Submitted by -शाम on 13 December, 2013 - 03:33
नील नभाची लंघुन माया तेज चालले पुढे पुढे
गडद जांभळी शाल पांघरुन पर्वतराजी शांत पडे
निरव निळाईवरी भाळला दूर दिवाना घन वितळे
जळात विरघळलेले केसर बिंब मिरविते टंच तळे
सावळ वृक्षी एकट पक्षी राग मारवा आळवतो
वारा हळव्या तृणपात्यांतुन हिरवी सळसळ कालवतो
एक एक क्षण बुडतो येथे तसा तिथे उगवे तारा
रिती दिसाची ओंजळ होता उजळुन येई गाभारा
परतीच्या वाटेत मनाचे पुन्हा पुन्हा पाउल अडते
जीव गुंतला सोडवताना गाठ नवीन जणू पडते
या खेळाची स्थळ-काळाची जडली बाधा चित्त झुरे
संग सावळा घडता जैसा राधाहृदयी शाम उरे
_________________________________शाम
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहाहा - शब्दसंपदा, आशय आणि लय
अहाहा - शब्दसंपदा, आशय आणि लय सगळेच मोहक, खिळवणारे ....
ग्रेट.....
मस्त! वाक्य न् वाक्य
मस्त!
वाक्य न् वाक्य डोळ्यासमोर उभं राहिलं
सावळ वृक्षी एकट पक्षी राग
सावळ वृक्षी एकट पक्षी राग मारवा आळवतो
वारा हळव्या तृणपात्यांतुन हिरवी सळसळ कालवतो
या खेळाची स्थळ-काळाची जडली बाधा चित्त झुरे?
संग सावळा घडता जैसा राधाहृदयी शाम उरे
शाम , अगदी त्या स्थळकाळात नेलंत.प्रत्येक शब्दागणिक गुंतवणारी कविता.
सुंदर!
सुंदर!
छान, लयबद्ध कविता. रिती
छान, लयबद्ध कविता.
रिती दिसाची ओंजळ होता उजळुन येई गाभारा
ही ओळ आणि शेवटची द्वीपदी एकदम खास.
अप्रतिम!!! खूप खूप खूप वेळा
अप्रतिम!!! खूप खूप खूप वेळा वाचली. चित्र डोळ्यांसमोर उभं राहिलं आणि प्रसन्न वाटलं एकदम!
एकदम चित्रदर्शी!! सुंदर!!!
एकदम चित्रदर्शी!! सुंदर!!!
अ...... फा...........ट!
अ...... फा...........ट!
वाहवा!! अतिशय लयबद्ध,
वाहवा!! अतिशय लयबद्ध, ओघवती.सहजसुंदर.......
परतीच्या वाटेत मनाचे पुन्हा पुन्हा पाऊल अडते
जीव गुंतला सोडवताना गाठ नवीन जणू पडते>>>> !! सुरेख!!
फक्त गाठ नवीन जणू पडते.. कुठेतरी लय किंचीत हलली असं वाटलं..
हे म्हणजे बाल की खाल आहे पण पूर्ण कविताच सुंदर आहे म्हणून सांगावसं वाटलं
सुरेख!! सहज लय आणि समर्पक
सुरेख!! सहज लय आणि समर्पक शब्द...
खूप आवडली
खूप आवडली
खूप आवडली कविता. काय मस्त लय
खूप आवडली कविता. काय मस्त लय आहे.
>> एक एक क्षण बुडतो येथे तसा
>>
एक एक क्षण बुडतो येथे तसा तिथे उगवे तारा
रिती दिसाची ओंजळ होता उजळुन येई गाभारा
<<
वा!
छान आहे कविता.
('चित्त झुरे'नंतर प्रश्नचिन्ह का आहे?)
औदुम्बराच्या गूढ विश्वात
औदुम्बराच्या गूढ विश्वात नेऊन, लय व अर्थाचया गहन डोहात खोल खोल नेणारी आशयघन कविता ! 'नवीन जणू'वर लयीसाठी विचार व्हावा, ही विनंती.
सुंदर. भारतीताई+१ मलातरी
सुंदर.
भारतीताई+१
मलातरी नवीन.. मध्ये अडखळण्याएवढा लयभंग वाटला नाही. थोडं नवीssन म्हणावं लागतंय जे दीर्घ 'वी' ला साजेसेच आहे.
तू ग्रेटच आहेस!
तू ग्रेटच आहेस!
आहा... अप्रतिम...
आहा... अप्रतिम...
धन्यवाद दोस्तांनो!!
धन्यवाद दोस्तांनो!!
अत्यंत मोहक, लयबद्ध कविता!
अत्यंत मोहक, लयबद्ध कविता!
शाम, कविता अतिशय आवडली.
शाम, कविता
अतिशय आवडली.
अतिशय सुंदर!
अतिशय सुंदर!
आवडली.
आवडली.
अतिशय छान .....चित्र डोळ्या
अतिशय छान .....चित्र डोळ्या समोर उभे ठाकले
ही पण आठवणीतून वर काढते
ही पण आठवणीतून वर काढते
Afaat sundar
Afaat sundar
अतिशय सुंदर मोहक आणि लयदार
अतिशय सुंदर मोहक आणि लयदार काव्य