल्या राजूच्या आईने बनवलेल्या पोळीची आठवण झाली. Happy

अरे सन्दर्भ नका रे देऊ.:अरेरे: मग मला कुठल्याच हॉटेलचे खायची ईच्छा होत नाही.:अरेरे:

बी या पदार्थामागचे शास्त्रीय कारण लिही. मी खरच असे कधी वाचले/ ऐकले/ पाहिले पण नाही.

साधना आणी झन्पीने विचारलेल्या प्रश्नाना उत्तरे दे.

Bayaka karot purush na karot. Hatavar karot kee payavar....pan swayampak gharat to chapil kagad vaparu naka!

Bee, savistar lihee.