एक "जिप्सी" आहे माझ्या खोल मनात दडून...

Submitted by जिप्सी on 30 December, 2013 - 02:25

आनेवाला पल जानेवाला है
हो सके तो इसमें जिंदगी बिता दो
पल जो ये जानेवाला है....

नविन वर्ष आता उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे आणि सरत्या वर्षाला निरोप द्यायची वेळ आली आहे. गेल्या वर्षीच्या माझ्या केला ईशारा जाता जाता... या धाग्याप्रमाणेच याही वर्षीच्या भटकंतीच्या आठवणींचा हा कोलाज. "केला ईशारा...." च्या भागात बर्‍याच मायबोलीकरांनी दिलेले आशिर्वाद/शुभेच्छा या वर्षी प्रत्यक्षात साकार झाल्यामुळे हे वर्ष माझ्यासाठी जरा "खासच" गेलं. ;-). यंदाच्या वर्षी जरी १२ महिने १२ जागेची भटकंती जरी झाली नसली तरी संपूर्ण वर्षात १२ पेक्षा नक्कीच जास्त जागी फिरलो. Happy

यावर्षी मालवण, वेंगुर्ला, मुंबई फोटो टुर, नांदुर माधमेश्वर, गोंदेश्वर मंदिर, मायबोलीकरांसोबत केलेला मढे घाट ते शिवथर घळ ट्रेक, मुळशी ताम्हिणी परीसर, पंढरीची वारी (पुणे), ड्रिम ट्रिप "लेह लडाख", पुन्हा एकदा भंडारदरा, बिनीचा किल्ला उर्फ किल्ले रोहिडा, पट्टा किल्ला उर्फ विश्रामगड, उदयपुर, चित्तोडगड, जयपुर अशी राजस्थान सफर या सर्व आठवणींचा हा कॅलिडोस्कोप तुमच्यासाठी नविन वर्षाच्या शुभेच्छांसहित.

=======================================================================
=======================================================================

समस्त मायबोलीकरांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

=======================================================================
=======================================================================
जानेवारी

मालवणमय
फेब्रुवारी

गोंदेश्वर मंदिर (सिन्नर)
मार्च

नांदुर माधमेश्वर, शिवडी/ऐरोली खाडी
एप्रिल

ये है मुंबई मेरी जान
मे

किल्ले रोहिडा
जुन

मुळशी ताम्हिणी भटकंती
जुलै

दिंडी चालली चालली....
ऑगस्ट

मायबोलीकरांसोबत भटक्यांचा सह्यमेळावा - मढे घाट ते शिवथरघळ
सप्टेंबर

ड्रिम ट्रिप "लेह लडाख" - दि ब्रोकन मूनलँड
ऑक्टोबर

एक ऋतु हिरवा झाला - भंडारदरा
नोव्हेंबर

एका लग्नाची गोष्ट Happy
पधारो म्हारे देस....राजस्थान
डिसेंबर

सोनसळी पट्टा अर्थात किल्ले विश्रामगड

यावर्षी भटकंती थोडी कमीच झाली Wink येणार्‍या वर्षात याची कसर नक्कीच भरून काढणार. आत्ता सोबतही आहेच म्हणा, भटकायला. Wink

हे सारं काहि तुमच्यासमोर मांडताना नकळत मंगेश पाडगावकरांच्या ओळी ओठावर आल्या........

यावर्षीचे हे शेवटचे फोटोफिचर. पुढच्या वर्षी भेटुया नवीन थीमसहित.

पुन्हा एकदा सर्वांना नुतन वर्षाच्या मनापासुन शुभेच्छा!!!!

<

Group content visibility: 
Public - accessible to all site users

२०१३ कॅलेंडर छानच आहे... पुढल्या वर्षीच्या कॅलेंडर साठी शुभेच्छा!!! Wink

खत्तरनाक...

लै भारी थीम जिप्सीराव .........

आता "नवीन काय" च्या प्रतिक्षेत आहोत रे......

जिप्सी, आयडी सार्थ करतोस...

फोटोंबद्दल आपण काय बोलणार?

असं एखादं फोटोफीचर घेऊन मायबोली कॅलेंडर बनवता येईल का पुढच्या वर्षीसाठी?

अनुमोदन नंदिनी ! मस्त होईल कॅलेंडर! पण पुढच्या वर्षासाठी का या वर्षासाठीही करता येईल Happy

अप्रतिम मित्रा...

जियो...

नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा Happy

एकच नंबर.

>>>> पुढच्या वर्षीची थीम आत्ताच ठरवून ठेव >> अश्वे थोडा विचार केलास तर तुझ्याही लक्षात येइल थीम >>>> Lol वर्षे.

सुरेख..

Pages