भारतातल्या एयरपोर्टसवर मिळणार्‍या खादाडीच्या वस्तू

Submitted by स्वप्ना_राज on 14 December, 2013 - 10:28

कामाच्या किंवा सुट्टी घालवायच्या निमित्ताने आपण हवाईप्रवास करतो. एयरपोर्टसवर त्या त्या शहराची खासियत असे पदार्थ मिळतात. त्याबद्दल लिहिण्यासाठी हा धागा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागच्या आठवड्यात हैदराबादला गेले होते. शमशाबादच्या राजीव गांधी एयरपोर्टवरून दोन गोष्टी घेतल्या. पुल्ला रेड्डीच्या Assorted Sweets चा ५०० ग्रॅम चा बॉक्स - रुपये २५०. आणि कराची बेकरीमधून ओस्मानिया बिस्किटस ५०० ग्रॅमचा बॉक्स रुपये १५०. दोन्ही गोष्टी अप्रतिम!

मायबोलीवर खादाडी हा हिणकस शब्द का वापरला जातो समजत नाही . साधा खाद्यपदार्थ शब्द वापरला तर कसे राहील ?
रच्याकने , एअरपोर्ट वर मिलणार्‍या खाद्यपदार्थाच्या दराबद्दल काय म्हणता येईल.? लूट हा एकमेव शब्द सध्या आठवतोय. परवडतेय म्हणून प्लास्टिकचा बॉलपेन कुणी हजार रुपयाला घेत नाही.....

हैदराबाद च्या विमानतळावर मलाही तेथील लोकल बिस्किट्स मिळाली होती (कराचीचीच होती बहुधा). छान होती.

मुंबई विमानतळावर चहा चे दोन प्रकार - एक ७० रू ला. तेथे तोबा गर्दी. लाईन लावणे वगैरे प्रकार तेथील उच्च मध्यमवर्गीय लोकांना माहीत नसल्याने जो जास्त आरडाओरडा करेल, ज्याच्या कडे विक्रेत्याचे लक्ष जाईल तो भाग्यवान विजेता. म्हणून नाईलाजाने १५० रू वाल्या रॉयल चहावाल्याकडे गेलो. येथे टी बॅग वाला मिळतो म्हणून आधीच त्याने सांगितले. मात्र दूधही कार्टन मधले होते हे सांगितले नाही. चहा ठीक ठीक होता. वेटिंग एरियातील सीट्सना कप होल्डर्स नाहीत. त्यामुळे जर हाताने दुसरे काही करायचे असेल तर तो चहा ठेवायचा कोठे हा प्रश्न पडतो.

(जरा फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स आहेत. पण हा बाफ त्याकरिताच आहे ना? Happy )

रॉबिनहूड, मला वाटतं की खादाडी हा हिणकस शब्द नाहीये. इंग्रजीत ज्यास गिल्टी प्लेझर म्हणतात तशी जिह्वालोलुप छटा अभिप्रेत आहे.
आ.न.,
-गा.पै.

फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स.. Rofl

काही वर्षांपुर्वीचा नवी दिल्ली विमानतळावरचा हा अनुभव. (मला इथे 'दिल्लीची खासियत' म्हणावा असा एकही पदार्थ मिळाला नाही, म्हणून जरा धाग्याला अवांतर अनुभव.) वेटिंगमधे होतो. सकाळचे साडेपाच वगैरे वाजलेले. भूक लागली म्हणून एका आकर्षक झोपडीसदृष्य दुकानात गेलो. कोस्टा रिका की असे काहीतरी नाव होते, आता आठवत नाही नक्की. मेनूकार्ड न बघता फक्त व्हेज सँडविच आणि कॉफी, एवढीच ऑर्डर दिली. तेवढ्या मेनूसाठी त्याने सतरा उपप्रकार विचारले. मी सोप्यात सोपी नावे घेतली. तिथल्या दोघांनी तु.क. टाकले. त्याने एका ट्रेमधे सँडविच आणि कॉफी आणि बिल दिले. बिल होते तब्बल पा-व-णे सा-त-शे रु-प-ये ! पुण्याच्या हिशेबाने सांगायचे तर दुर्वांकुरची चार जेवणे !!
सँडविच बरे होते. कॉफी कडू होती, किंवा कदाचित मला गोड लागली नाही.

'विमानतळावरचे खाद्यपदार्थ' म्हटले की मला अजूनही हाच अनुभव आठवतो. तेव्हापासून मी विमानतळावर फक्त शपथ खातो आणि फक्त आवंढा गिळतो.
अवांतराबद्दल क्षमस्व.

-एक तिसर्‍या जगातला रहिवासी.

२०१० चा अनुभव. त्यावेळी तरी हैद्राबाद विमानतळावर मला खाण्या-पिण्याची चांगली सोय वाटली. विमानतळावर इडली वगैरेचा स्टॉल होता आणि बाहेर सब-वे, मॅकडोनल्ड होते. किमती थोड्या जास्त असतील पण त्यात airport चे चार्जेस् include केल्यामुळे असेल. मॅकडोनल्ड मधील विक्रेते हे आम्ही दिलेल्या individual orders ना combine करुन कॉम्बो मिल बनवले आणि आमचे पैसे वाचवायचा प्रयत्न करत होते.
मुंबई (डोमेस्टिक) विमानतळावर खाण्यालायक काहीच मिळाले नाही. कुठेतरी सँडविच होते पण त्याच्या रंगरुपावरुन ते २-३ दिवसांपुर्वी बनवले असेल असे वाटले. दिल्ली विमानतळावरही घाणेरडा - तेलकट समोसा भरमसाठ किंमत लाउन आम्हाला खपवला. चव बघुन त्या विक्रेत्यासमोरच फेकुन द्यावा लागला. (अर्थात आता परिस्थिती बदलली असावी )

बंगळूरु विमानतळावर इंटरनॅशनल भागात तरी खाण्यापिण्याची सोय एकदम बेकार आहे . कोमट पाण्याच्या कपाभोवती इंस्टंट कॉफी ग्रॅन्युल्स नुसतेच फिरवतात . थडेसे पावडर क्रीमर शिंपडतात अन भरमसाठ किमतीला विकतात. शहरातल्या पिझ्झा दुकानातून न संपलेले पिझ्झा तीनेक दिवसांनी एअरपोर्ट्वर विकायला येतात बहुतेक.

हैदराबाद लोकल फ्लाइट सेक्शनमधे खाण्यापिण्याची सोय बरी आहे, पण गर्दी, बेशिस्त अन गोंधळ हे सुद्धा बरेच आहे.

कराचीची मून बिस्किट्स एकदम भारी.

फारेंड, ज्ञानेश Happy
शमशाबाद एयरपोर्ट रॉक्स!
इडली एक्स्प्रेस छाने. बिर्यानीपण पैसा वसूल. लाँजमध्ये शांतपणे कॉफी(किंवा :P) पीत उड्डाणाची वाट पहायला मस्त वाटते. कॉफी शॉपवाले ज्ये. ना. शी आपुलकीने वागत होते. योगायोगाने कधी गर्दी, गोंधळाचा सामना करावा लागला नाही. उसगावाच्या तु.क. टाकून ऑर्डर घेणार्‍या मॅक्डीपेक्षा हैद्राबादमधले मॅक्डीवाले खूपच चांगले म्हणावे लागेल.
धागा खादाडीचा आहे, पण शमशाबाद एयरपोर्टवर शॉपिंग करायचा मोह आवरत नाहीच Wink

दिल्ली एयरपोर्टचा अनुभव सर्वात वाईट. बँगलोर, मुंबई आणि चेन्नई एयरपोर्ट ओके वाटले.

लई महाग आणि तरीही बाद चवीचे पदार्थच मिळतात.

गप्प पाणी प्यावे आणि विमानात बसल्यावर जे गिळायला मिळते, ते खावे.

... आजवरचे सगळे अनुभव घेऊन असा निष्कर्ष काढलेला आहे.

Somehow I always enjoy eating at delhi airport (new T 3) lot of variety is available. T3 is so far the best terminal in india.

बंगळुरूचे जुने एअरपोर्ट : आत एअरपोर्टात नेहमीचेच बेचव असलेले, महागडे सँडविच व कोमट कॉफी यांचा एक-दोनदा अनुभव घेतला होता. एअरपोर्टातून बाहेर पडल्यावर एका झाडाखाली टपरी सदृश दुकाने होती. तिथे आतल्यापेक्षा जरा स्वस्त असे बेकरीप्रॉडक्ट्स (पॅटीस, केक, क्रीमरोल, सँडविच टाईप) मिळायचे, शेजारच्या टपरीत चहा-कॉफी, कोल्ड्रिंक्स इ. पण तिथेच अनेक लोक सिगारेट फुकत उभे असायचे त्यामुळे तो धूर नाकातोंडाघशात घेत उभे राहायला नको वाटायचे. त्याच टपर्‍यांच्या मधोमध एक बोळवजा जागा होती. तिथून आत गेल्यावर एक छोटुस्से साऊथ इंडियन फूड मिळणारे - उभे राहून खायचे हाटेल होते. गरमागरम इडली, वडा, उपमा, पोंगल राईस इत्यादी प्रकार, सोबत चटणी-सांबार. अस्सल चवीचे आणि स्वस्त व मस्त. एअरपोर्टावरचा बराच स्टाफ तिथे यायचा खायला. Proud फक्त अगदी निमुळती, अरुंद अशी जागा असल्यामुळे आपल्या सामानासकट तिथे जायची सोय नव्हती. मग सोबतच्या कोणाला तरी सामानाकडे लक्ष द्यायला सांगून आम्ही आळीपाळीने तिथे जाऊन खाऊन यायचो.

आता जक्कुर एअरपोर्टाच्या आजूबाजूला काय सोय आहे माहित नाही.

>>तेव्हापासून मी विमानतळावर फक्त शपथ खातो आणि फक्त आवंढा गिळतो.<<
ज्ञानेश मस्तच!
ल्वॉकांक लई पैशे असत्यात म्हनुन ती खात्यात.

दिल्ली विमानतळावर पूर्वी वाईट अनुभव घेतलेत, टी १ वर.
नव्या टर्मिनल ३ वरचा फुड लाउंज मात्र चांगलं आहे. तिथल्या किमती कोणत्याही मॉलमधल्या फुड कोर्टाइतपतच महागड्या वाटल्या होत्या. भरपुर वेगवेगळे काउंटर्स होते (सगळ्या फुडकोर्टात असतात तसेच). पण खूप काही स्पेशल मिळत नाही. (मुद्दाम तिथे खायलाच पाहिजे असं).

कॉफी कडू होती, किंवा कदाचित मला गोड लागली नाही. >>> ज्ञानेश, सही Happy

विमानतळावर साधे पदार्थ एवढे महाग असण्याची काय कारणे असतीलः
१. तेथे दुकान चालवण्याचा खर्च जितका जास्त तितकी किंमत जास्त असते. तरी इतका फरक असावा का? मुंबईच्या आंतराष्ट्रीय विमानतळाच्या चेक इन काउंटर जवळ एक दोन वर्षांपूर्वीपर्यंत तरी २० रू ला मिळणारा चहा आठवतो. मग गेटजवळच्या भागात एवढा जास्त का?
२. कारण तिकीटासाठी ३-४००० खर्च करणारे लोक हा खर्चही करायला तयार होतात. किंवा त्यांनी तसा तो करायला काय हरकत आहे असे दुसर्‍या कोणीतरी ठरवले आहे.
३. ते पदार्थ खरोखरच तितक्या उच्च दर्जाचे असतात. कदाचित उच्च चवीचेही असतात. आपण पामर लोकांना त्याची चव काय? Proud
४. त्यांनी एक किंमत ठोकून दिली व आजतागायत ती एवढी का म्हणून कोणीही विचारले नाही.
५. वेटिंग एरिया मधे तासभर नुसते बसण्यापेक्षा लोक काहीही चवीचे काहीही किमतीचे काहीही घ्यायला तयार होतात Happy

.

ह्या बीबीचं शीर्षक बदलून भारताच्या विविध शहरात मिळणारे खास खाद्यपदार्थ असं करायचा बेत होता. काही कामानिमित्त किंवा सुट्टी घालवायला भारतभर जाणार्‍या मायबोलीकरांना एके ठिकाणी माहिती मिळावी असा हेतू होता. पण इथल्या पोस्टी वाचून आधीच बीबीच्या विषयाला बाजूला टाकून चर्चा चालू आहे असं दिसतं Uhoh असो. वेगळा बीबी काढायचा उत्साह नाहिये आता. Sad

तुम्ही शिर्षकात एअरपोर्ट लिहीलंय आणि त्याबद्दलच तर लोकं बोलतायत. तुम्हांला काय अपेक्षित होतं हे त्यांना कसं कळणार?

"एयरपोर्टसवर त्या त्या शहराची खासियत असे पदार्थ मिळतात. त्याबद्दल लिहिण्यासाठी हा धागा" हे लिहिलंय ना'. माझी पहिली पोस्ट त्याबद्दलच आहे.

मला मुंबई, बंगळुरु, विशाखापटणम , राजमहेंद्री इथे अजिब्बात लोकल खासियत पदार्थ दिसले नाहीत.
हैदराबादला सुद्धा पुल्ला रेड्डी स्वीट्सची तयार पाकिटे किंवा कराची बिस्किटे सोडता पुलिहोरा, बिर्याणी कधि दिसले नाहीत. इडली डोसा वडा चांगले असतात.पण ते काही हैदराबादची खासियत असे नाहीये.
अपवाद - एकदा मुंबैत इंडियन एअरलाईन्स च्या टर्मिनलवर १९६७ सालचे दिसणारी मगनलाल चिकीची पाकिटे दिसली होती.

:मुंबई एअरपोर्ट्वर चांगला वडापाव मिळेल, कुरकुरीत तळलेले बोंबील , सोलकढी मिळतील असे स्वप्न पाहणारी लाळगाळू बाहुली:

१९९६-९७ साली कलकत्त्याच्या विमानतळावर मिष्टी दोई चे मटके मिळत असत. अख्खा मटकाच पुठ्ठ्याच्या डब्यात घालून मस्त पॅक करुन देत. कॅरी ऑन मधून २-३ वेळा आणले आहे मुंबईला. आताच्या नियमांप्रमाणे बहुतेक ते कॅरी ऑन आणता येणार नाही Sad

आता कोणत्या शराची काय खासियत राहिलीय. ? एअरने प्रवास करणारे बहुतेक प्रवासी हे मॅक डी संस्कृतीतले असल्याने लोकल खाणे त्याना गांवढळ वाटू शक्ते. ज्यांना खाणे, कपडे संगीत अशा सांस्कृतिक बाबीत रस आहे असे फार थोडे लोक असावेत. त्यांच्याकरता खप नसताना हल्लीच्य मार्केटिंगच्या जमान्यात कोणी उठाठेव करील असे वाटत नाही. रच्याकने, मुम्बईची काय खासियत आहे?मुम्बैचे ८० टक्के पब्लिक पन्जाबी खाणे खाते. अन्यथा पनीर हा पदार्थ मागच्या पिढीच्या तीर्थरुपांनी तरी खाला तर सोडा पाहिला तरी होता काय? भेंडीची ओळख या पिढीला 'भींडी मसाला' या मेन्यू कार्दातल्या एंट्रीनेच असते.त्यामुळे विमानतळावर ठेवण्यासारखे मुम्बईचे असे काय आहे.? वडापावला भद्रजनांन्ची पसन्ती नाही. ते तर झोपडपट्टी कल्चरचे खाणे ! विमानतळावर ते ? शिव शिव. एवढ्या बाबतीत साऊदी कट्टरच. भात रस्सम कोठेही बिनदिक्कत ओरपतात आणि भाताचे गोळे फाईव्ह स्टारात कोणाची तमा न बाळगता मटकावतात. चिदम्बरम मंत्री झाला तरी लुंगी काही 'सोडीत' नाही...
आपण मात्र जरा बर्‍या रेस्टो. मध्ये साधी मिसळ जरी विचारली तरी वेटरा सकट सगळे 'अलिबागसे आयेला', 'पौडाचा पावणा' किन्वा 'वडिणग्या हून आलेला' (क्वल्लापुरात) अशा नजरेने बघतात. कसले लोकल खाद्यपदार्थ घेऊन बसलात.?

मेधा, मुंबई एअरपोर्टबद्दल सहमत. मुंबईची खासियत असणारं खाणं मी तरी आत, बाहेर पाहिलेलं नाही. सँडविचेस, चायनीज, केएफसी हे असलंच मिळतं.

बेक्कार आहे ते चेन्नई एअरपोर्ट. इन्स्टंट कॉफी सत्तर ऐंशी रूपये?? टोमॅटो सूप नामक आंबट पाणी एकशे चाळीस रूपये? नुसत्या इडली (२) नव्वद रूपये!!!! प्रश्न केवळ पैसे जास्त देण्याचा नाही, तेवढ्या उत्तम चवीचे क्वालीटीचे तरी हवे की नको? ते कृष्णा स्वीटचा कसला तुपाळ (खरंतर डाल्डाळ) मैसूर पाक दोनशे रूपायला?

एअरपोर्टच्या बाहेर इडलीच्या टपर्‍या लागतात तिथे वीस रूपयात तीन इडली एक वडा, चटणी सांबार एवढं सगळं मिळतं. पहिल्या धारेची फिल्टर कापी पाच रूपयाला. बिर्याणी पार्सल साठ रूपयाला. आम्ही इथेच नाश्ता वगैरे करून आतमधे जातो आणि बाहेर पडलो की तिथून पार्सल घेतो. स्वस्त असतंच शिवाय चवीला अप्रतिम असतं. पोटभरीचं असतं.

मेधातै, शमशाबाद एयरपोर्टवर मस्त बिर्यानी मिळते. एकाने ऑर्डर दिली की दुसर्‍याला तीच ऑर्डर देणे भाग होतंच Happy पुलिहोराही मिळत असेल कदाचित. बेगमपेटचं एयरपोर्ट एव्हढं काही आवडलं नव्हतं, पण शमशाबादवालं मस्तयं.

मुंबईत आंतरराष्ट्रीत विमानतळावर गेटच्या बाहेर जी अगदी छोटी दुकानं आहेत तसं दुकान भाड्याने घ्यायचं झाल्यास जवळ-जवळ साडेतीन लाख रुपये डिपॉझिट लागते आणि ५०के पासून भाडं आहे. खर्च वजा करून नफा काढायचा तर त्यांना किमती जास्त ठेवाव्या लागतात. ही काही वर्षांपुर्वीची माहिती आहे. आता काय परिस्थिती आहे कल्पना नाही. आतल्या गाळ्यांच्या किंमती/भाडी आणखी जास्त असणार. कुणाला काही हफ्ते वगैरे प्रकार असतील तर ते सुद्धा माहिती नाही.

वडापाव, पावभाजी इ. पदार्थ मिळतात की मुंबईतील विमानतळांवर. शिवसागर पण आहे. दोसा, ईडली पण बघितलेत.

मी तरी शिवसागर बघितल्याचं आठवत नाही. डोमेस्टीक टर्मिनल्सबद्दल म्हणत असशील तर माहीत नाही पण इंटरनॅशनलवर पाहिल्याचं लक्षात येत नाही.

खरेतर एअर्पोर्ट वर सर्व जगातले लोक येत असतात त्यामुळे तिथे सर्वांना आव्डतील असेच पदार्थ असतात.
लोकल खासियत यू आर सर्चिंग अ‍ॅट द राँग प्लेस. चेन्नै ला मस्त म्यागी मिळते. ते तर सांबार भाताचे माहेर घर. मला पण ते महाग वाट्ते पन परत तेच. एक समजा जागतिक फिरस्त्यांचे चलन असते तर त्यात
सर्वांना परवडेल असे पदार्थ असतात.

मुंबईला शिफ्ट होताना एकदा बाहेर पडल्या पडल्या जे शिवसागर आहे तिथे बसून पोहे खाल्ले होते. मला तर
इंडिगोचा चिकन् जंगली स्यांडविच फार आव्डतो. व टूर वर काहीही भयानक खायला लागायचे ( एकदा पाव
किलो ढोकळाच स मोर आलेला!) तेव्हा कधी एकदा एअर पोर्ट वर जाऊन चीज सांदविच खातो असे होत असे.

सीसीडीत कोरडी भेळ आमलेट ब्रेड मस्त मिळ ते. मुंबईत जे वरचे नवे गेट्स आ हेत ए ८ परेन्त तिथे फूड कोर्ट मस्त आहे. बटर क्रसां आणि चहा मस्त लागतो तिथला.

सर्वात घान नागपूर एअर्पोर्ट वर नूडलस. सॉस मागितला तर आंबूस वास येतो होता. हायजिन मेंटेन करत
नाहीत ह्याचा फार राग आला होता.

इंटरनॅ शनलच्या डिपार्चरला बाहेर काहीच नाही. सगळे आत आहेत. तिथे इडली, वडा पाव, दोसा असं काय काय मिळतं. अभारतीय कुझिन्स पण आहेत.

अरायवल गेटस्च्या बाहेर शीवसागर, बरिस्ता सारखं एक रेस्टॉ. आणि फ्लोरिस्ता वगैरे आहेत.

डोमेस्टिकला उलटं आहे. तिथे अरायवलला काही नाहीये माझ्या माहितीप्रमाणे.

Pages