नोकरी हवी आहे

Submitted by झंपी on 27 December, 2013 - 07:19

आमच्या काकांच्या ऑफीसात असलेला एका ऑफीस असिस्टंट( दादा म्हणतात ) ज्यांचा एकच मुलगा आहे. त्याला नोकरी शोधायल मदत हवी आहे.

ह्या वयात त्यांचा प्रॉबलेम आता हा मुलगा आहे. मुलगा हुशार होता पण नंतर वाईट संगतीने मध्येच शिक्षण सोडले. ह्या दादांनी माझ्या काकांच्या मदतीने कर्ज घेवून त्याला डिप्लोमा ईंजिनिंयरींगला अ‍ॅडमिशन घेतले पण मध्येच त्याला वाईट संगत मिळाली व तो अभ्यास करायचा बंद होवून व्यसनात अडकला. त्या मित्रांच्या संगतीतून व व्यसनातून त्याला बाहेर काढले कसेबसे पण कॉलेजला जायला तयार न्हवता नंतर. मग घरीच बसून राहिला. सर्वांनी समजावले तरी तो एकला नाही कारण आत्ता त्याला लाज वाटते असे सांगायला लागला. ह्या दादांनी पण उगाच त्यांच्या सर्व नातेवाईकात सांगितले की तो कॉलेजला जात नाही, समजवा वगैरे. त्यामुळे तो मुलगा आता वडिलांचा भयंकर राग करतो. तुमच्यामुळे माझी इज्जत गेली. मला ईजिंनीयरींग करायचे न्हवते तरी जबरदस्ती केली असे म्हणतो. डॉक्टरांकडे दाखविले जबरदस्तीने तर डॉक्टर म्हणतो, काहितरी किस्सा झाला असावा मित्रांच्या संगतीत त्यामुळे तो घाबरलाय. पुर्ण ट्रीटमेंट घेतलीच नाही. मग कसेबसे त्याला बीए करायला भाग पाडले. कुणाशी काहीच मैत्री करत नाही(मित्र नाहीच आता, घाबरतो तो मैत्री करायला). मग पुन्हा ह्या दादांनी त्याला कंप्युटर कोर्स करायला सांगितला तो हि जबरदस्तीनं
तसा बघितला तर बाहेरच्यांशी तो व्यवस्थित बोलतो, घरातील आता कामं करतो (जेवण, धुणी भांडी वगैरे करतो आईला बर नसेल तर). पण बाप(हे दादा) घरी आला की चिडतो, मारायला उठतो. तुम्ही नुकसान केले, माझी इज्जत घालवली असे बोलतो. त्याच्या नातेवाईकांनी त्याची त्यावेळी चेष्टा केलेली तो राग तो बापावर काढतो. आता दर रोजच्या मारहाणीला घाबरून हे दादा, घरी जायला घाबरतात.
माझे काका मुलाला म्हणाले वेगळी जागा घे, मी तुला पुर्ण वेळची नोकरी देतो तर एकत नाही.
मुद्दा हा की, काकांनी त्याला स्वतःच्या बँकाची व ऑफीसची कामं सोपवली. चेक आणणे, लिहिणे, मेल बघणे, आता कस्टमर प्रश्ण असतील तर काकांना विचारून उत्तर लिहिणे( बरे र्ईंग्लिश मध्ये). कस्टमरांशी बोलणे(ईंग्लिशमध्ये). तो सर्व व्यव्स्थित योग्य वेळेवर करत होता.

तर आता,
हे दादा आता रोज काकांच्या पाया पडून सांगतात त्याला नोकरी मिळवून द्या मी गावची शेती विकून पैसे देतो नोकरी मिळवायला. काकांना ती जबाबदारी अंगावर घ्यायची भिती आहे. पण बरीच वर्षे काम केलय पाहून कशी मदत करायची ह्या मुलाला विचारात आहेत.

प्लीज नोकरी सुचवाल का ह्या मुलाला?
शिक्षणः बारावी नापास पण दहावीच्या मार्कवर डिप्लोमा ईंजिनीयरींग केले ते सुद्धा नापास, मग बीए मात्र पास आहे, कंप्यूटर कोर्स केला ज्यात नेट्वर्कींग, कंप्युटर असेंब्ली शिकला(पण ह्यात त्याला आवड नाही, दादांनी जबरदस्ती केली म्हणून केले असे म्हणतो).

वयः ३९

मध्ये बॅकांची परीक्षा द्यायला तयार झाला पण कळले की वय आता आडवे येतेय. कुठल्याही नोकरीत त्याला वय व अनुभव विचारतात. काकांकडची नोकरी अर्धवेळ अशी होती व ती अधून मधून तो करायचा जेव्हा त्याचा मूड असायचा व तसे पैसे त्याला काका देत. त्यामुळे सतत असा नोकरीचा चेक वा सॅलरी स्लीप अशी नाहीये. काका सॅलरी स्लीप देतील पण अश्या अधून मधून नोकरीचा अनुभव कोणी कंपनी लक्षात घेतील का हा मुद्दा आहे. दुसरे म्हणजे, त्याला आता नोकरी ओळखीच्या ठिकाणी करायची नाही. तो म्हणतो मी दुबई, मस्कत अश्या ठिकाणी करेन. मला (मुंबई/पूण्यात) रहायचेच नाही.
दुबई, कुवेत, मस्कत वगैरे ठिकाणी काय प्रोसेस आहे नोकरीसाठी? ३९ वयाच्या मुलाला नोकरी मिळेल का?

चांगल्या सल्ल्यासाठी मदत करा. इतर बाफ आहेत कुचाळक्या करायला. तेव्हा इथे मुद्द्याच बोलाल हि अपेक्षा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो जेमतेम ओळखीच्या लोकांशी बोलतो जसे की काका व त्यांची फॅमिली. बाकी कुठेही जात नाही. कारण त्याला हिच भिती आहे की लोकं त्याला विचारतील की शिक्षण काय आहे? शिक्षण का सोडले वगैरे.

जुन्या मित्रांच्या नुसत्या नावाने घाबरायचा. कोण कुठे भेटेल ह्या भितीने(इति त्याचे दादा).

भारतात तशीही काही नालायक लोकांना सबंध नसताना फालतु चौकश्या करायच्या, दुसर्‍याची चेष्टा करायची, कुचाळल्या करायच्या, कोणी भित्र आहे पाहिले की आणखी घाबरावायचे. नावं ठेवायची असे प्रॉबलेम्स आहेत.

त्यामुळे त्याला जरा जरी कोणी भूतकाळाबद्दल विचारले की बिथरतो. आधी सुद्धा भारतातच नोकरी होती मिळालेली, तिथे तीन दिवस गेला मग सांगायला लागला की मी जाणार नाही ते किती मार्क्स मिळाले वगैरे विचारत होते कलिग असे सांगतो. काकांनी समजावले की, मग बाहेर जावून कसे टाळणार हे प्रश्ण व अशी माणसं? तर सांगतो तिथे मी अनोळखीच असेन ना, इथे कोण ना कोण कुठून ना कुठुन ओळख निघते...

माहित नाही नक्की काय प्रॉबलेम आहे त्याला. पण मुलगा खूप प्रामाणिक आहे. काकांची बँकाची कामं करताना पैसे वगैरे व्यव्स्थित आणतो, डिपॉझिट करतो. खोटं बोलत नाही. वेळेवर यायचा. पण मध्येच तो डेप्रेस झाला की पुन्हा येणं बंद. मग पुन्हा सुरळीत कामं. जरा जरी त्याला कोणी भूतकाळाबद्दल विचारले(कुठल्या कॉलेजात होतास? का सोडले कॉलेज वगैरे) की झालं हा मारामारी करणार घरी जावून असे त्याचे दादा सांगतात.

आधी त्याची मानसिक समस्या सोडवावी असे मला वाटते. त्याला मानसोपचाराची गरज असावी. संशय, औदासिन्य, चिंताग्रस्तता असे काहीही असु शकते. त्यावर उपाय न करताच कुठेतरी नोकरीला सुरुवात केल्यास समस्या आणखिन वाढतील. या समस्यांवर उत्तम औषधे उपलब्ध आहेत. पुढे समुपदेशन करता येईल आणि तो आनंदाने येथेच नोकरी करायला तयारदेखिल होईल. कुठलंही वय शिक्षणाच्या आड येत नाही. मानसिक समस्या नाहीशा झाल्यास त्याला पुढे कशात रस आहे ते कळुन शिक्षण देखिल घेता येईल.

डॉक्टरांकडे त्यावेळी(जेव्हा १६-१७ वर्षाचा असताना ) घेवून गेलेले त्याचे वडील धमकावून वगैरे. पण आता बदललय ना, तो मोठा झालाय आणखी. तोच वडीलांना मारतो. धमकावतो. वडीलांची ताकद नाही आता त्याला जबरदस्तीने डॉक्टरांकडे घेवून जायला.

दिलेली कामं बरोबर करतो जोवर त्याला कोणी खाजगी प्रश्ण वा भूतकाळाशी सबंधित( तेच ते फेल झाला, शिक्षण सोडले वगैरे) विचारत नाही. जरा जरी बाहेर कोणी विचारले की सोडेल ते काम व घरी येवून बेदम चोपतो तो बापाला. मग ते दादा काकाच्या ऑफीसात येवून रडारड करतात की तुम्ही काहितरी करा.

जरा त्रासलेच आहेत काका. पण एक प्रयत्न म्हणून मदत करायचाय.

त्याच्या नातेवाईकांनी त्याची त्यावेळी चेष्टा केलेली तो राग तो बापावर काढतो. आता दर रोजच्या मारहाणीला घाबरून हे दादा, घरी जायला घाबरतात.>> मला तर वाटतं त्याला कोणत्यातरी एजंटद्वारे बोटीवर किंवा गल्फ कंट्रीकडे पाठवा... घराबाहेर राहील तेव्हा अक्कल येईल/ घरवाल्यांची किंमत कळेल.. आणि सुधारेल सुध्दा.. सामान्यपणे माणसाला नैराश्य आलं की तो स्वतःचे दोष न बघता घरच्यांना दोष देतो...अशाना औषधांनी सुधारण्यापेक्षा स्वकमाईचा आत्मविश्वास दिला तर लवकर बरे होतात.. बोटीवर किंवा गल्फ कंट्रीकडे काम करण्यासाठी आयटीआय आणि दोन/ तीन वर्षे बाहेर राहण्याची तयारी पाहिजे आणि हो चांगला एजंट शोधणे...

राजू अनुमोदन. दूर कुठेतरी कामाला पाठवणे योग्य राहिल. कोणत्याही कंत्राटदाराकडे (फॅसिलिटिज) मध्ये वगैरे एम पी डब्ल्यू म्हणून नोकरी सहज मिळेल फक्त सिन्सियरिटी हवी. किंवा ऐपत असेल तर पेपर्/दूध असा व्यवसाय करणे ही इष्ट राहिल. तिथे कॉन्टॅक्ट चं कोणतंही बंधन असणार नाही. ऑफिसात काही बंधनं पाळावी लागतील.

असा एजंटचा काही पत्ता/साईट?

काही अनुभव आहेत का अश्या एजंटाद्वारे काम मिळवलेले इथे?(हे विचारण्याचे कारण त्या म्हातार्‍या बापाचे पैसे घेवून चुकीचा अनुभव आला तर तेच दादा दोषही देतील काकाला; उगाच ताप होइल तेव्हा अनुभवी कॉन्टक्ट असेल तर बरा).

बरेच वर्षानी प्रतिसाद.

तो मुलगा आहे तसाच आहे. फक्त ते दादा ज्यास्त मार खातात मुलाकडून आणि हा अजून शिव्या देतो. नशीब एक की दारू, सिगरेट व्यसन नाही. त्याला कित्येकदा सांगितले की थोडाफार अनुभव लोकं बनवून(मसाला लावून) सांगतातच,त्यात फसवणूक नाही..

भारतात कॉल सेंटर मध्ये २५ वर्षे वयमर्यादा आहे. दूध,पेपर वगैरे काम नाही करणार. लोकांच्या चेष्टेचा विषय झाला होता जेव्हा तो पेपर काही दिवस टाकायचा. भारतात तसेही नालायक लोकं सदानकदा अश्या लोकांना पिळायला असतात. मानसिक दृष्ट्या विकल असलेल्यंना पण त्रासवतात.
त्यानंतर तो बाहेर जायचा बंद झालाय. घरीच बसतो बर्‍याच वेळ. माझ्या काकांनी काम सांगितले तर एकतो कधी कधी. पन रोज एकत नाही. मग काका तरी पैसे कसले देणार.
मध्ये पुर्ण वेळ नोकरी मिळत होती, तिथे जॉइन होण्याच्या आधी मुर्खासारखं सांगितलं की बारावी नापास झालो. तिथे शिक्षणाची गरज न्हवती तर चेक्स आणायचे/पोचवायचे ग्राहकांचे प्रोफाईल बनवायचे. हा शेवटच्या क्षणी घाबरला की मी नापास होतो हे कुठूनतरी कळले तर माझी बदनामी होइल. झालं.
मग जॉबवाल्यांनी नाही सांगितलं.

काय दुर्दैव ना, शाळेत हुशार असलेला मुलगा(सातवी पर्यंत वगैरे) एकदम कुठे घाबरला, मित्रांनी त्रास काय दिला काहि कल्पना नाही. पण बिघडलाच.

त्याचा कोणावरच विश्वास नाही, त्यामुळे तो कुठलेही औषध घेणार नाही.
तरी दुसरे काही उपाय सुचवा.

ते दादा खूप म्हातरे झालेत. वर मुलगा मारतो, जखमी करतो कधी कधी. मग स्वतःच रडतो व त्या दादांना मलमपट्टी करतो. भरवतो.
नक्की काय प्रॉबलेम आहे कळत नाही.

आमच्याशी खूप अदबीन बोलतो. नजर वाईट नाही, मुलींवर वा कोणावर घाणेरडे कमेंट्स नाही. खोटे बोलत नाही.फक्त बापाशी मधेच राग करून मारतो. Sad

मानसोपचारांची, काऊन्सिलींगची गरज आहे.
प्रामुख्याने मुल शिकत नसलं की आई-वडील कॉमन चूक करतात ती नातेवाईकांना समजवायला सांगणे! ती इनसिक्युरिटी, अपमानाचा सल बरेच वर्ष राहू शकतो. पौगंडावस्थेत वाईट संगत, घरातील वाद, हट्टी पालक, , शैक्षणिक/करियर मधील अपयश त्यामुळे आलेलं नैराश्य त्यावरून घरच्यांचे/नातेवाईकांचे टोमणे व त्यामुळे अधिक नैराश्य हे दुष्टचक्र सुरूच राहते. वडीलांना मारहाण करतो हे त्या पराकोटीच्या रागाचा नैराश्याचा परीणाम! त्यामुळे नोकरी लावण्याआधी मानसोपचारांची/समुपदेशनाची गरज आहे. घरापासून दूर नोकरी मिळाल्यास कदाचित वडीलांबद्दलची अढी कमी होईल.

पुण्याला अशा व्हायोलंट पेशंट साठी हॉस्पीटल आहे जिथे त्यांच्यासाठी वर्कशॉप्सही असतात. त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा/वर्कर म्हणून छोटं-मोठं काम करता यावं यासाठी! चैतन्य मेंटल हेल्थ : http://www.chaitanyarehab.com

आणखी तज्ञ लोकं जास्त माहीती देऊ शकतील. मितान बहुदा लहान मुलांच्या समुपदेशक आहेत पण त्यांना विपु करून पाहावे, त्या अधिक रेफरन्सेस देऊ शकतील!

We need an experienced scrum master who doesn’t need visa. Work location is New York.

लोकहो,
मी EC २०१४ पासआउट आहे. त्यानंतर मी RV-VLSI Design Centre, बंगलोर येथून VLSI चा कोर्स केला आहे. Front End Design and Verification हे माझे specialization होते.
Verilog, System Verilog, UVM, Perl इ. येते..
GATE-१४ आणि GATE-१५ अनुक्रमे ९४ आणि ९३ पर्सेंटाईल ने पास आहे.

या क्षेत्रात कोणी माबोकर असल्यास कृपया संपर्क साधावा.
pratik.kulkarni001@gmail.com

तसेच या कोर्सेस बद्दल माहिती हवी असल्यास संपर्क साधावा..

धन्यवाद ..
कृपया प्रतिक कुलकर्णी यांचा संपर्क क्रमांक जर कोणा मायबोलीकर कडे असल्यास ९०७५६९०७९४ ह्या Whatsapp क्रमांकावर संदेश पाठवावा. धन्यवाद!