मकरसंक्रांत २२ डिसेंबर ला साजरी करावी का ?

Submitted by _प्राची_ on 21 December, 2013 - 23:44

sankranti.jpg

खालील लेख वाचनात आले. त्यातले म्हणणे पाटण्या सारखे आहे.
२२ डिसेंबर ला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.
२२ डिसेंबरला भर हिवाळा असतो. तेव्हा तीळगुळ खाणे जास्त इष्ट वाटते.
पूर्वजांनी शास्त्रानुसार सण योजले. आपण ते तत्व लक्षात घेतलं पाहिजे.
१४ जानेवारी पर्यंत हिवाळा अगदीच संपत आला असतो. तीळगुळ खाऊन त्रासच होतो.
तुम्हाला काय वाटतं ?

http://www.marathivishwakosh.in/khandas/khand12/index.php?option=com_con...

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17999889.cms?

http://thinkmaharashtra.com/theva/%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B8%...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो तीळगूळ जो खाऊन त्रास होतो तो डोनेट करावा त्यापेक्षा. आपण बैठी कामे करतो इत्क्या कॅलरीज ची
गरज नसते. मूळ सण शेतीप्रधान संस्कृतीतला आहे. बाकी विश करायला काय कोणताही दिवस शुभच आहे.

_प्राची_,

दुव्यांबद्दल धन्यवाद! अशी चर्चा व्हायला हवी. Happy

मला अरविंद परांजप्यांचं म्हणणं पटलं. मकरसंक्रांत आणि उत्तरायणारंभ हे दोन वेगळे सण साजरे करावेत. तसंही पाहता ख्रिसमस हा उत्तरायणाचा प्रारंभ म्हणूनच धरला गेला आहे. तेव्हा वेगळा सण उत्पन्न करण्याची गरजही नाही. तर मकरसंक्रांत म्हणजे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो क्षण. सूर्याचे राशीभ्रमण नेहमी निरयन असते. त्यास सायन नियम लावणे इष्ट दिसत नाही.

असो.

मटातल्या लेखात एक चूक आहे.

>> ..., आणखी हजार वर्षांनंतर सूर्याचे मकर संक्रमण फेब्रुवारीमध्ये होऊ लागेल. उत्तरायण मात्र
>> २२ डिसेंबरलाच होईल.

काही हजार वर्षांनी सूर्याचे मकरसंक्रमण फेब्रुवारीत होऊ लागेल हे बरोबर आहे. परंतु उत्तरायण २२ डिसेंबरलाच चिकटून राहणार नाही. तेही हळूहळू मागे सरकेल. पृथ्वीच्या परांचन गतीमुळे दर वर्षी उत्तरायण २० मिनिटे अगोदर येते.

आ.न.,
-गा.पै.