फुटकळ - २

Submitted by बेफ़िकीर on 31 July, 2013 - 04:12

अभिप्राय देण्यामुळे घोळ होतो
लिहावे स्वतः तर गदारोळ होतो

==========

प्रवास रस्ता घाट बोगदा खड्डे टोल नि गावे
माझ्या एका आयुष्याला किती किती ही नावे

==========

काही यत्ता फार जळफळत तिच्या गव्हाळी रंगावर
नववीमध्ये जाण्याआधी हळद लागली अंगावर

==========

काल नोकरी गेली ज्याची तो का आनंदी दिसला
त्याला घालवणारा होता तोच कसा बंदी दिसला

==========

कितीदा पाहिली बदलून मी वागायची शैली
जगाने रंजनासाठी मला केलेच बदफैली

==========

माळा आवरताना इतके जाणवले की
पुन्हा एकदा आवरायला हवाय माळा

==========

फेसबूक नव्हते तेव्हा जे संपर्कामध्ये नव्हते
त्यांच्यावरती आता का मी वेळ घालवू समजेना

==========

रिक्षेवाल्याला थोडेसे जास्त दिले गेल्याची बोच
लाख बारबालेवर उधळत मनातुनी घालवतो तो

==========

आभाळाला कामच नसते दुसरे हल्ली
जरा खुट्ट झाले की कोसळते कोठेही

==========

प्रत्येक माणसाचा प्रॉब्लेम हाच आहे
मी एकटाच नाही, जो एकटाच आहे

==========

लग्न गणपती नवरात्री मतमोजणी जयंती
काही नसते तेव्हाही सुरळीत वाहतुक नसते

==========

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिप्राय देण्यामुळे घोळ होतो
लिहावे स्वतः तर गदारोळ होतो>>> अगदी अगदी.. अक्षरशः Happy

माळा आवरताना इतके जाणवले की
पुन्हा एकदा आवरायला हवाय माळा>>> सही!

प्रत्येक माणसाचा प्रॉब्लेम हाच आहे
मी एकटाच नाही, जो एकटाच आहे>>> मस्त..

लग्न गणपती नवरात्री मतमोजणी जयंती
काही नसते तेव्हाही सुरळीत वाहतुक नसते>>> चालायचेच... Happy

मस्त लिहिले एकूणच.. पु फु शु

अभिप्राय देण्यामुळे घोळ होतो
लिहावे स्वतः तर गदारोळ होतो...अगदी मनातलं ( प्रत्येक माबोलीकरांच्या Happy )

प्रवास रस्ता घाट बोगदा खड्डे टोल नि गावे
माझ्या एका आयुष्याला किती किती ही नावे....वा वा वा !!!

माळा आवरताना इतके जाणवले की
पुन्हा एकदा आवरायला हवाय माळा ...ये बात !

आभाळाला कामच नसते दुसरे हल्ली
जरा खुट्ट झाले की कोसळते कोठेही......अगदी अगदी !

प्रत्येक माणसाचा प्रॉब्लेम हाच आहे
मी एकटाच नाही, जो एकटाच आहे.......दुरुस्त फर्माया !

सगळे आवडले सर

एका जागी अडखळलो म्हणून असे सोयीनुसार वाचले >>>>पाच रुपै रिक्षेवाल्याला .......असेही वाचून पाहिले >>>पाच् रुपये रिक्षेवाल्याला .......

Happy

माळा आवरताना इतके जाणवले की
पुन्हा एकदा आवरायला हवाय माळा

आभाळाला कामच नसते दुसरे हल्ली
जरा खुट्ट झाले की कोसळते कोठेही

व्वा. हे शेर फार आवडले.

वैवकु, मनःपुर्वक आभार 'रिक्षेवाल्याच्या शेरातील' घोळ सांगण्याबद्दल, घाईघाईत घडले! बदल केला आहे.

सर्वांचा आभारी आहे.

प्रवास रस्ता घाट बोगदा खड्डे टोल नि गावे
माझ्या एका आयुष्याला किती किती ही नावे... वाह वा

फेसबूक नव्हते तेव्हा जे संपर्कामध्ये नव्हते
त्यांच्यावरती आता का मी वेळ घालवू समजेना. मस्तच

आभाळाला कामच नसते दुसरे हल्ली
जरा खुट्ट झाले की कोसळते कोठेही.... वाह

प्रत्येक माणसाचा प्रॉब्लेम हाच आहे
मी एकटाच नाही, जो एकटाच आहे... आफाट

काही यत्ता फार जळफळत तिच्या गव्हाळी रंगावर ... अफलातून मिसरा.... शेवट तितका छान नाही झाला

पु.ले.शु!

व्वा, मस्त आहेत फुटकळ

हे खासच आवडले

काल नोकरी गेली ज्याची तो का आनंदी दिसला
त्याला घालवणारा होता तोच कसा बंदी दिसला

==========

माळा आवरताना इतके जाणवले की
पुन्हा एकदा आवरायला हवाय माळा

==========

फेसबूक नव्हते तेव्हा जे संपर्कामध्ये नव्हते
त्यांच्यावरती आता का मी वेळ घालवू समजेना

==========

प्रत्येक माणसाचा प्रॉब्लेम हाच आहे
मी एकटाच नाही, जो एकटाच आहे

कितीदा पाहिली बदलून मी वागायची शैली
जगाने रंजनासाठी मला केलेच बदफैली

माळा आवरताना इतके जाणवले की
पुन्हा एकदा आवरायला हवाय माळा

आभाळाला कामच नसते दुसरे हल्ली
जरा खुट्ट झाले की कोसळते कोठेही

हे सर्वात छान वाटले.