ववि२००९:माहिती

Submitted by ववि_संयोजक on 22 June, 2009 - 04:59

नमस्कार मंडळी...

मायबोली वर्षाविहार!!! गेली सहा वर्ष चालु असलेला,जास्तीत जास्त मायबोलीकरांची एकमेकांशी भेट घडवुन आणणारा,पावसात भिजण्याची मजा आपल्या मायबोलीकर मित्रमैत्रिणींबरोबर मनसोक्त लुटायची संधी देणारा मायबोलीवरचा एक उपक्रम.. मैत्रीची नवी नाती जोडणारा आणि जुनी नाती दृढ करणारा असा हा मायबोलीचा एक सोहळा.. दरवर्षी पावसाळा जवळ येऊ लागला की मायबोलीकर आपल्या लाडक्या वविची आतुरतेने वाट पहात असतात.. जुन्या मायबोलीकरांबरोबर नविन मायबोलीकरही सहकुटुंब उत्साहाने यात भाग घेतात..

यावर्षीच्या पावसाचीही चाहुल लागायला आता सुरूवात झाली आहे आणि अर्थातच आपल्या लाडक्या वर्षाविहाराच्या तयारीचीही...

४-५ दिवसांपूर्वी जेव्हा वविची दवंडी पिटली गेली तेव्हापासुनच तुमच्या मनात या वविविषयी उत्सुकता दाटली असेल ना? मनात अनेक प्रश्नही डोकावत असतील जसे `२००९ चे ववि आहे तरी कुठे? कधी आहे?या वविमध्ये कोणकोणत्या नव्या जुन्या मायबोलीकरांना भेटायला मिळेल? या वविला काय काय खेळ असतील ?वविसाठीचे रजिस्ट्रेशन कसे करायचे? पैसे कुठे व कधी भरायचे?' वगैरे वगैरे.. यातल्या काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे मिळतील तर उरलेल्यांची उत्तरे हळुहळु मिळतील.. Happy

    यंदाच्या ववि संबंधी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे :

      तारीख: १९ जुलै २००९ (रविवार)

      वेळ: सकाळी ९.३० ते सायंकाळी ५

      स्थळ: मावळसृष्टी रिसॉर्ट ,पुणे

        या वर्षाविहारात registered मायबोलीकर व त्यांचे कुटुंबीय (पती/पत्नी व मुले) यांनाच भाग घेता येईल.

          आपण vavi@maayboli.com या ई-मेल आयडीवर मेल करुन आपले नाव नोंदवायचे आहे.

            नोंदणी करताना खालील माहिती आवश्यक आहे.

            १. नाव
            २. मायबोलीचा User ID
            ३. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक (भ्रमणध्वनी क्रमांक दिल्यास उत्तम)
            ४. कुठल्या शहरातुन येणार (मुंबई,पुणे ई.)
            ५. आपला नेहमी वापरात असलेला Email ID
            ६. सहभागी होणार्‍या एकुण व्यक्तिंची संख्या (प्रौढ/ मुले).
            ७. लहान मुले (६ ते १० किंवा ३ ते ५ वयोगट) असल्यास त्यांचे वय
            ८. मायबोली गृपबरोबर बसने येणार की स्वतंत्र येणार?
            ९. पैसे कसे भरणार? प्रत्यक्ष की ऑनलाईन?

              नावनोंदणीची अंतीम तारीख ८ जुलै२००९ आहे.

                मावळसृष्टी रिसॉर्टचे प्रवेश शुल्क प्रौढांसाठी प्रत्येकी २५०.०० रुपये आहे. ६ ते १० वयोगटातील मुलांसाठी प्रवेश शुल्क १५०रु आहे. आणि ३ ते ५ वयोगटातील मुलांसाठी प्रवेश शुल्क १०० रु. आहे.

                  एकुण इच्छुक सभासदसंख्येनुसार बसभाडे ठरविण्यास मदत होते. याकरता लवकरात लवकर नावनोंदणी केल्यास उत्तम!

                    पुणेकरांसाठी मावळसृष्टीची बस उपलब्ध आहे.बसप्रवासाचा अंदाजे खर्च प्रत्येकी २०० रुपये.

                    मुंबईकरांसाठी बसप्रवासाचा अंदाजे खर्च प्रत्येकी २५० रुपये.

                    तीन वर्षावरील सर्व व्यक्तीना हे बसभाडे लागू होईल.

                      इतर माहिती जाणुन घेण्याकरता आपण इथे मेसेज टाकु शकता अथवा vavi@maayboli.com या ई-मेल आयडीवर संपर्क करु शकता.

                        वर्षाविहार २००९ चे संयोजक मंडळ:

                          पुण्यातील संयोजक:
                          मयूरेश Kmayuresh2002(०९९२२४०१७७८)
                          दिपक SAJIRA (०९४२२३०३२४१)
                          हिमांशु himscool
                          केतन Arbhaat

                            मुंबईतील संयोजक:

                              निलेश Neel_ved (०९७०२७२१२१२)
                              विनय Vinay_bhide (९८२०२८४९६६)
                              दत्तराज Indradhanushya(०९८३३९५३८८७)
                              संदीप Gharuanna ( ०9819993634)
                              आनंद Anandsuju

                                सांस्कृतिक समिती:

                                नंदिनी nandini2911
                                दिप्ती Dakshina
                                समीर Sameer_ranade
                                मीनाक्षी meenu

                                  मंडळी, पैसे जमा करण्यासाठी माहिती देत आहोत.

                                    पुणेकर मायबोलीकरांसाठी:

                                      तारीख: ११जुलै (शनिवार) आणि १२ जुलै,२००९ (रविवार)

                                        स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा.

                                          वेळ: सं. ५.३० ते ८.००

                                            वर्गणी:

                                              प्रौढांकरता रु. ५०० (मावळसृष्टी रिसॉर्ट शुल्क रु. २५० + बस भाडे रु. २०० + इतर खर्च रु. ५०)

                                                मुलांकरता (६ ते १० वयोगटातील) रु. ४०० (मावळसृष्टी रिसॉर्ट शुल्क रु. १५० + बस भाडे रु. २०० + इतर खर्च रु. ५०)

                                                  मुलांकरता (३ ते ५ वयोगटातील) रु. ३५० (मावळसृष्टी रिसॉर्ट शुल्क रु. १०० + बस भाडे रु. २०० + इतर खर्च रु. ५०)

                                                    मुंबईकर मायबोलीकरांसाठी:

                                                      तारीख: १२ जुलै,२००९ (रविवार)

                                                        स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात

                                                          वेळ: सं. ५.३० ते ८.००

                                                            वर्गणी:

                                                              प्रौढांकरता: रु. ५५० प्रत्येकी (मावळसृष्टी रिसॉर्ट रु. २५० + बस भाडे रु. २५० + इतर खर्च रु. ५०)

                                                                मुलांकरता (६ ते १० वयोगटातील) रु. ४५० (मावळसृष्टी रिसॉर्ट शुल्क रु. १५० + बस भाडे रु. २५० + इतर खर्च रु. ५०)

                                                                  मुलांकरता (३ ते ५ वयोगटातील) रु. ४००(मावळसृष्टी रिसॉर्ट शुल्क रु. १०० + बस भाडे रु. २५० + इतर खर्च रु. ५०)

                                                                    इतर खर्चामधे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लागणार्‍या खर्चाचा अंतर्भाव आहे.

                                                                      तीन वर्षांखालील मुलांना कोणतेही शुल्क नाही.

                                                                        मह्त्वाचे: आपण नाव नोंदवले असल्यास, परंतु १२जुलै२००९ पर्यंत पैसे जमा न केल्यास नावनोंदणी रद्दबातल ठरविण्यात येईल.

                                                                          समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केलं तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.

                                                                            स्वतंत्र येणार्‍यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.

                                                                              ऑनलाईन पैसे भरणार्‍यांना ज्या अकाऊंटमध्ये पैसे भरायचे आहेत त्याचे सर्व डीटेल्स ईमेलने कळविले जातील.

                                                                                मुंबई आणि पुणे सोडुन इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणाला वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.

                                                                                  इथे मावळसृष्टीच्या संकेतस्थळाचा दुवा देत आहोत.
                                                                                  www.mavalsrushti.com

                                                                                    आपल्याला काही शंका असल्यास विनासंकोच संपर्क साधा.

                                                                                    धन्यवाद!

                                                                                    वविसंयोजक

                                                                                    {त.टि:- मावळसृष्टीला २००५मध्ये ववि झालेला आहे तरी वविसंयोजकांनी पुन्हा यावर्षी तिथेच ववि करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय वविचा दर माणसी खर्च,आपल्यासाठी तिथे उपलब्ध असलेल्या सोयी , ४ वर्षांचा गॅप( २००५ ते २००९)आणि नविन मायबोलीकरांची जास्त संख्या इत्यादी मुद्यांचा विचार करून घेण्यात आला.}

                                                                                    विषय: 
                                                                                    Group content visibility: 
                                                                                    Public - accessible to all site users

                                                                                    अगदी तपशीलवार माहिती! कसलीच शंका मनात उरली नाही. धन्यवाद संयोजक आणि सर्व समित्यांमधले कार्यकर्त्यांनाही! Happy

                                                                                    मावळसृष्टी रिसॉर्ट ,पुणे
                                                                                    हे ठिकाण पुणे एअरपोर्टहून साधारण किती दूर आहे ?

                                                                                    डेक्कनपासून हे ठिकाण अंदाजे ५३ / ५४ किमी आहे. आणि डेक्कन ते एअरपोर्ट हे अंतर अंदाजे १० किमी.

                                                                                    येण्याच्या आधी पुण्यातील संयोजकांना फोन करून तुमचा प्लॅन कळवलात, तर पुण्याहून निघणार्‍या मायबोलीकरांनाच तुम्ही जॉईन करू शकण्याबद्दलची चर्चा करता येईल. Happy

                                                                                    त्याचप्रमाणे मुंबईहून येत असल्यास तिथल्या संयोजकांशी संपर्क साधून वरीलप्रमाणे चर्चा करता येईल. बाकी स्वतंत्र येत असल्यास प्रश्नच नाही. Happy

                                                                                    म्हणजे ११ तारखेला बोधी वृक्षाखाली जमायचे आणि शुल्क जमा करायचे तर! Happy
                                                                                    -------------------------------------------------------------
                                                                                    'ज्याला कलाकार नाही बनता येत तो टीकाकार बनतो'

                                                                                    माझी त्यादीवशी संध्याकाळी ६:३० ची दिल्ली रिटर्न फ्लाईट आहे ! Sad

                                                                                    व वी संयोजक,
                                                                                    मी रजिस्ट्रेशन केले आहे, चेक करा आणि रिप्लाय करा.....

                                                                                    वा, पुन्हा एकदा मावळसृष्टी... तो एक नसलेला धबधबा... जस्ट गो अहेड अँड एक्स्प्लोर... वा लई जुन्या आठवणी ताज्या झाल्या. Proud करा! मजा करा लोकहो.

                                                                                    प्रकाशकाळेल, तुम्ही तुमच्या सोयीनुसार लौकर निघून जाऊ शकता की! काही वविकर तसे करतातही. (उदा. लहान मुलांना घेऊन येतात ते!) जितका वेळ तुम्हाला थांबता येईल तेवढे ववि एंजॉय करू शकाल तुम्ही. हे अर्थात माझे मत, संयोजकही तुम्हाला उत्तर देतीलच.
                                                                                    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
                                                                                    There is no charge for awesomeness.... or attractiveness.

                                                                                    प्रकाश्,श्रध्दाके म्हणत आहेत ते बरोबर आहे की तुम्ही तिथुन लवकर निघु शकता.. फक्त तिथुन एअरपोर्टवर जाण्याची काय सोय करणार ते आधी पहावं लागेल तुम्हाला.

                                                                                    अगदी आयत्यावेळेला येण्याचं ठरवलं आणि येण्याजाण्याची सोय स्वतःच करणार असेन तर येता येईल का? १ किंवा २ माणसे.
                                                                                    मला यायची इच्छा आहे पण अगदी शेवटपर्यंत (२-३ दिवस आधीपर्यंत) काही सांगता येणार नाहीये.
                                                                                    ----------------------
                                                                                    हलके घ्या, जड घ्या
                                                                                    दिवे घ्या, अंधार घ्या
                                                                                    घ्या, घेऊ नका
                                                                                    तुमचा प्रश्न आहे!

                                                                                    नीधप,येण्याजाण्याची सोय स्वतः करणार असाल तर काही प्रॉब्लेम येऊ नये असं सध्या तरी वाटतय पण निदान दोन तीन दिवस आधी संयोजकांना फोन करून तसे कळवलेत तर बरं होईल... म्हणजे नक्की काय ते परिस्थिती पाहुन त्यावेळी सांगता येईल...

                                                                                    नक्की!
                                                                                    ----------------------
                                                                                    हलके घ्या, जड घ्या
                                                                                    दिवे घ्या, अंधार घ्या
                                                                                    घ्या, घेऊ नका
                                                                                    तुमचा प्रश्न आहे!

                                                                                    >>>> येण्याजाण्याची सोय स्वतः करणार असाल तर हरकत नाही पण निदान दोन तीन दिवस आधी संयोजकांना फोन करून तसे कळवलेत तर बरं होईल
                                                                                    पूर्वानुभवावरून मला असे वाटते की, "सन्योजकान्नी" इतके ओपनएण्डेड आश्वासन लगेच देऊ नये, किन्वा आता दिले आहेच, तर आधी "सर्वान्शी विचारविनिमय" करुन तसेच मावळसृष्टिचा आवाका (कॅपॅसिटी) लक्षात घेऊन दिले आहे असे गृहित धरावे का? जेणेकरुन या आश्वासनात मागाहून, अशाच स्वरुपाची मागणी अजुन काही लोकान्कडून आल्यास, बदल करायची गरज पडणार नाही? Happy

                                                                                    संयोजक,
                                                                                    मला अशी सवलत दिल्याने संयोजनात अडचणी निर्माण होतायत असे वाटल्यास तुम्हाला वाटेल तेव्हा ही सवलत तुम्ही रद्द करा.

                                                                                    ----------------------
                                                                                    हलके घ्या, जड घ्या
                                                                                    दिवे घ्या, अंधार घ्या
                                                                                    घ्या, घेऊ नका
                                                                                    तुमचा प्रश्न आहे!

                                                                                    लिंबूटिंबू ,नीधप ही कोणा एकासाठी खास सवलत वगैरे नाहीये...

                                                                                    अजुन कोणीही हाच प्रश्न विचारला तरी उत्तर हेच असेल..

                                                                                    नीधप,तुम्हाला दोन तीन दिवस आधी फोन यासाठीच करायला सांगितला आहे संयोजकांना की त्यावेळची परिस्थिती पाहुन नक्की काय ते सांगता येईल ...

                                                                                    लिंबूटिंबू,तुम्ही मांडलेला मुद्दा लक्षात घेऊन वरील पोस्टमध्ये सुधारणा केली आहे.. तेव्हा आता शंकेला कुठे वाव नसावा अशी आशा आहे :)..

                                                                                    संयोजक,
                                                                                    कल्पना होतीच याची पण ते स्पष्टपणे यावे इथे म्हणजे तुम्हाला त्रास नको म्हणून आधीचे पोस्ट.

                                                                                    ----------------------
                                                                                    हलके घ्या, जड घ्या
                                                                                    दिवे घ्या, अंधार घ्या
                                                                                    घ्या, घेऊ नका
                                                                                    तुमचा प्रश्न आहे!

                                                                                    छे छे सन्योजक, मी शन्का नव्हे, तर आधीच्या मजकुरातून ध्वनित होणार्‍या "अनेक अर्थान्मुळे" निर्माण होऊ शकणार्‍या सम्भाव्य परिस्थितीबद्दल हितचिन्तकाच्या भुमिकेतून एक सावधगिरीची सूचना, म्हणून विचारणा केली होती! Happy बाकी विशेष काही नाही!

                                                                                    वा हे बर झालं
                                                                                    चला मुंबैकरानो

                                                                                    १२ जुलै,२००९ (रविवार)
                                                                                    प्रि-ववि जीटीजी च्या तयारी ला लागा
                                                                                    स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात
                                                                                    वेळ: सं. ५.३० ते ८.००

                                                                                    सगळे संयोजक वाट पहात आहेत

                                                                                    इदं न मम राष्ट्राय स्वाहा !!

                                                                                    मावळसृष्टीचे नाव बदलुन आता मायबोलीसृष्टी करा.. Happy

                                                                                    श्र वहिनी.. नसलेला धबधबा.. अगदी अगदी.. त्यात यावेळी पावसाने अजुन तरी टांग दिली आहे.. येताना बहुतेक काखेत कळसा (आणि मावळसृष्टीला वळसा), डोक्यावर हंडा घेऊन यावे लागेल..

                                                                                    त्या दिवशी पाणी नाही पडले तर पाणी पडल्यासारखे होईल.. (हे म्हणजे 'सकाळच्या' ग्राफिटीसारखे वाटतेय..)

                                                                                    पण संयोजकांच्या आणि मायबोलीकरांच्या पुण्याईने असे होईल याची शक्यता कमी वाटते..

                                                                                    संयोजकांना शुभेच्छा.. कोणी दिवे दिले तर मनावर घेऊ नका.. कर्मण्ये वाधिकारस्ते..

                                                                                    मित्रांनो.. स्व:ताचे वाहन असले तरी शक्यतो बसनेच जायचा प्रयत्न करा.. बसमध्ये केलेली धमाल हा वविचा एक अविभाज्य घटक आहे..

                                                                                    दिप,
                                                                                    तु येणार आहेस का? की सालाबादाप्रमाणे यावर्षीही टांगारु...........

                                                                                    संयोजक आणि प्रशासक,

                                                                                    ठाण्यातून काही मदत हवी आहे का?

                                                                                    सध्या बाकड्यावर असल्याने मदत करु शकते. Happy

                                                                                    लहान मुले (६ ते १० किंवा ३ ते ५ वयोगट) असल्यास त्यांचे वय>>>>>>>>>>
                                                                                    ३ वर्षापेक्षा लहान मुलांचे काय? (अर्थातच त्यांना कुठलेही शुल्क असणार नाही असे वाटतेय, पण वर तसा कुठेही उल्लेख नाही म्हणुन हा प्रश्न Happy कृपया संयोजकांनी खुलासा करावा व वर तसा उल्लेख करावा हे आपले माझे मत :))

                                                                                    समजा, ११ जुलै च्या आधी ववि संयोजक किंवा सांस्कृतिक समिती संयोजकांपैकी कुणाची तरी भेट झाली आणि त्यांच्याकडे पैसे जमा केले तर चालेल का?
                                                                                    ************
                                                                                    To get something you never had, you have to do something you never did.

                                                                                    ३ वर्षापेक्षा लहान मुलांचे काय? >>>राज्या,तुमच्या मुद्यानुसार वर खुलासा केला आहे...

                                                                                    समजा, ११ जुलै च्या आधी ववि संयोजक किंवा सांस्कृतिक समिती संयोजकांपैकी कुणाची तरी भेट झाली आणि त्यांच्याकडे पैसे जमा केले तर चालेल का?>>>> चालेल.. पण आधी वविनोंदणीची मेल सर्व माहितीसकट वर दिलेल्या मेल आयडीवर पाठवा...

                                                                                    धन्यवाद संयोजक Happy
                                                                                    ************
                                                                                    To get something you never had, you have to do something you never did.

                                                                                    'बाई, वविला गाडी चाललीय.. कुठे जायचंय तुम्हाला?'
                                                                                    'वविलाच जायचं म्हणतेय दादा, दोन हाप द्या तिक्टं..'
                                                                                    'हाप? कुठेत दोन हाप? तुम्ही तर दोन मोठ्ठी माणसे दिस्ताहात..'
                                                                                    'दादा, मी नि माझा दादला. आत्ताच लगीन झालंया. वाईच ल्हान वयात झालंया बगा..'
                                                                                    'बाई, काय हे? एकतर टम्म भरलीये गाडी. जागा नाही. वरून चांगल्या चार चार भाकरी खाऊ शकणार्‍या दोन माणसांची हाफ तिकिटं मागताय तुम्ही? नाही जमणार. चला उतरा खाली. उशिर होतोय वविला..'
                                                                                    'दादा, असं रानोमाळ सोडू नगा हो गरिबाला. रस्ताबिस्ता कायच ठाऊक नाय बगा..'
                                                                                    'बाई, गुमान दोन तिकिटं घ्या, नाहीतर उतरा बघू.'
                                                                                    'विच्छा माझी पुरी करा दादा. मायबोलीवर लई लोकं भेटत्यात, पण असं परत्यक्ष भेटायला नाय मिळालं अजून. मैत्रिणी हाईत बर्‍याच. काही डेंजर लोकं पन भेटत्यात. त्यास्नी बी बगून घायचं म्हणते जरा. बरं दादा, असं करा, एकच द्या फुल्लभरून तिकिट.'
                                                                                    'एकच तिकीट? का? नवर्‍याला सोडून देणार काय या जंगलात?'
                                                                                    'नाही दादा, मी हुभीच र्‍हाईन. हुबी राहून दमले तर नवरा हुबा राहील. तो पन दमला, तर घेईल मला मांडीवर. तित्तंबी येकाच ताटात जेवणार. लई पिरीम हाय आमचं येकमेकांवर. पायजे तर माजीच ताटली वापरणार. बागा संगंच हाय माज्या..'
                                                                                    '(आयला, ही बया काय सोडत नाय. ववि इथंच होणार असं दिसायला लागलंय). बाई, ते जमणार नाही. गप्प दोन तिकिटं काढा अन बसा बघू. नाहीतर उतरा चला पटकन.'
                                                                                    'दादा, दादा, असं नगा हो करू. कुठे फेडशाल? घरी अस्त्यालच ना आयाभनी?....'
                                                                                    --
                                                                                    तर मंडळी, असे वाद नि संवाद सुरू झालेत सगळीकडे. तुमचं काय? तिकिटं काढलीत ना वविची. चला, घाई करा बघू.. Happy

                                                                                    @ वविसंयोजक,
                                                                                    उपरोक्त संवाद / जाहिरात / मनोरंजन, खूप्पच आवडलं.
                                                                                    अप्रतिम !
                                                                                    धन्यवाद!
                                                                                    ---------------------------------------------------------
                                                                                    " वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.
                                                                                    वायफळ लिहीण्यापेक्षा, इथे २ शब्द इतरांना सहाय्यक ठरू शकतात.
                                                                                    १. http://www.maayboli.com/node/8639
                                                                                    २. http://www.maayboli.com/node/8628

                                                                                    तुम्ही जाताय का वविला? नाही म्हणजे तसं आधी जाहीर केलं तर अजून खूप गर्दी होईल.. मुंबई-पुणे दोन्हीकडून ज्यादा गाड्या सोडाव्या लागतील Happy

                                                                                    (माफ करा वविसंयोजक पण हा टाकण्यावाचून गत्यंतर नव्हतं.. Happy )----------------------
                                                                                    हलके घ्या, जड घ्या
                                                                                    दिवे घ्या, अंधार घ्या
                                                                                    घ्या, घेऊ नका
                                                                                    तुमचा प्रश्न आहे!

                                                                                    उगाच ट्रॅफिकला अडचण नको! :))
                                                                                    --------------------------------------------------------
                                                                                    " वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.
                                                                                    वायफळ लिहीण्यापेक्षा, इथे २ शब्द इतरांना सहाय्यक ठरू शकतात.
                                                                                    १. http://www.maayboli.com/node/8639
                                                                                    २. http://www.maayboli.com/node/8628

                                                                                    एक आठवण
                                                                                    बर्‍याच वर्षान्पूर्वी, पुण्यातील मायबोलीकर किमयापाशि जमले होते, तेव्हा झक्कीदेखिल आलेले होते
                                                                                    माझ्या पुसटत्या आठवणीनुसार बहुधा २००२ की २००३ साली एकत्र जमले होते
                                                                                    त्यावेळेस निघताना मृ नावच्या आयडीने अन्य एका आयडीच्या सहभागातून, माझ्या हातात एक गुलाबाचे फुल आलेले रोप लावण्यास दिले होते! Happy अपेक्षा अशी की ते रोप वाढवुन मी जगवावे! अर्थातच मी ते रोप लावले, काही वर्षे ते होते
                                                                                    *********************
                                                                                    असे होऊ शकेल काय?
                                                                                    ववि किन्वा तत्सम कार्यक्रम्/गेटटुगेदरास वेळोवेळी अनेक मायबोलीकर जमत असतात, ववी तर खास पावसाळ्यात असतो, तेव्हा वविच्या निमित्ताने सामुहिकरित्या वृक्षारोपण किन्वा गेला बाजार बीजारोपण असे काही करता येईल का?
                                                                                    फार पूर्वी आकुर्डी व अन्य ठिकाणि सुबाभुळीची असन्ख्य झाडे होती, त्यान्च्या शेन्गा घेऊन त्यातिल बिया गोळा करुन जिथे जिथे म्हणून ट्रेकला जायचो तिथे त्या टाकायचो! Happy पण त्या उप्पर प्रगती करता आली नाही!
                                                                                    वविसारख्या उपक्रमान्मधे अन्य मौजमजेबरोबरच, काही अर्धाएकतास वेळेचे नियोजन अशाप्रकारच्या कामाकरता करता येऊ शकेल काय?

                                                                                    माझा कोरडा पाठिंबा नाही तर मनाने व धनाने सहभाग असेल अशा उपक्रमांना.
                                                                                    ----------------------------------------------------------
                                                                                    " वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी".- स्टिफन कोव्हे.
                                                                                    वायफळ लिहीण्यापेक्षा, इथे २ शब्द इतरांना सहाय्यक ठरू शकतात.
                                                                                    १. http://www.maayboli.com/node/8639
                                                                                    २. http://www.maayboli.com/node/8628

                                                                                    Pages