रांगोळी :

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 28 April, 2013 - 23:09

हिन्दूधर्मातील संस्कृती आणि परंपरा

रांगोळी : घराबाहेर उंबरठयावर देवघरात,तुळशी वृंदावन येथे रांगोळी काढतात. लहान मोठा सण असो किंवा धार्मिक विधी असो ! भोजनाची पंगत असो अथवा कोणत्याही प्रकारचे औक्षण असो. रांगोळी घातल्याशिवाय पाट ठेवत नाही. रांगोळीमुळे मन प्रसन्न होते.वास्तूमध्ये प्रसन्नता, आरोग्य व लक्ष्मी वास करते. घरात प्रवेशद्वाराला उंबरठा असतो. घरात प्रवेश करणे दुष्ट शक्ती,िपशाच्च शक्ती यांना घरात प्रवेश न होऊ देण्यासाठी उंबरठा ही लक्ष्मण रेषा आहे.घरातील सुवासिनीने स्नानानंतर देवापुढील जागा पुसून रांगोळीने स्वस्तिक काढावे. त्यात हळद पिंजरही घालावी. त्यानंतर प्रवेशद्वार ओल्या फडक्याने पुसावे. दाराच्या उंबरठयांच्या उजव्या ऐ डाव्या बाजूस दोन हळद कुंकवाची स्वस्तिके काढावी. आपण राहतो त्या घरात रिद्धीऐसिद्धिचा सदैव वास असावा. विद्या, संपत्तीने घरात सुखऐसमृद्धि नांदावी असा आहे. रंगावलीने सुशोभित केलेला उंबरठा ओलांडून अवदसा घरात येऊ शकत नाही. स्वस्तिक हे शांती, समृद्विचे प्रतिक आहे. स्वस्तिक म्हणजे मांगल्याचे प्रतिक. दुष्ट शक्तीचा प्रवेश घरात होऊ शकत नाही.
स्वस्तिक, कमळ, शंख, चक्र, गदा, लक्ष्मीची पाऊल व गाईचे पावले या प्रतिमांना शुभ चिन्हे समजतात. धार्मिकद्रुष्टया महत्त्वांच्या अशा या प्रतिमांना देवघरात स्थान असते. भाद्रपदात गौरीचे आगमनापूर्वी घरात लक्ष्मीची पाऊले रांगोळीने काढतात. रांगोळी हळद, पिंजर, गुलाल यांचाही वापर अधिक सुशोभित व मांगल्य म्हणून केला जातो.

तोरण : शुभ कार्य, मंगलकार्य सुचक असे हे तोरण प्रवेशद्वाराला बांधतात। केळीचे तोरण विवाह प्रसंगी बांधले जाते। आंब्याचे डहाळे दारावर लावतात। झेंडूची फूले, भाताची लोंब व आंब्याची पाने यांचे तोरण परिचीत आहे। विशेषत दसराऐदिवाळीला, लक्ष्मीपूजन, प्रतिपदा या वेळेस घरांना व दुकानांना आम्रपल्लव, झेंडु आणि नवीन धान्य भाताची लोंब याने सजवतात। आम्रपल्लवाच्या ठिकाणी साक्षात लक्ष्मीचा वास असतो। म्हणून कलशामध्ये आम्रपल्लव घालुन त्यावर नारळ ठेवतात। भाताची लोंब धान्य समृद्धीचे प्रतिक आहे। महिला कुशल हस्तकलेने अनेक सुंदर व आकर्षक तोरणे बनवितात। यात गणपती, स्वस्तिक, कलश, पाने, फूले, अशा मांगल्य सुचक प्रतिमांची उत्तम सजावट केलेली आढळते।दारावर गणपतीचे अस्तित्व असले म्हणजे तेथे विघ्न प्रवेश करू शकत नाही।

अधिक महितीसाठी -

https://www.facebook.com/dharmaparampara?hc_location=stream

https://www.facebook.com/UpanishadGanga?ref=stream&hc_location=stream

(आधारित /संकलित)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वामिजी,

एक विचारायचे होते . . . .लहानपणापासुन मी हळदी बरोबर कुंकू हाच प्रकार पाहात आलो आहे, त्यामुळे गुलाल अथवा पिंजर हे कुठे वापरायचे ?

मी ऐकले होते कि वाम पंथीय आपल्या साधना करतांना कुंकवाऐवजी पिंजर वापरतात . . . .असे काही आहे का ?
कुंकू कश्यापासुन बनवतात ? हळद तर हळकुंडाची झाली . . . .

माझ्या माहिती प्रमाणे खरे कुन्कू हळदी पासुनच बनते. पण हल्ली डुप्लिकेट केमिकल वापरुनही कुन्कू बनवतात ,जे धोकादायक आहे

१. पिंजर आणि कुंकू यात नक्की फरक काय?
२. ज्या प्रांतातील लोक <<स्वस्तिक, कमळ, शंख, चक्र, गदा, लक्ष्मीची पाऊल व गाईचे पावले>> ही प्रतिके वापरत नाही/ दारावर गणपतीचे अस्तित्व ठेवत नाही/ उंबरठ्यावर रांगोळी काढत नाही/ हळद-कुंकू मधली हळद वापरत नाही अशांना हिंदू म्हणायचं की नाही?

वरदा,

प्रांता-प्रांताप्रमाणे त्या त्या प्रांतातील जनतेची धारणा आणी धर्माविषयी तेथील लोकांचे विचार जर नीट पणे समजुन घ्याल तर आजच्या काळात आंग्ल भाषेत ज्याला " बॉटम लाईन", म्हणतात, ती ईथुन तिथुन एकच आहे हे कळेल.
त्या त्या प्रांतातील शुभ चिन्हांची घडण वेगळी असु शकेल पण मूळ उद्देश्य एकच असतो.
धर्म म्हणजे नक्की काय हे जेव्हा कळेल तेव्हा हिंदु हा शब्द "सनातन धर्माचे", आधुनिक नांव हिंदु कसा झाला हे सुद्धा कळेल.

रांगोळी, हळद-कुंकू अश्या गोष्टींचा वापर करीत नसतील तर त्यांना हिंदु म्हणायचे कि नाही हा प्रश्नच अपे़क्षित नाही होत, त्यांना धार्मिक म्हणायचे कि नाही असा प्रश्न असायला हवा.... आणी त्याचे उत्तरही "हो, अश्यांना सुधा धार्मिक म्हणावयाचे", असे आहे.

तुमच्या पोस्टीत थोडा खोचकपणा जाणवला म्हणुन विदित केले, चुकले असणारच आमचे नाही का ? त्याबद्दल क्षमस्व.

नमस्कार.

पिंजर आणि कुंकू एकच असते ना?

साऊथ मध्ये रोजच दारोदारी रांगोळी काढतात पण वर दिलेल्या चिन्हांपैकी काहीच काढत नाही.पण डिझाईन मस्त असते.

बाकी ते वाईट शक्तीचे काय माहिती नाही, पण एक भाबडा प्रश्न

या सो कॉल्ड चांगल्या, वाईट शक्ती नेहमी मुख्य दारातूनच का घरात येतात? खिडकी, फ्रेंच विंडो, मागील दार, परसदारातून का येत नाहीत?