फसवणूक

Submitted by Mandar Katre on 13 December, 2013 - 13:23

परवा एका डॉक्टरांशी गप्पा मारत होतो ,डॉक्टर तसे जवळचे मित्रच आहेत ,पण बोलता बोलता त्यांनी जे संगितले ते अतिशय धक्कादायक होते ...

आजकाल मूल होत नसलेल्या जोडप्यांना स्पर्म काऊंट लो असला तरीही सर्रास आयव्हीएफ सल्ला दिला जातो. आणि हे उपचार करणार्‍या डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स चा धंदा मुंबई,नवी मुंबई, पुणे इत्यादि ठिकाणी जोरात सुरू आहे .

पण या उपचारात जे पुरुषाचे बीज वापरले जाते , ते नक्की त्याच जोडप्यातील पुरुषाचे असते का? तर याचे उत्तर धक्कादायक आहे. हजारो निष्पाप जोडप्यांची घोर फसवणूक होत आहे .

मूल कशासाठी हवे असते ? तर आपला जेनेटिक वारसा /डीएनए / वंश पुढे चालू राहावा यासाठी. पण काही डॉक्टर्स फक्त पैशासाठी आणि आपल्या हॉस्पिटल्स च्या यशाची टक्केवारी वाढावी म्हणून चक्क दुसर्‍या एखाद्या धडधाकट व स्पर्म काऊंट चांगला असणार्‍या पुरुषाचे बीज वापरतात . अशाने भले जोडप्याला अपत्यप्राप्तीचा आनंद (?) मिळत असेलही , पण धार्मिक ,आध्यात्मिक आणि वैद्यकीय दृष्ट्या देखील घोर फसवणूक आहे . कारण यातून निपजणारी संतती मूळ पुरुषाच्या डीएनए शी विपरीत असते.... साहजिकच त्याचे संस्कार ,संसृती आणि वंश निराळा असतो. म्हणजे असे मूल ''त्यांचे''नसतेच !

या विषयाबद्दल जनजागृती होवून असे गैरप्रकार करणार्‍या डॉक्टर्स वर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*

पण हे रोखणार कसे? असे घडलेले कायद्याच्या कचाट्यात सापडणेही मुश्किल आहे. सायबर क्राईम लॉ सारखा स्पर्म डोनेशन लॉ यायला हवा.

असे करणे कसे शक्य आहे? कारण पॅटर्निटी टेस्ट केली तर कळू शकते ना फसवणूक केली आहे किंवा नाही ते.
मुळात लो स्पर्म काउंट असेल तर आयवीएफ ने यश मिळायची शक्यता वाढते.

धक्कादायक तर आहेच पण हे खरच शक्य आहे का? म्हणजे काही टेस्ट्स, कागदपत्र असे काहीच नसते का?

काही मूद्दे मात्र अजिबात पटले नाहीत पण मूळ विषय भरकटू नये म्हणून "हाताची घडी तोंडावर बोट"

असे होत असेल तर ती नि:संशय फसवणूक आहे, आणि ती दण्डनीय आहे. पण ही शक्यता कमी वाटते. कारण स्पर्म काऊंट कमी असला तरी आयव्हीएफला यश मिळू शकते, त्यामुळे असे करण्याला काही सबळ कारण आहे असे वाटत नाही. शिवाय ही गोष्ट व्हेरीफाय करता येण्यासारखी / भविष्यात उघडकीस येण्यासारखी असल्याने कोणी या फंदात पडत असेल असे वाटत नाही.