Submitted by वरदा on 10 November, 2009 - 10:56
माझ्या कामानिमित्त दक्षिण महाराष्ट्रात हिंडताना टिपलेली ही काही क्षणचित्रे... गावोगावी वि़खुरलेल्या गतेतिहासाच्या खुणा..
या टेकाडाच्या पोटी २००० वर्षांपूर्वीचं एक गाव होतं.. या मे महिन्यात त्याच्यावरून बुलडोझर फिरवून ती जमीन लागवडीखाली आणणार होते. आत्तापर्यंत एक पीक घेऊन पण झालं असेल!
मध्ययुगीन इतिहासाचे साक्षीदार
शिल्पवैभव
असंच कुठंतरी आडोश्याला..
यांची स्थिती जरा बरी..
आणि गावोगाव आढळणारी मंदिरे..
आणि थोडासा अपवाद म्हणून देवळाचा असाही एक वापर
गुलमोहर:
शेअर करा
फोटो आणि विचार आवडले. मला हि
फोटो आणि विचार आवडले.
मला हि काहि वर्षा पुर्वी असेच वाटायचे. आपण ( भारतीय) लोकं आपल्या संस्कृती/धर्म्/धर्मस्थळां चे जतन करत नाहि. विचारांती मला असे जाणवले कि ह्याचे कारण फक्त वित्तिय नसुन मानसिक आहे. सामान्य लोकांना ह्या ऐतिहासिक संस्कृति चे महत्व वाटत नसेल तर किती हि पैसे खर्च करुन त्याचे जतन करणं अवघड आहे. आपल्या सारखे काहि लोकं ह्याचे जतन करण्याचा प्रयत्न करीत राहिले तरी बहुतेक असे बुलडोझर फिरत रहातील.
हे सगळं पहाताना काळजावर अनेक घाव आधी जाणवत होते... हळु हळु असे जाणवले कि बहुतेक हि नव्या संस्कृति ची नांदि आहे. लोकांनी जुन्या संस्कृति ला पूर्ण पणे नाकारले आहे. हे सत्य आपण स्वीकारायला हवे.
आजचा भारत आणि फक्त दहा वीस वर्षा पुर्वीचा भारत ह्यात सुध्दा जमीन आस्माना चा फरक जाणवतो. हि चित्र पाहुन मन थोडं उद्वीग्न होतं खरं पण सत्य स्विकारण्या पलीकडे आपल्याला आता तरी काहि पर्याय आहे असे मला वाटत नाहि. असो.
वरदा, फोटो फार सुरेख पण
वरदा, फोटो फार सुरेख पण त्यांची अवस्था पाहून वाईट वाटलं. गेल्या वर्षी मुंबईच्या छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयात गेले होते तेव्हा अशी खूप शिल्पं पाहिल्याचं आठवतंय. ह्या शिल्पाक्रृती तिथे जतन करून ठेवायच्या द्रृष्टीने मायबोलीवरच्या लोकांची काही मदत होऊ शकते का?
वरदा सांगली जिल्ह्यात औदुंबर
वरदा सांगली जिल्ह्यात औदुंबर जवळ नागठाणे म्हणून गाव आहे तिथे सुद्धा नागोबाच प्राचीन देउळ आहे...
तुमचा लेख आणि हे photographs आवडले.अजून वाचायला नक्कीच आवडेल्.प्रतिक्षारत..
खुप छान माहिती अन फोटो. जे
खुप छान माहिती अन फोटो.
जे इतिहास विसरतात, त्यांना भविष्य नसते असे म्हणतात.... विकसित देशांत अश्या विपुल माहितीचा किती सुंदर वापर केला असता, हा विचार मनात आला की खुप वाईट वाटते. आपण आपला इतिहास स्वतःच नष्ट करित आहोत! व्हिएनातील संग्रहालये तर अश्या ठिकाणी जाउन ते पुन्हा त्याच स्थितीत बनवण्यासाठी खास प्रयत्न करतात...
जो समाज पुर्णतः इतिहास विसरलेला आहे अश्याच समजाला, छत्रपतींच्या काळातील किल्ले दुरुस्त करण्यापेक्षा त्यांचे पुतळे (अन खाली स्वतःची नावे कोरणारे) बसवणारे नतद्रष्ट नेते मिळु शकतात. असो. विषय भरकटतोय!
सगले फोतो खुप चन आहेत....कुथे
सगले फोतो खुप चन आहेत....कुथे आहेय हे गाव?
वरदा तू जितकं इंटरेस्टिंग
वरदा तू जितकं इंटरेस्टिंग लिहितेस ना हे फोटोही तितकेच बोलके आहेत्..अजून माहितीसकट टाक ना फोटो..
फोटो छान! पण आपल्याला असा
फोटो छान!
पण आपल्याला असा जुना ठेवा जपता आले पाहीजे.
ह्या अवशेषांचा साधारण कालखंड
ह्या अवशेषांचा साधारण कालखंड सांगू शकाल काय. हे अवशेष मध्ययुगीन आहेत हे कसे कळले? कृपया अधिक माहिती द्यावी.
वरदा, छान डोळ्यांत अंजन
वरदा, छान डोळ्यांत अंजन घालणारी माहिती व फोटोज! तुझ्या पोतडीत अजून बराच खजिना लपला आहे माहिती व अनुभवांचा..... त्यांबद्दल लिही ना!
खूपच सुबक कोरीव काम दिसते आहे
खूपच सुबक कोरीव काम दिसते आहे ....
सर्व माहितीसाठी मनापासून धन्स...
वरदा, छान डोळ्यांत अंजन घालणारी माहिती व फोटोज! तुझ्या पोतडीत अजून बराच खजिना लपला आहे माहिती व अनुभवांचा..... त्यांबद्दल लिही ना! >>>> +१००....
हा धागा वाचलाच
हा धागा वाचलाच नव्हता.
कालियामर्दनाचे शिल्प केवळ अप्रतिम!!
मस्त !!! कालियामर्दनाचे शिल्प
मस्त !!!
कालियामर्दनाचे शिल्प केवळ अप्रतिम!! >>> +१
Pages